आरोही ओंकार ला जावून एक महिना होऊन गेला तरी क्लास ला जात नसते. तीला सारखी ओंकार ची आठवण येऊन रडायला येत असत. ती जेवण करताना पण ओंकार ला हे आवडत ते आवडत असं सारखं करत राही. सिद्धी ला तिची ही अवस्था बघून वाईट वाटत असे. पण सिद्धी ने खूप समजावून पण आरोही क्लास ला जायला काही तयार होईना. शेवटी सिद्धी ने ओरडून चं तीला सांगितले कि उदया मी क्लिनिक ला जाताना तू माझ्याबरोबर बाहेर पडायचं आहेस.
एक महिना झाला तू घरातून बिल्डिंग च्या खाली सुद्धा उतरली नाही आहेस. आरोही..... माझं मन तयार होत नाही आहे, मी नाही येणार असं सिद्धी ला बोलू लागली. पण सिद्धी बोलली मी पण येते उदया चा दिवस क्लास ला तुझ्याबरोबर, तेव्हा कुठे जरा आरोही तयार झाली.
सिद्धी दुसऱ्या दिवशी सकाळ चं आरोही ला बोलली आई तू तयार हो आज आपण क्लास ला जाऊया. मग दोघी पण थोड्या वेळाने क्लास मध्ये पोचल्या. आरोही अगदी शांत शांत होती, सिद्धी तीला बोलत करायचा प्रयत्न करत होती पन आरोही तिच्याच विचारात होती दिवसभर... मग संध्याकाळी सिद्धी बोलली चल आई घरी जाऊया. आरोही हो बोलून निघाली तिच्याबरोबर...
सिद्धी ला आता आई ची काळजी वाटू लागली, म्हणून सिद्धी ने चार दिवस दवाखाना बंद ठेवला आणि आई ला घेऊन रोज ती क्लास ला जाऊ लागली. पण दोन दिवस झाले तरी आरोही मध्ये काहीच सुधारणा नव्हती ती क्लास ला जाऊन नुसती एका खुर्ची वर बसून राही दिवस भर... सिद्धी आता चिंतीत होऊ लागली.
तिसऱ्या दिवशी एक क्लास मधला एक मुलगा आरोही जवळ....टीचर... टीचर... करत रडत आला तेव्हा आरोही ला देव जाणो काय वाटले तिने त्या मुलाला जवळ घेतले आणि रडू लागली... आणि मग क्लास मध्ये थोड्या वेळाने शिकवू लागली. सिद्धी ने मनातल्या मनात देवाचे आभार मानले.. आणि बोलली बाप्पा तू आई ला ह्या सगळ्यातून उशिरा का होईना पण बाहेर काढलेस.
हळू हळू आरोही स्थिरवली. सिद्धी बरोबर मनमोकळेपणा ने बोलू लागली. ओंकार ला वर्ष होत आले होते, पण अजूनही संध्याकाळी तो ऑफिस मधून येण्याच्या वेळेवर रोज आरोही चे डोळे पाण्याने भरून येत असत. सिद्धी तीला खूप समजावत असे, आई सारखं रडून डोकं दुखत राहात तुझं, तू जास्त विचार करू नकोसं असं समजावत असे.
अशीच मध्ये तीन वर्ष सरली. मग आरोही सिद्धी ला बोलू लागली आता आपण तूझ्या लग्नाचं बघूया, तुला स्ववीसाव वर्ष चालू आहे, सिद्धी म्हणाली पण आई मी सासरी गेल्यावर तू पुन्हा एकटीच पडशील. मला हे काही योग्य वाटत नाही आहे... थांबूया अजून एक - दोन वर्ष असं मला वाटत.
आरोही म्हणाली अग...मी राहीन एकटी... आता तू दवाखान्यात गेल्यावर मी असते चं ना एकटी घरी... मी दादा ला पण बोलते आणि एक - दोन विवाह मंडळात तुझं नाव पण नोंदवूया आपण... आरोही चा विचार सिद्धी ला काही जास्त पटलेला नसतो, पण कधीतरी लग्न तर करायला चं हवे ना, ह्या विचाराने ती शांत राहते.
आणि मग स्थळ बघण्यासाठी आरोही काकांच्या मुलाला - दादा ला फोन करून सांगून ठेवते, विवाह मंडळात सिद्धी चं नाव पण नोंदवून ठेवते. तीन महिन्यानी एक चांगलं स्थळ विवाह मंडळाच्या माध्यमातून चालून येत, मुलगा पण डॉक्टर चं असतो. आरोही ला स्थळ आवडतं. मग ती सिद्धी ला पण मुलाचा फोटो दाखवते. सिद्धी ला पण मुलगा आवडतो, आणि मेन म्हणजे तिच्याच फील्ड मधला असल्यामुळे ती खुश होते.
मुलगा आई - वडिलांबरोबर राहात असतो, त्याची आई पण डॉक्टर असते आणि त्याचं एक छोटंसं हॉस्पिटल पण असत. वडील शिक्षक असतात. एक मोठी लग्न झालेली बहीण असते त्याला ती पण डॉक्टर चं असते पण ती लग्नानंतर लंडन ला स्थाईक असते.
सर्व गोष्टी व्यवस्थित असतात , म्हणून मग आरोही दादा ला पण कळवते कि येणाऱ्या रविवारी बघण्याचा प्रोग्राम ठरवू असं, दादा बोलतो हो चालेल. मग रविवारी बघण्याचा प्रोग्राम होतो, सिद्धी आणि मुलाला बोलायला दिल जात, दोघांना पण एकमेकांचे विचार आवडतात. आणि मग होकार होतो.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत...सिद्धी चं लग्न आणि सासर...)
( वाचकहो - कथा आवडल्यास जरूर like करा, तुमचा एक लाईक सुद्धा आम्हा लेखकांसाठी खूप महत्वाचा असतो...)
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा