मनात अनामिक हुरहूर दाटली होती. आजतरी मला मुलगा पसंत करेल की नाही. या विचाराने नैना अस्वस्थ होती.
" काय ग सरांनी तुला केबिन मधे बोलवल आहे मेहता इंडस्ट्रिजची फाईल घेऊन." स्मिता बारीकसा चिमटा घेत बोलत होती.
" इथेच आहे बोल ना. काय तुझे."
" अग सर तुला कधी पासून आवाज देतात. लक्ष कुठे आहे तुझे."
" थांब आधी सर काय म्हणतात ते पाहून येते. उगाच नंतर ओरडा खायला लागेल."
" तुमचे हार्दिक अभिनंदन. मेहता इंडस्ट्रिजचे तुम्ही दिलेल प्रेजेंटेशन त्यांना खूप आवडले. आपल्या कंपनीला यातून खूपच फायदा होणार आहे."
" हो.सर, करते मी काम."
" काम काय करता. मी काय बोलतो आहे."
" साॅरी सर. माफ करा. मी पुन्हा अशी चूक करणार नाही."
" काय होतय आज तुम्हांला. तब्येत बरी आहे ना."
" हो सर मी ठिक आहे."
" अभिनंदन बोललो मी तुम्हांला. तुमचे प्रेजेंटेशन मेहता कंपनीला खूप आवडले आहे."
" वाव सर. हि खूप आनंदाची बातमी आहे."
" हेच तर केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करत आहे."
" माझ थोड लक्ष नव्हत सर बोलण्याकडे."
" बाहेर चला आता माझ्या बरोबर सर्वांसमोर तुमची होणारी प्रगती सांगायची आहे. तुमचा आदर्श बाकीच्या सहकार्यांनी देखील ठेवायला हवा."
" आपल्या कंपनीला नविन आणि महत्वपूर्ण प्रोजेक्ट आज नैना मुळे मिळाले आहे. तिचा आदर्श तुम्ही सर्वांनी घेऊन तिच्या इतकीच मेहनत सर्वांनी करायची आहे."
सर्वजण टाळ्या आणि अभिनंदनाचा वर्षाव नैनाला करत होते. नैना मात्र वेगळ्याच विषयात गुंतली होती.
" नैना सर्वजण तुमचे अभिनंदन करतात. परत हरवलात का मघाशी हरवला होता तसे."
" नाही सर. आहे मी इथेच. सर्वांची मी आभारी आहे."
" असेच काम सर्वांनी करुन दाखवून कंपनीला पुढे नेण्याचे प्रयत्न प्रत्येकाने करुन दाखवायचे आहे."
सर्वजण आपला होकार दर्शवत आपल्या कामावर निघून जातात.
" सर, आत येवू का मी."
" ये नैना. काय झाले."
" आज मी थोड लवकर घरी जावू शकते का."
" तारीफ केली तर हा आदर्श ठेवणार आहेस का सर्वांसमोर." बाॅस हसत बोलत होता.
" थोड महत्वाच काम होत."
" ठिक आहे. आज मी खूश आहे. तुला नाही म्हणू शकत नाही.
" आलीस का घरी तू. पटकन फ्रेश होऊन ती साडी मी तुझ्याकरता टेबल वर ठेवली आहे. नेसून घे."
" अस अजून किती वेळा माझ्या बाबतीत घडणार आहे. कंटाळा आला आता मला या गोष्टीचा." नैना वैतागून बोलत होती.
" वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा कोण बदलू शकले का? " आई तिला समजावत शांतपणे सांगत होती.
" हे कुठे तरी आता बदलायला हव. माझ्या पोरीला अस अजून किती वेळा तयार होऊन लोकांसमोर उभ राहायला लागणार आहे काय
माहित? "
माहित? "
" आता तुम्हीपण द्या तिला प्रोत्साहन." सारीका थोडे डोळे मोठे करुन श्यामरावांकडे बघत होती.
" काय कमी आहे आपल्या पोरीत. शिकलेली आहे. कमावती आहे. एकसो एक मुलांची लाईन बघ तिच्या करता."
