" हो, पण कुठं जातं आहात ते तर नाही ना सांगितल ? "
" आता सगळ्या गोष्टी तुला माहिती पाहिजे का ? " वैभव ने वैतागून विचारलं.
" पण तरी.."
" आता एकदा सांगितलेलं समजतं नाही का ? बाहेर जायचं आहे. काहीतरी महत्वाचं काम आहे. तितकं समजलं ना ! मग बास झालं की. तुला कशाला बाकीची पंचायत करायची आहे.
हे बघ पूर्वा आता तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही. उशिर झाला तर सगळे मलाच ओरडतील. तू आईनं सांगितलेलं काम करून ठेव. राजला मी सोबत घेऊन जातं आहे. मुलांच्या सोबत रमेल तो. तुला पण घरी शांत पणे काम करता येईल."
त्याचा फोन वाजला. बाबा कॉलिंग. फोन उचलत त्याने गॉगल लावत. त्याच्या कपाटातल लॉकरला कुलूप लावलं. लॉकरची किल्ली त्याच्या वॉलेट सोबत खिशात टाकली. मोबाईल वर बोलतच तो रुम मधुन बाहेर पडला. पूर्वा त्याला असं जातांना फक्त बघत राहिली.
ती त्याच्याशी बोलायला म्हणून बाहेर आली तर अजून सगळी मंडळी बाहेर थांबली होती. दोघी नणंदा एका कार मध्ये बसल्या होत्या. मुलं पाठीमागे बसली होती.खिडकीतून तिला हाताने बाय करत होती. तर पुढच्या कार मध्ये सासरेबुवा जावई आणि वैभव एका कार मध्ये बसले होते. सगळे हसत खेळत होते.
पण सासू बाई कुठं आहेत ? ही सगळी लोकं का थांबली आहेत ? कदाचित मला बोलवायला थांबल्या आहे का ? दहा मिनिटांत सुनंदा बाई बंगल्याच्या गेट मधुन आत येताना दिसल्या. सोबत सासू बाई पण होत्या. त्या काहितरी बोलतं उभ्या होत्या. सुनंदा बाईशी काहितरी बोलणं करून सासूबाई कार मध्ये बसल्या. तशा दोन्हीं कार निघून गेल्या.
पूर्वा पण घरात आली. सुनंदा बाई त्यांचं काम करत होत्या. त्यांनी आधी भांडी स्वच्छ केली.त्यांनी झाडून काढल. फरशी पुसली. सासू बाईची रुम स्वच्छ करुन झाल्यावर त्यांनी खोलीला कुलूप लावलं. हे बघून पूर्वाला आश्र्चर्य वाटलं. पण त्या नंतर सुनंदा बाईनी बाकीच्या खोल्याना पण तसचं केलं. केर फरशी झाल्यावर सगळया खोल्या त्यांनी कुलूप लावून बंद केल्या. किल्ली त्यांच्या पदराला बांधली. तिला वाटलं घरी जातांना त्या किल्ल्या देऊन जातील. त्यांनी फक्त तिची खोली, हॉल किचन तेवढं मोकळं होत.
" अहो काकु कुलूप कशाला लावलं. मी आहे घरात." पूर्वा म्हणाली.
सुनंदा काकूंनी तिच्या कडे बघितलं त्या म्हणल्या,
" वहिनींनी काम झाल्यावर सगळया खोल्यांना कुलूप लावायला सांगितल आहे."
" वहिनींनी काम झाल्यावर सगळया खोल्यांना कुलूप लावायला सांगितल आहे."
त्यांनी असं सांगितल्या नंतर पूर्वा ने काही विचारण योग्य नाहीं. हे समजुन गप्प राहणं पसंत केले.
त्यांच काम झाल्यावर त्या घरी जायला निघाल्या. त्यावेळीं तिने सुनंदा बाईंना किल्ली मागितली. तर त्या म्हणाल्या,
त्यांच काम झाल्यावर त्या घरी जायला निघाल्या. त्यावेळीं तिने सुनंदा बाईंना किल्ली मागितली. तर त्या म्हणाल्या,
" काकु तुम्ही तर काम करून जात आहात. तर जातांना किल्ली तर देऊन जा. सगळी मंडळी घरी आल्यावर त्यांना त्यांच्या खोल्याचे दरवाजे उघडावे लागतील तर किल्ल्या घरी हव्यात ना ! " पूर्वा ने विचारलं.
" माफ करा सुनबाई, मोठ्या वहिनी साहेबांनी सांगितल आहे, काम करुन झाल्यावर किल्ल्या शेजारच्या इनामदार वहिनींच्या घरी ठेवायला." सुनंदा बाई म्हणल्या.
असं म्हणून सुनंदा बाई त्यांच्या दुसऱ्या कामाला निघून गेल्या. ती मटकन सोफ्यावर बसली. तिने खिडकीतून बघितले. तर सुनंदा बाई शेजारच्या इनामदार यांच्या बंगल्यात जातांना दिसल्या.
पूर्वा ने अशा तर आयुष्याची कल्पना केली नव्हती ना ! तिला जेंव्हा तिचं पहिलं प्रेम मिळालं होत तेव्हा ती स्वतःला जगातील सर्वात सुखी मुलगी समजत होती. तिची खूप काही मोठी स्वप्न नव्हती, एक छान कुटूंब, प्रेम करणारा नवरा, गोंडस मुलं, आई वडीलांसारखे प्रेम करणारे सासू सासरे, एक छोटं घर, एकदम सुखी संसार ! तिच्या कडे सगळं तर होत. मग असं का घडलं !
तसं बघायला गेलं तर घरात नोकर चाकर होते. नवरा पण प्रेमळ होता. पण तिचा सामना तिच्या सासरच्या मंडळींशी पडला होता. सासरच्या मंडळींनी लेकाला तर स्वीकारलं होतं. पण नाईलाजाने तिला स्वीकारलं होतं. कारण तिला झालेला मुलगा.त्यांच्या घराण्याचा अंश. वंशाचा दिवा.
पण तिचं काय ? तिला काय मिळालं ? घरात साफ सफाई करायला नोकर होते. पण तिच्या हिस्याला आलं ते घराची जबाबदारी, स्वयंपाक, मुलांची आया. जेव्हा पासून हे दोघं मुलाला घेऊन या बंगल्यात राहायला आलो तेव्हा तर सगळं छान होत. वैभव पण चांगला वागत होता. पण इथ बंगल्यात आल्या पासून तो बदलून गेला होता. आई वडीलांना जास्त वेळ देत होता. त्यांचं बोलणं ऐकतं होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा