Login

आरोही - जीवनाचा संघर्ष ( भाग - 7 )

Aarohi

  

        अमित ला लकवा मारल्यानंतर आरोही पटकन शेजारच्या लोकांना मदतीला  हाक मारते. सर्व पटकन अमित ला हॉस्पिटल ला ऍडमिट करतात. अमित खूप घाबरलेला असतो. आरोही त्याला धीर देते आणि बोलते मी आहे ना तुम्ही घाबरू नका...आपण नीट ट्रीटमेंट करूयात. 

       हॉस्पिटल ला गेल्यावर अमित ची ट्रीटमेंट चालू होते, अमित च्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत असते. आरोही म्हणते नशिब देवाच्या कृपेनें क्लास नीट चालत असल्यामुळे हॉस्पिटल च्या खर्चाचे पैसे आपल्याकडे होते, अमित ला दहा दिवसांनी हॉस्पिटल मधून सोडण्यात येत. दोन महिन्यानी अमित च्या तबेती मध्ये थोडी फार सुधारणा होते पण पाय काही केल्या कव्हर होत नव्हते, पाय टाकला कि त्याला पडायला होत असे.

      आरोही, छोटी चं अमित चं सगळं सांभाळून क्लास ला जातं असे. असेच दिवस जातं होते अमित पाय तेवढा कव्हर न  झाल्यामुळे सहा महिने होऊन गेले तरी घरीच होता. अमित ची नोकरी पण त्यामुळे गेली होती. तो आरोही ला म्हणतं असे माझ्यामुळे तुला त्रास होतोय न खूप, तुझीच एकटीची दगदग  होतेय खूप. पण आरोही त्याला धीर देत असे आणि म्हणत असे कि तुम्ही बरे व्हाल. काळजी करू नका.

          जवळ जवळ आठ  महिन्यानी अमित ला पूर्ण बरं वाटत. मग तो आरोही ला बोलतो कि मी आता जॉब साठी कुठेतरी प्रयत्न करतो. आरोही पण हो बोलते आणि त्याला बोलते तुम्ही जवळच साधा सा चं जॉब बघा..... उगाचच लगेचच बरं वाटल्या वाटल्या दगदग करू नका.

             अमित ला एक महिन्यानी जवळच एका फॅक्टरी मध्ये जॉब लागतो. सिद्धी पण आता शाळेत जायला लागलेली असते. आरोही चा क्लास दिवसेंदिवस खूप फेमस  होत असतो. मग ती अजून एक शिक्षिका तिच्या जोडीला ठेवते.

           हळू हळू प्रगती होत जाते. सिद्धी तिसरी ला गेलेली असते. मग आरोही- अमित ला बोलते कि आपण बरेच वर्ष चाळीत चं भाड्याने राहात आहोत मुंबई ला घर विकत घेणं तसं सोप्प नाही तेवढं, पण आपण बिल्डिंग मध्ये रेंट वर रूम घेऊया, अमित ला पण तिची संकल्पना पटते आणि मग दोन महिन्यानी - सिद्धी, अमित - आरोही नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट होतात.

         बिल्डिंग मध्ये राहायला गेल्यावर सहा चं महिन्यानी आरोही पुन्हा प्रेग्नेंट राहते. आरोही नऊ महिन्यानी गोंडस बाळाला जन्म देते. ह्यावेळी मुलगा होतो. दोघं ही खुश होतात. मुलाचं नाव - ओंकार ठेवण्यात येत. आरोही घरी एक बाई कामाला मदतीला ठेवते. आणि मग बाळ दोन महिन्याचा झाल्यावर पुन्हा क्लास ला जायला सुरवात करते.

        असच एक दिवस आरोही - अमित संध्याकाळी घरी टीव्ही बघत बसलेले असताना तिच्या काकांचा मुलगा येतो, बायकोला घेऊन.... आरोही ला बोलतो आई आजारी आहे, तीला किडनी चा आजार झाला आहे, ती आता जास्त दिवसांची सोबती नाही आहे.  तिने तुला दिलेल्या त्रासाची, आपल्या चुकीची तीला आता जाणीव झाली आहे, ती हल्ली सारखी तुझी आठवत काढून रडत असते.  म्हणतं असते आरोही च्या मुलांना बघायचं आहे. सारखी बोलते असते त्या पोरीला मी खूप त्रास दिला.

       त्या पोरीला मी त्रास दिला म्हणून देवानेच मला ही शिक्षा  दिली आहे. म्हणून  चं आता त्या डायलेसिस च्या वेदना मला देवाने दिल्या आहेत. असं बडबडत असते...आरोही बोलते दादा मी उद्याच काकी ला येऊन भेटते.

        आरोही दुसऱ्याच  दिवशी सकाळी मुलांना घेऊन काकी ला बघायला जायचं ठरवते, अमित बोलतो आपण सगळेच जाऊया. सगळे सकाळी दहा च्या दरम्यान काकी ला भेटायला जातात, काकी आरोही ला मिठी मारून खूप रडते, बोलते मला माफ कर मी तुला खूप त्रास दिला, तुझ्याशी  खूप चुकीची वागली. आरोही बोलते काकी मी विसरली आहे सगळं, तू लवकर बरी हो बघू. आरोही एक तासाने तिथून निघते. आणि काकी च्या बिल्डिंग च्या खाली ती उतरत नाही तो पर्यंत काकी चा मुलगा तीला पुन्हा फोन करतो आणि बोलतो काकी वारली आहे.

        अमित आणि आरोही शॉक  होतात, अरे आपण आताच बोलून आलो न काकींशी, जास्त बोलत नव्हत्ती पण बरी वाटली तशी, दोघं ही पटकन वर जातात. काकी ने प्राण सोडलेले असतात. काका बोलतो... आरोही तुझ्यात जीव अडकून राहिला होता तिचा...आरोही पण खूप रडते. आरोही काकी चं सगळं कार्य वैगरे झाल्यावर तिथून निघते.

  ( पुढच्या भागात आपण बघणार आहोत आरोही च्या मुलांच्या शिक्षणाबद्दल  आणि आरोही च्या प्रगती बद्दल....)

      

0

🎭 Series Post

View all