" म्हणून ५० व स्थळ पाहत आहोत तिच्या करता आपण. आता काय १०० आकडा करायचा आहे का? कुठेतरी अॅडजेस्ट हिने देखील करायला हव."
" बर चर मला फोन आला पाहुणे मंडळीचा. मी येतोय घेऊन त्यांना. घराजवळच्या चौकात त्यांची गाडी थांबली आहे."
" नैना तयार आहेस ना तू. पाहुणे मंडळी इतक्यात येतच असतील."
" आई मी झाली आहे तयार."
मुळ चौकशी तसेच ख्याली खुशाली घेतल्यानंतर मुलीला बोलवण्यात आले होते. त्यानंतर नैना आणि राज ला एकत्र बोलायला वेळ दिला होता.
दोघांची पसंती घरच्यांना समजली होती.
" आता पुढची बोलणी देखील करायला हवी." राजचे बाबा बोलत होते.
" नैना तू आत्ता नोकरी करते. पण लग्नानंतर तुझी नोकरी संसाराच्या आड येता कामा नये. म्हणून तू लग्नानंतर नोकरी करायची नाही."
" काय? हे काय बोलताय. मी माझी नोकरी नाही सोडू शकत."
" संसार करण्यासाठी स्त्रीने घरातली जबाबदारी उचलून घरच्यांची काळजी घेतली पाहिजे."
" काम सांभाळून पण मी हि गोष्ट करु शकते."नैना आपली बाजू मांडत होती.
अखेर राजच्या घरचे लोक नैनाच्या हट्टीपणा मुळे लग्नाचे स्थळ नाकारुन निघून गेले होते.
बराच वेळ झाला नैना तोंडातून एक अक्षर देखील काढत नव्हती. इतक्यात तिच्या फोनची रींग वाजत होती.
" नैना, उद्या आम्ही सर्वांनी तुझ्याकरता छोटिशी पार्टी आयोजित केली आहे."
" मी कंपनीत उदया आल्यावर बोलते."
" बेटा होईल सगळे नीट. योग्य वेळ आली की, एक क्षणभर देखील पुरेसा असेल बघ. "
" अस म्हणून काही होत का ओ. अस बोलून उगाच काय मग हातावर हात ठेवून राहायच का आपण. मी उद्या जोशी काकांकडे जावून नैनाची परत पत्रिका एकदा दाखवून येते."
" सारखी तिची पत्रिका पाहून वेगळे काय घडणार आहे का? "
" तुम्ही नका बोलू काही. तुम्हांला काय कळत ज्योतिष शास्त्र."
" आई-बाबा नका तुम्ही दोघ भांडू माझ्याकरता. बाबा म्हणतात तस प्रयत्नां बरोबर नशिबाची पण साथ असावी लागते."
" सध्या माझ्यापुढे एकच ध्येय आहे बघ."
" पोरीचं लग्न दुसर काय असणार? "
" आपल्याला जरी नैनाच्या लग्नाची घाई नसली तरी, आजूबाजूचे लोक, शेजार-पाजार, कोणत्या कार्यक्रमाला गेले कि सगळ्या बायका मला नैनाच्या लग्नाविषयी बोलतात."
" मला कधी कोणी या विषयावर चर्चा करायला येत नाही."
" असे प्रश्न बायकांना जास्त विचारले जातात."
" नैनाचा लग्नाचा विचार माझ्या ध्यानी मनी नसताना लोक अस विचारतात मग वाटत आता ठरायला हवे तिचे लग्न."
" लोकांच बोलण कधी मनाला लावून घ्यायच नसत. ते आपल्या आजारपणात येतात का आपल्या सोबत. आपल आपणच करतो ना? एका कानाने ऐकायच आणि सोडून द्यायचे."
नैना आॅफिसमधे गेल्यावर काय कारण सांगेन? नैनाचे आई-बाबा नैनाच्या लग्नाविषयी आणखी काय तोडगे काढतील पाहूया पुढिल भागात.
अष्टपैलू स्पर्धा
प्रेमकथा
प्रेमकथा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा