काकी च्या मोठ्या मुलाचं लग्न झालेलं असत. त्याची बायको पण स्वभावाला चांगली असते. ती आरोही ला निघताना बोलते ताई तुम्ही दहाव्या दिवसापासून चं जरा राहायला याल का इथे म्हणजे मला पण मदत होईल, बाराव्या - तेराव्याचं जेवण करायला, आरोही च्या डोळ्यात अश्रू चं आले. ती ला मनातल्या मनात सहज वाटून गेलं कि ह्या घरातून मी कधी एकदाची जातेय असं काकी ला सतत वाटत असे. आणि वाहिनी आज राहायला या असं सांगतेय.
आरोही ने अमित कडे बघितलं तो पण पटकन बोलला...हो येईल कि ती चार दिवस. आणि आठ दिवसांनी आरोही काकी कडे राहायला येते. दादा ची बायको खूप चं चांगली होती. आरोही तिच्या लग्नानंतर पहिल्यांदा चं माहेरी राहायला आली होती. काकीची सून आरोही च्या मुलांचे पण खूप लाड करत होती. मुलं पण मग मामा - मामी करून मागे मागे करू लागली.
काकी चं बारावं - तेराव झाल्यावर आरोही तिथून निघते, दादा ची बायको आरोही ला बोलते ताई माहेर समजून मुलांना घेऊन कधीही चार - आठ दिवस आरामाला हक्काने येत जा. आरोही पण मनोमन सुखावते. आरोही घरी गेल्यावर अमित ला पण खुश होऊन सांगते कि वाहिनी बोलली कि हक्काने राहायला येत जा. अमित पण बोलतो बघ...तुला माहेर नव्हत ना वाहिनी च्या रूपाने माहेरी जायचा आनंद पण तूझ्या नशिबात आला.
आरोही ची परिस्थिती हळू हळू सुधारत असते. मुलगी दहावी ला गेलेली असते मुलगा तिसरीला असतो. अमित ची नोकरी पण व्यवस्थित चालू असते. आरोही क्लास, घर दोन्ही संसार सांभाळून सर्व व्यवस्थित म्यानेज करत असते.
मुलगी सिद्धी अभ्यासात खूप हुशार असते, दहावी ला तीला नव्वद टक्के.. मार्क्स मिळतात. सगळेच खूप खुश होतात. अकरावी साठी आरोही तीच विज्ञान शाखेत ऍडमिशन घेते. कॉलेज जवळ चं असत. आरोही अमित ला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या साठवलेल्या पैशातून एक स्कुटी घेऊन देते.
कालांतराने - आरोही - अमित च्या पाठी लागून त्याला बाहेरून बारावी ची परीक्षा द्यायला लावते. तो सुरवातीला नको नको म्हणत असतो. पण नंतर आरोही च्या हट्टा पुढे त्याच काही चालत नाही. अमित एवढ्या वर्षांनी परीक्षा देऊनही बारावी पास होतो. आणि मग हळू हळू करत आरोही अमित च्या पाठी लागून त्याची पंधरावी पण करायला लावते, अमित ही मग तीच ऐकून अभ्यास करतो आणि पास ही होतो.
मुलगी सिद्धी आता मोठी झालेली असते ती ईम बी बी एस करत असते. मुलगा यंदा दहावी ला असतो. पण तो सिद्धी सारखा अभ्यासात तेवढा हुशार नसतो, दहावी ची परीक्षा होते. त्याला साठ टक्के मार्क्स मिळतात. आरोही - अमित थोडे नाराज होतात. पण त्यांना ही माहिती असते कि अमित तेवढा हुशार नाही आहे. आरोही त्याचं कॉमर्स साईट ला ऍडमिशन घेते.
अमित पंधरावी झाल्यावर दुसरीकडे नोकरी शोधतो आणि देवाच्या कृपेनें त्याला चार चं महिन्यात एका कंपनी मध्ये चांगली नोकरी लागते. सर्व चं छान चालेलल असत. अमित च्या नोकरीला तीन वर्ष होत आलेली असतात.
आरोही अमित ला बोलते आपण स्वतः चं घर घेऊया, लोन होत का त्यासाठी प्रयत्न करूयात अमित पण बोलतो हो चालेल निदान प्रयत्न करून तरी बघूयात आपल्या बजेट मध्ये कुठे घर मिळत का ते एजन्ट ला विचारून ला बघतो उदया.
अमित लोन साठी अप्लाय करतो आणि मग वर्षभराने आरती अमित स्वतः च्या रूममध्ये शिफ्ट होतात. छोटासा वन बी एच के घेतात. मुलं पण खूप खुश होतात. सिद्धी पण एम बी बी एस च्या शेवटच्या वर्षाला असते. ती दिवाळी च्या सुट्टी ला घरी आलेली असते तेव्हाचं वास्तुशांती करून नवीन घरात गृहप्रवेश होतो.
सिद्धी पंधरा दिवसांसाठी घरी आलेली असते आणि ती निघायच्या एक दिवस आधी रात्री अमित च्या छातीत जोरात दुखायला लागत. रात्री एक वाजता ची वेळ असते ..आजूबाजूच्या लोकांना आरोही हाक मारते आणि पटकन बिल्डिंग मधल्या एका मुलाच्या गाडीने अमित ला घेऊन जाण्याचं ठरत. गाडी निघते पण हॉस्पिटल च्या दारात पोहच्याच्या आधीच अमित गाडीत आपला जीव सोडतो. आरोही गाडीतच खूप जोरजोरात रडू लागते.
आरोही वर दुःखाचा डोंगर चं कोसळतो. नवीन घरात शिफ्ट झाल्यावर चौदा व्या दिवशीच अमित चा असा अचानक मृत्यू होतो.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत.... आरोही पुढे एकटीने हा संसाराचा गाडा कसा ओढते.... त्यात नुकतीच रूम घेतल्यामुळे लोन पण जास्त असते... ह्या सगळयांतून आरोही कशी वाट काढते...)
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा