मागील भागात आपण पाहिले नैना तिला पाहुणे बघायला येणार म्हणून त्याच विचारात गुंतलेली होती. तिचे प्रेजेंटेशन यशस्वी होते. आॅफिस मधे कौतुक होते. घरी आल्यावर मात्र मुलाकडच्या लोकांनी पसंती दर्शवली तर खर, पण नैनान लग्नानंतर नोकरी सोडून संसाराकडे लक्ष दिले पाहिजे. नैना हि गोष्ट सोडायला तयार नव्हती. शेवटी अजून एक नकार नैनाच्या घरच्यांनी पचवला होता. आता पुढे,
" तुम्ही म्हणताय तस बरोबर आहे. एका कानाने ऐकायच आणि दुस-या कानाने सोडून द्यायचे. हे बोलण सोप आहे. प्रत्यक्षात मात्र मन सतत तोच विचार करत राहते."
" तुला जस वागायच तस वाग मग आता. काय बोलू मी. एखादा माणूस तुमच्या तोंडापर्यंत घास नेऊ शकतो. तो खायचा का नाही हे त्या व्यक्तिने ठरवायचे असते."
" हो ना, मग मला माझ्या पद्धतीने प्रयत्न करु दे."
" कर हो माताराणी. तुला समजावून मी थकलो आता."
" नैना फोनवर तू आल्यावर सांगते बोलली होती. काय झाले ग. "
" सेजल काय लपवायचे तुझ्यापासून. काल पाहुणे बघायला आले होते. पसंती पण झाली होती."
" अग ही तर कमाल बातमी आहे."
" पुढे तर ऐक. मी लग्नानंतर नोकरी करायची नाही."
" अस कस. नोकरी करायची कि नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे."
" हे आपल्याला पटतय पण त्यांचे काय? "
" जावू दे जास्त विचार नाही करत बनायच. याच्यापेक्षा तुला जास्त समजून घेणारा मुलगा तुझ्या नशिबात असणार."
" हाच विचार करत मी स्वत:ला सावरत आहे. देव माझ्याकरता याच्या पेक्षा नक्कीच काहीतरी चांगले लिहून ठेवत असणार."
" आज आम्ही तुझ प्रेजेंटेशन यशस्वी झाले म्हणून रात्री छोटिशी डिनर पार्टी आयोजित केली आहे. तुला छान वाटेल. तुझ मन देखील त्याच त्याच विचारातून बाहेर येईल."
" बरोबर आहे तुझे. मी येईल नक्की."
" यायलाच हवे पार्टी तुझ्याकरताच आहे."
" नैना आज मूड एकदम छान आहे तुझा. सकाळी घरातून जाताना तुझे तोंड पडलेलं होते."
" आई आज आॅफिसमधल्या मैत्रिणींनी माझ्याकरता पार्टी ठेवली आहे. मी आवरुन तिकडेच जाणार आहे."
" अरे वा, छान की पण कारण काय असच का? तुझा तर वाढदिवस पण लांब आहे अजून."
" काल या पाहुणे बघायला येणार म्हणून आनंदाची बातमी तुम्हांला सांगितलीच नाही."
" काय झाले? पटकन सांग. किती वेळ लावशील सांगायला."
" जरा श्वास घे आई. मी दिलेल मेहता इंडस्ट्रिजचे प्रेजेंटेशन त्या कंपनीला खूप आवडले म्हणून सरांनी माझे सर्वांसमोर खूप कौतुक केले."
" कालच सांगायच ना मग. काहीतरी गोडाधोडाच बनवल असते. आज सांगते तर तूच नसशील गोड खायला."
" मायलेकी मधे काय गोडाधोडाचा बेत बनतोय."
" बाबा, मला ना आॅफिसमधे प्रेजेंटेशन करता कौतुकाचा वर्षाव केला सर्वांनी. सर पण आनंदी आहे. कंपनीला खूप फायदा देखील होणार आहे बोलले."
" तुझा अभिमान वाटतो पोरी. पोरगा नसल्याचे दु:ख तू भरुन काढतेस. मुला इतकाच आनंद तू आमच्या पुढ्यात ठेवत असते. आणि हो तुमच्या दोघींच बोलण माझ्या कानावर पडल होत. म्हटले,पोरीच कौतुक तिच्या तोंडातून पुन्हा एकदा अनुभवावा."
" बाबा तुम्ही पण ना."
" बर ऐका आज जा तू मैत्रिणींबरोबर. उद्या आपण तुझ्या आवडीच्या पंचमी हाॅटेलला जावूया."
" अजून एक कारण आहे माझ्याकडे आनंद साजरा करायला."
" काय ग आई. "
" ते मी आज जोशी काकांकडे गेले होते."
" थांब जरा, नैना तुला जायचे ना बाहेर तू आवरायला घे."
" बाबा आई काय सांगते ते ऐकून जाते."
" नको तू आवर. मी सांगतो तुला, तू घरी आल्यावर रात्री."
" चालेल,आवरते मी."
" अग जरा वेळ पाहून बोलत जा. उगाच आनंदावर विरझण घातल असते तू नैनाच्या."
" अहो, नाही. जोशी काकांनी आनंदाची बातमी सांगितली आहे. आपल्या नैनाच लग्न याच वर्षी होणार आहे. ती पुढच्या वर्षी तिच्या सासरी असणार."
" बातमी चांगली आहे. पण ती खरी झाल्यावर व्यक्त करण्यात आनंद आहे. असो ही गोष्ट नको सांगत बसू तिला. कामच टेन्शन असते तिला. आता ती प्रगतीच्या दिशेने पावले उचलत आहे. तिला तीचा ट्रॅक पकडू दे आता."
" मी काय तिच्या प्रगतीच्या आड येते का? असे वाटते का तुम्हांला."
" तसे नाही ग. पण सारखा लग्नाचा विषय काढून तू तिच्या मनात उगाच तोच विचार करण्यास भाग पाडते. तिचे काम करताना देखील आॅफिस मधे लक्ष लागत नसेल बघ. "
" आता माझ टेन्शन मिटले बर का. मी देखील त्रास करुन घेणार नाही. योग्य स्थळ आपल्या पर्यंत नक्की येईल."
" आता कशी माझी बायको शोभती बर का? "
" हो मी तुमचीच बायको आहे."
" फक्त माझ्यापेक्षा लोकांच जास्त ऐकतेस."
" काय ओ आता मी करते ना प्रयत्न आपला आनंद कशात आहे ते पाहण्याचा , तरी बोलता का मला."
" राणी सरकार, माफी द्या आम्हांला."
" आई-बाबा मी येते जावून पार्टिला. काळजी करु नका. उशीर झाला तरी सेजल मला सोडायला घरी येणार आहे. तिच्याच गाडीने आम्ही हाॅटेलवर जाणार आहोत."
" चालेल जा तू अगदी निश्चिंतपणे. एन्जाॅय कर. "
नैनाला पार्टीमधे तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळेल का? आई-बाबा पुन्हा एखाद स्थळ घरी घेवून येतील का? पाहुया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा