आरसा आणि सावली भाग - ३ (अंतिम भाग)
“ताई काय करत असेल?” “तिला थकवा जाणवत असेल का?” “मी चुकीचं केलं का?” असे विचार तिच्या मनात यायचे.
एकदा सरावाच्या वेळी तिने चूक केली. ताल सुटला. शिक्षकांनी थांबवलं. “मृण्मयी, तुझं मन इथे नाहीये.”
ती काही बोलली नाही. पण त्या संध्याकाळी तिने अनघाला फोन केला.
ती काही बोलली नाही. पण त्या संध्याकाळी तिने अनघाला फोन केला.
“ताई… तुला कधी राग येतो का माझ्यावर?” अनघा थोडी आश्चर्यचकित झाली. “का?” “मी तुला एकटी सोडून आले.”
क्षणभर शांतता पसरली. मग अनघा म्हणाली, “तू मला एकटी सोडलेलं नाहीस. तू मला माझं आयुष्य परत दिलंय… कळत नसलं तरी.” त्या वाक्याने मृण्मयीला धक्का बसला. “माझं आयुष्य?” तिने मनात विचार केला.
काळ पुढे सरकत गेला. एका रात्री अनघा ऑफिसमधून उशिरा आली. बाबा खोलीत नव्हते. ती घाबरली. आवाज दिला. पण प्रतिसाद नाही.
शेवटी ती स्वयंपाकघरात गेली, बाबा खाली पडले होते.
रुग्णालयात धावपळ झाली. डॉक्टरांनी सांगितलं, ताण, वय, आणि दुर्लक्ष. काही दिवस निरीक्षणाखाली ठेवावं लागेल.
रुग्णालयात धावपळ झाली. डॉक्टरांनी सांगितलं, ताण, वय, आणि दुर्लक्ष. काही दिवस निरीक्षणाखाली ठेवावं लागेल.
त्या रात्री अनघा रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये बसली होती. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यांत असहाय्यपणा होता. तिने मृण्मयीला फोन केला. “बाबांना अॅडमिट केलंय.”
दुसऱ्या टोकाला क्षणभर शांतता होती.
दुसऱ्या टोकाला क्षणभर शांतता होती.
“मी येते,” मृण्मयी म्हणाली. “नको,” अनघा पटकन म्हणाली. “तुझा कार्यक्रम...” “ताई,” मृण्मयीचा आवाज ठाम होता, “आज मी बहिण आहे. कलाकार नाही.”
दोन दिवसांनी मृण्मयी घरी आली. तिला पाहताच अनघाच्या डोळ्यांत पाणी आलं. ती काहीच बोलली नाही. फक्त मृण्मयीला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत सगळं होतं, थकवा, प्रेम, अपराधभाव आणि दिलासा.
बाबांची तब्येत हळूहळू सुधारत होती. तिघंही पुन्हा एकत्र जेवत होते. घरात पुन्हा आवाज परतले होते. एका संध्याकाळी मृण्मयीने कपाट उघडलं आणि स्केचबुक्स पाहिल्या.
“ताई… हे तू काढलेस?” अनघा गप्प राहिली. “इतकं सुंदर आहे. तू कधी सांगितलंच नाहीस.” अनघा हसली, पण डोळे ओले झाले. “सांगायची वेळच आली नाही.”
मृण्मयीने स्केचबुक तिच्या हातात दिलं. “आता आली आहे.”
मृण्मयीने स्केचबुक तिच्या हातात दिलं. “आता आली आहे.”
काही महिन्यांनी शहरात एक लहानसं कला प्रदर्शन भरत होतं, स्थानिक कलाकारांसाठी. मृण्मयीने अनघाचा फॉर्म भरला, जबरदस्तीने.
“माझं काहीच येणार नाही,” अनघा म्हणत होती. “ताई,” मृण्मयी शांतपणे म्हणाली, “तू आयुष्यभर माझ्यावर विश्वास ठेवला. आज एकदा माझ्यावर ठेव.”
त्या प्रदर्शनात अनघाचं चित्र लावलं गेलं, दोन बहिणी, एक आरसा आणि एक सावली. लोक थांबून पाहत होते. काहींनी विचारलं, “चित्रकार कोण?” अनघा थरथरत पुढे आली. “मी.” त्या क्षणी तिला जाणवलं, ती फक्त कुणाची तरी जबाबदारी नव्हती. ती स्वतः एक व्यक्ती होती.
मृण्मयी पुन्हा अकॅडमीला परतली, पण आता वेगळ्या मनाने, जास्त स्थिर, जास्त कृतज्ञ. अनघा पार्ट-टाइम चित्रकलेचे क्लास घेऊ लागली. पूर्ण स्वप्न अजून पूर्ण झालं नव्हतं, पण पहिलं पाऊल टाकलं गेलं होतं.
बाबा दोघींना पाहून म्हणायचे, “आई असती तर खूप आनंदी झाली असती.” एक संध्याकाळी मृण्मयीने विचारलं, “ताई, आपण कोण आहे, आरसा की सावली?”
अनघा हसली. “आपण दोघीही आरसे आहोत. एकमेकींना खरं दाखवणारे.” घरात पुन्हा शांतता होती…
पण यावेळी ती बोचरी नव्हती. ती समाधानाची होती.
अनघा हसली. “आपण दोघीही आरसे आहोत. एकमेकींना खरं दाखवणारे.” घरात पुन्हा शांतता होती…
पण यावेळी ती बोचरी नव्हती. ती समाधानाची होती.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा