स्पर्धेची तारीख ठरली आणि बरेच जण आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत होते. मधुकर काकांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचा दिवस उजाडला आणि प्रत्येक जण आपापल्या साहित्यासह ठरलेल्या ठिकाणावरील येऊन बसले. प्रत्येकाला जो काही विषय आवडेल त्याप्रमाणे चित्र काढत होते. मधुकर काका सुद्धा चित्र काढण्यात रमून गेले होते. स्पर्धेची वेळ संपत आली होती आणि पोलिसांनी कुतूहलाने मधुकर काकांच्या जवळ जाऊन त्यांच्या चित्रात डोकावून पाहिले तेव्हा त्यांना एका निरागस मुलाचे चित्र आढळले. ते पाहून सर्वांना खूप आश्चर्य वाटले. अगदी हुबेहूब चित्र मधुकर काकांनी काढले होते अर्थात ते त्यांच्या नातवाचे असेल असे सर्वांनाच वाटले.
स्पर्धा असल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली तसेच त्यातील नियम व अटी देखील सर्वांना समजले. स्पर्धा झाल्यानंतर काही दिवसातच त्याचा निकाल जाहीर झाला आणि मधुकर काकांचा पहिला नंबर आला. त्यावरून त्यांचा फोटो आणि बक्षीसाची रक्कम व नियम अटी सारे काही न्युज पेपरमधून छापण्यात आले. बक्षीस समारंभाच्या वेळी सर्वजण उपस्थित होते. यामधील मधुकर काकांचा मुलगा कोणता? हे जाणून घेण्यासाठी पोलीस इकडे तिकडे पाहू लागले पण त्यांनी त्यातील नेमका त्यांचा मुलगा कोण हे ते ओळखू शकले नाहीत. समारंभाला सुरुवात झाली आणि बक्षीस वितरण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा मधुकर काकांचे नाव घेण्यात आले. मधुकर काका स्टेजवर गेले तेव्हा त्यांच्या मुलाला देखील स्टेजवर बोलावण्यात आले पण त्याचा मुलगा काही आला नाही ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मधुकर काका स्टेजवर गेले आणि त्यांचे डोळे भरून आले. त्याचा मुलगा आला नसेल अशा उद्देशाने नाराज होऊन मधुकर काकांना बक्षीस देण्यात आले. मधुकर काका हातात बक्षीस घेणार इतक्यात "आजोबा" म्हणून त्यांच्या कानावर हाक पडली आणि ते तिकडे पाहू लागले तेव्हा त्यांचा नातू धावत त्यांच्याकडे येत होता. सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. त्या नातवाच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा आणि सून देखील येत असताना त्यांना दिसले आणि त्यांचा चेहऱ्यावरील आनंद निघून गेला.
मधुकर काकांनी नातवाला मिठीत घेतले. स्टेज खाली मुलगा आणि सुनेला पाहून त्यांनी हातात माईक घेतला. ते बोलू लागले, "वृध्द माता पित्यांना आश्रमात ठेवणाऱ्या नालायक मुलांना जन्माला घालण्यापेक्षा मुलं न झालेलीच बरे. लहानपणी त्यांचे सगळे हट्ट पुरवले, त्यांना हवे नको ते सारे काही दिले, आपली इच्छा अतृप्त करून मुलांची इच्छा पूर्ण केली पण मोठे झाल्यानंतर मुलांनी आश्रमाचा रस्ता दाखवला. घरातून बाहेर काढले ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. देवाने अशी मुले कुणाला देऊ नयेत. आपल्या मुलाने आपल्याशी प्रेमाने बोलावे, आपल्याला काही हवे नको ते पहावे असे प्रत्येक बापाला वाटत असते पण त्या मुलाकडे आपल्यासाठी एक क्षणही नसतो. मुलाशी बोलण्यासाठी आसुसलेला बाप मुलगा त्याला वृद्धाश्रमात सोडल्यानंतर आतून खूप तुटून जातो. अरे, आपला मुलगाच आपला राहिलेला नसतो तर सुनेवर काय विश्वास ठेवणार? जिथे आपली मुलगी आपला हात धरून चालायला शिकते ती एका क्षणी बापाचा सोडून दुसऱ्या काल परवा भेटलेल्या मुलासोबत पळून जाते. एक मुलगी आपला विश्वासघात करू शकते तिथे सुनेवर विश्वास कसा ठेवायचा? जिथे मुलगाच आपला राहत नाही तिथे ही परक्या घरातून आलेली मुलगी तरी आपली कशी काय होऊ शकेल? एका बापाचे काळीज हे मुलगा जेव्हा त्या वयाचा होईल तेव्हाच समजते पण त्यावेळी त्याचाही उशीर झालेला असतो. जैसी करणी वैसी भरणी असे म्हटल्याप्रमाणे प्रत्येकावर ही वेळ येतच असते त्यामुळे चांगले पुण्य करत रहा. देवाला माझे एकच मागणे आहे की पुढच्या जन्मी जर अशी मुले जन्माला घालणार असेल तर मला निःसंतान केलेलं चांगलं." असे म्हणून नातवाचा गोड पापा घेऊन ते स्टेजवरून खाली उतरले. त्यांनी बक्षिसाची मिळालेली सर्व रक्कम वृद्धाश्रमाला देऊन टाकली आणि ते आता हसत खेळत वृद्धाश्रमातच राहू लागले.
काकांच्या मुलाने कितीही त्यांची माफी मागितली तरीही ते आता त्याला माफ करू शकत नव्हते. मुलाला आता पश्चाताप होऊन काय उपयोग त्याच्या हातातून वेळ निघून गेली होती. काका आता त्यांचे शेवटचे क्षण हे वृद्धाश्रमात आनंदाने राहू लागले. त्यांच्या तारुण्यातील गमती जमती त्यांच्या मित्रांसोबत शेअर करू लागले. पूर्वीच्या काकांमध्ये आता खूप बदल झाला होता कारण त्यांनी त्यांच्या मनातील बोल त्यांच्या मुलाला बोलून दाखवले होते. ते आता मन मोकळेपणाने राहत होते तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्यांना वाईट वाटत होते पण तो नाईलाज होता.
समाप्त..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा