आरसा आणि सावली भाग - १
“पावसाची रिमझिम सुरू होती. आभाळ ढगांनी भरून आलं होतं आणि त्या ढगांसारखंच देशमुखांच्या घरातही एक न बोललेली दाट शांतता पसरलेली होती. हे घर शहराच्या टोकाला होतं, दोन खोल्यांचं, जुन्या भिंती, पण आठवणींनी भरलेलं.
या घरात राहत होत्या दोन बहिणी, अनघा आणि मृण्मयी.
दोघी सख्ख्या बहिणी असल्या, तरी स्वभावाने त्या अगदी विरुद्ध टोकांच्या होत्या. जणू एक आरसा… आणि दुसरी सावली.
दोघी सख्ख्या बहिणी असल्या, तरी स्वभावाने त्या अगदी विरुद्ध टोकांच्या होत्या. जणू एक आरसा… आणि दुसरी सावली.
अनघा मोठी बहीण. वयाने फक्त तीन वर्षांनी मोठी, पण जबाबदाऱ्यांनी मात्र खूपच मोठी. तिच्या डोळ्यांत कायम थकवा होता, पण चेहऱ्यावर कधीही तक्रार नव्हती. सकाळी सगळ्यात आधी उठणारी, आईसाठी चहा बनवणारी, बाबांच्या औषधांची आठवण करून देणारी, अनघा म्हणजे घराचा न दिसणारा कणा.
मृण्मयी मात्र अगदी वेगळी. तिच्या डोळ्यांत स्वप्नं होती, मोठी, रंगीबेरंगी. तिला नृत्याची आवड, पुस्तकांत रमणं आणि स्वतःचं वेगळं जग. ती थोडी हट्टी, थोडी अबोल आणि खूपच संवेदनशील होती. लोक म्हणायचे,
“ही मृण्मयी जरा स्वार्थी आहे.” पण कुणालाच माहीत नव्हतं, ती किती खोलवर सगळं सहन करत होती.
“ही मृण्मयी जरा स्वार्थी आहे.” पण कुणालाच माहीत नव्हतं, ती किती खोलवर सगळं सहन करत होती.
त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वळणबिंदू आला तो आई गेल्यानंतर. आई, सुमन देशमुख घरातली ऊब होती. तिच्या हसण्यात घर उजळायचं. पण एका आजाराने ती फार लवकर निघून गेली. त्या दिवसानंतर घरातलं घड्याळ जणू तसंच राहिलं, पण वेळ पुढे जात राहिली.
आई गेल्यावर अनघा अचानक मोठी झाली. तिचं शिक्षण अर्धवट राहिलं. कॉलेज सोडून तिने नोकरी धरली. बाबांची तब्येत खालावत चालली होती, मृण्मयी अजून शिकत होती, कोणीतरी तर उभं राहायलाच हवं होतं.
अनघा उभी राहिली. कोणालाही न सांगता. कोणालाही दोष न देता. मृण्मयी हे सगळं बघत होती… पण बोलत नव्हती. ती स्वतःला दोष देत होती, “मीच का स्वप्न बघतेय?” “मीच का स्वार्थी आहे?”
पण अनघाने कधीच तिला थांबवलं नाही. कधीच म्हणाली नाही, “माझ्यासाठी तू तुझं आयुष्य थांबव.”
एक दिवस मृण्मयीने धीर करून विचारलं,
“ताई… तुला कधी वाटत नाही का, तुझंही काहीतरी असायला हवं?” अनघा हसली. थकलेलं, पण मऊ हसू.
“माझं सगळं आहे, तू आहेस, बाबा आहेत.”
एक दिवस मृण्मयीने धीर करून विचारलं,
“ताई… तुला कधी वाटत नाही का, तुझंही काहीतरी असायला हवं?” अनघा हसली. थकलेलं, पण मऊ हसू.
“माझं सगळं आहे, तू आहेस, बाबा आहेत.”
त्या उत्तरात प्रेम होतं… पण एक अपूर्णपणाही होता.
पावसाळ्याच्या त्या संध्याकाळी मृण्मयीच्या हातात एक पत्र होतं. ते पत्र तिच्या आयुष्याला दिशा देणार होतं.
नृत्य अकॅडमीतून आलेलं. शहराबाहेर, पूर्ण शिष्यवृत्ती.
पावसाळ्याच्या त्या संध्याकाळी मृण्मयीच्या हातात एक पत्र होतं. ते पत्र तिच्या आयुष्याला दिशा देणार होतं.
नृत्य अकॅडमीतून आलेलं. शहराबाहेर, पूर्ण शिष्यवृत्ती.
मृण्मयी आनंदाने थरथरत होती. पण पत्र वाचताच तिच्या डोळ्यांसमोर अनघाचा चेहरा आला, सकाळी उठून डबा बनवणारी, उशिरा घरी येणारी आणि तरीही हसणारी.
ती पत्र घेऊन अनघासमोर उभी राहिली. “ताई… मला काही सांगायचं आहे.” अनघाने पिशवी बाजूला ठेवली.
“बोल ना.” मृण्मयीने पत्र तिच्या हातात दिलं. अनघा वाचत राहिली. प्रत्येक ओळीबरोबर तिच्या डोळ्यांत वेगळाच प्रकाश दिसत होता, अभिमानाचा.
“बोल ना.” मृण्मयीने पत्र तिच्या हातात दिलं. अनघा वाचत राहिली. प्रत्येक ओळीबरोबर तिच्या डोळ्यांत वेगळाच प्रकाश दिसत होता, अभिमानाचा.
पण ती काहीच बोलली नाही. क्षणभर शांतता होती.
पावसाचा आवाज वाढत होता. मग अनघा म्हणाली,
“ही तुझी संधी आहे, मृण्मयी.” “पण ताई… घर… बाबा… तू...”
पावसाचा आवाज वाढत होता. मग अनघा म्हणाली,
“ही तुझी संधी आहे, मृण्मयी.” “पण ताई… घर… बाबा… तू...”
अनघाने तिचा हात धरला. “घर सांभाळायला मी आहे. बाबांना मी आहे. पण तुझ्या स्वप्नांना… तूच हवीस.”
त्या क्षणी मृण्मयीला कळलं, अनघा आरसा होती, स्वतःचं दुःख लपवणारी आणि ती स्वतः सावली होती, पण त्या आरशाशिवाय अस्तित्वहीन.
त्या क्षणी मृण्मयीला कळलं, अनघा आरसा होती, स्वतःचं दुःख लपवणारी आणि ती स्वतः सावली होती, पण त्या आरशाशिवाय अस्तित्वहीन.
पण एक प्रश्न अनुत्तरित राहिला, अनघाचं स्वप्न काय होतं? आणि ते कधी पूर्ण होणार? पावसाच्या त्या रात्री, दोन बहिणी एकाच खोलीत होत्या… पण दोघींच्या मनात वेगवेगळे वादळं उठलेली होती..”
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा