तिच् काही चुकलं तर तिला बोलतं होता. भांडणं होत. तिच्यावर चिड चिड करत होता. आई वडील जे सांगतात तसाच वागत होता. सगळं काही तिच्या हातात होत, पण तिला काहीच अधिकार नव्हता. ना बोलण्याचा ना काही मत मांडण्याचा. तिला कायम गृहीत धरलं जातं होत.
आज तिला तिच्या वागण्याचा पश्र्चाताप होत होता. तिने तिच्या आई वडिलांचा अपमान केला होता.
आज तिला तिच्या वागण्याचा पश्र्चाताप होत होता. तिने तिच्या आई वडिलांचा अपमान केला होता.
आज सासूबाईंनी पुरण पोळ्या करायला सांगितल्या होत्या. ती सगळ्यांच्या साठी स्वयंपाक करत होती. भांड्यांचा ढीग साचलेला होता. ती भांडी स्वच्छ करायला लागली. तिचं आवरून झालं तेव्हा दरवाज्यातून दोन कार आत आलेल्या दिसल्या.
वैभव शेजारच्या इनामदार काकूंच्या घरून घराच्या किल्ल्या घेऊन आला. तो पर्यंत घरच्यांनी सगळं सामान उचलून त्यांच्या रूम मध्ये नेलं. ती सगळ्यांना जेवायला बोलवायला त्यांच्या रुम मध्ये गेली.
त्यावेळी नेहा तिने घेतलेले कपडे बघत होती. आज दागिन्यांची खरेदी करुन आले होते. ती गळयात हात घालून बघत होती. सगळे तिचं कौतुक करत होते. समोर एकदम पूर्वाला आलेलं बघून नेहा ने पटकन गळ्यातला हार काढला. पटकन बॉक्स मध्ये ठेवून दिला. तिला आलेलं बघून सासू बाई एकदम चिडल्या,
" पूर्वा तुला काय कळत का नाही ? कोणाच्याही रूम मध्ये येण्या आधी दार वाजवायच असतं ? काय झालं ? काय हवंय ? एकदम आत का आलीस ? कशाला आलीस आमच्या खोलीत ?"
सासू बाईंना असं चिडलेल बघून पूर्वा घाबरली. बावचळली. ती कशी बशी बोलली,
" ते तुम्हाला जेवायला बोलवायला आले होते. जेवणं तयार आहे."
" जेवणं काय कुठं पळून जाणार आहे का ? जरा फ्रेश होवून जेवायला येतच होतो ना ? तुझी हिंमत कशी झाली आईनं बोलवल्या शिवाय तू इथ कशाला आलीस ?" वैभव तिच्यावर डाफरला. त्याचं चिडलेल रूप बघून पूर्वा पार कोलमडून पडली.
" वैभव तुम्ही अस कसं बोलतं आहात माझ्याशी ? मी पण या घरातील एक सदस्य आहे. मी आई बाबांच्या रूम मध्ये नाही येऊ शकत का ?"
वैभवच असं तोडून बोलणं ऐकून तिला सहन झालं नाही. डोळे तुडुंब भरले होते. ती पण चिडली. ती वैभवला जाब विचारतात तसं विचारते.
किती दिवस ती तरी नवऱ्याचा असा दुस्वास सहन करणार. तिने प्रेम केलं होतं. कोणता गुन्हा नाही !
किती दिवस ती तरी नवऱ्याचा असा दुस्वास सहन करणार. तिने प्रेम केलं होतं. कोणता गुन्हा नाही !
" नाही येऊ शकत तू या खोलीत, जो पर्यंत मी बोलवत नाही. मला नाही आवडत तू इथ आलेली. इथ दाग दागिने ठेवलेले असतात."
अचानक सासू बाईंच्या तोंडातून असं बोलण ऐकुन ती जागीच थिजली. तिला वाटलं की, कोणी तरी तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
" तुम्हाला माझ्या वर विश्र्वास नाही, पण घरातील कमावल्या बाई वर विश्र्वास आहे. मी या घरची एकुलती एक सून आहे.भविष्यात हे सगळं मलाच सांभाळायचं आहे. सुनंदा काकु कडून तुम्ही घरातील काम करून घेतली. त्यांना सांगीतलं खोल्यांना कुलूप लाव. किल्ल्या इनामदार काकूंच्या घरी ठेव. मी घरात असताना देखील किल्ल्या तुम्ही शेजारच्या इनामदार काकूंच्या घरी ठेवायला सांगीतलं. माझ्यावर किंचीत देखील भरवसा नाही का ? याचा काय अर्थ लावायचा आई मी ? " पूर्वा पोट तिडकीने बोलतं होती. आज सगळ काही तिच्या सहन शक्तीच्या बाहेर गेलं होतं.
" आई नको म्हणु मला. मी सासू आहे तुझी. आणि हो, बरोबर बोलतं आहेस तू, माझा नाही विश्र्वास तुझ्यावर. जी मुलगी तिच्या आई वडिलांच्या विश्वासाला पात्र नाही ठरली तिच्यावर मी कसा काय विश्र्वास ठेवू ?
तू विसरलीस का ? तु तूझ्या आईचे दागिने आणि वडिलांनी शेती साठी आणलेले पैसे घेऊन पळून गेली होतीस. तुझा काय भरवसा, तू संधी मिळाली तर आमच्या घरातील दाग दागिने घेऊन पळून जाणार नाहीस ? तुझा काय भरवसा ?
तू तुझं वागणं विसरली असशील पणं मी नाही विसरू शकत." सासू बाई परखड पणे म्हणल्या.
तू तुझं वागणं विसरली असशील पणं मी नाही विसरू शकत." सासू बाई परखड पणे म्हणल्या.
सासु बाईंचं बोलणं ऐकुन तिला असं वाटतं होत की, कोणी तरी तिच्या कानात तप्त शिशाचा रस कानात ओतत आहे. तिच्या कडे त्यांच्या या आरोपाच काहिही उत्तर नव्हत. ती गपचूप खाली मान घालुन बाहेर आली.
ती तिच्या बाथरूम मध्ये बसली. वरून शॉवर चालु होता. पाणी तिच्या डोक्यावर पडत होत. पण आता वेळ निघून गेला होता. आज कोणी तरी तिला तिच्या वागण्याचा आरसा दाखवला होता. त्यातलं तिचं प्रतिबिंब बघून तिला स्वतःची किळस वाटली. आता तिला या विभिस्त रुपासह जगण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.
विश्र्वास गमवायला एक क्षण पुरेसा आहे, पण कमवायला आयुष्य कमी पडतं.
आज तिच्या कपाळावर विश्र्वास घातकी हा शिक्का बसला होता. कदाचित तो तिच्या शेवटच्या श्वासासोबत जाईल.
आज तिच्या कपाळावर विश्र्वास घातकी हा शिक्का बसला होता. कदाचित तो तिच्या शेवटच्या श्वासासोबत जाईल.
खरं म्हणतात, आई वडीलांचे आशीर्वाद नसतील तर कधीही सुख लाभत नाही.
समाप्त
© ® वेदा
कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.
या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा