Login

आस ही वेडी भाग ३

कथा विश्वासाच्या निख्खळ प्रेमाची.
मागील भागात आपण नैनाच्या लग्ना‌वरुन आई-बाबांच लुटूपुटूच भांडण पाहिले. शेवटी जोशी काकांनी याच वर्षी नैनाच लग्न होईल असा कौल दिल्याने नैनाची आई खूश झाली होती. नैना आपल्या आॅफिसच्या मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टिला जाते. आता पाहुया पुढे,

" नैना अग किती छान दिसतोय तुला हा वनपिस. मी जर आत्ता मुलगा असतो तर लगेच तुला मागणी घातली असती."

" सेजल काहीतरीच आपल तुझ. खरतर माझ्यापेक्षा तूच छान दिसत आहेस."

" चल लवकर, सगळे पोहचले पण हाॅटेलवर आपणच दोघी राहिलो आहे."

" माझ कधीच आवरुन झाले होते. तूच उशीरा आलीस."

" हो ग. मला जरा आवरायला वेळच लागतो ना, मेकअप, लिपस्टिक, आयशॅडो, फाऊंडेशन, आयब्रो पेन्सिल अजून काय सांगू तुला."

" लिस्ट खूपच मोठी‌ आहे. म्हणून वेळ लागला तुला. आता तरी लवकर चल. नाहीतर अजून उशीर होईल."

" हे बघ अनुजचा फोन आला."

" अग कुठे आहेस. अजून किती वेळ लागणार आहे तुला यायला. आम्ही सर्वजण कधीपासून थांबलो तुमच्याकरता."

" आलो पाच मिनीटात पोहचतो."

" तुझे पाच मिनीट म्हणजे अर्धा तास."

" अरेच्छा! खरच तू पाच मिनीटात आलीस बरोबर."

" उत्सवमूर्ती माझ्या बरोबर म्हटल्यावर मी वेळेत पोहचणार."

" हो ग अगदीच वेळेत आलीस." नेहा सेजल कडे पाहत चिडवत होती.

काॅंग्रच्युलेशन अॅण्ड सेलिब्रेशन या गाण्याचा आवाज नैनाने हाॅटेलमधे प्रवेश केल्यावर चालू झाला होता. प्रत्येक सहकार्याने एक एक गुलाबाचे फुल‌ देवून नैनाचे स्वागत केले होते.

" हा क्षण डोळ्यात साठवावासा वाटत आहे. मी कल्पनाच केली नव्हती. माझ्या कामाचे एवढे कौतुक आणि अस सेलिब्रेशन होईल. आज एखादी सेलिब्रेटी असल्यासारखे वाटत आहे मला."

" आहेसच तू मग सेलिब्रेटी." सेजल बोलत होती.

त्याच हाॅटेलमधे राज देखील त्याच्या कंपनी प्रोजेक्टच्या मिटिंग करता आला होता. त्याची एक नजर नैनावर गेली. तो तिच्याकडे एकटक पाहत बसला होता. त्याला तिने घातलेल्या वनपिस मधे ती स्वप्नातली परीराणी दिसत होती. सर्वजण नैनाच कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव करत होते. राजला देखील एका यशस्वी प्रोजेक्ट करता नैनाचे अभिनंदन करत आहे. हि गोष्ट समजली होती. आपण देखील नैनाशी बोलून तिचे अभिनंदन करायला हवे असे त्याच्या मनात येत होते.

" नैना, तुम्ही इकडे. मला समजले तुमच्या प्रोजेक्ट विषयी. तुमचे हार्दिक अभिनंदन."

" धन्यवाद राज. तुम्ही इथे कसे? "

" आमच्या कंपनीची देखील एका प्रोजेक्टवर मिटिंग आहे आज इथे."

" नैना तुला अनुज आणि बाकी सगळे बोलवत आहे. चल पटकन केक कट करायचा आपल्याला."

" मला थोड बोलायच आहे तुझ्याशी नैना."

" कार्यक्रम संपला की भेटूया आपण. मला आत्ता जावे लागेल. सर्वजण थांबले असतील."

" हो. चालेल जा तू आता. भेटूया आपण. "

" नैना तुझ्यामुळे आज कितीतरी वर्षांनी मी पार्टी सेलिब्रेट केली."

" खरतर मी तुमच्या सर्वांची आभारी आहे. माझ्या कामाच यश तुम्ही साजर करुन सोनेरी क्षणाच भागीदारी बनवल."

"अग‌, नैना चल लवकर घरी जायला हव. उशीर झाला आहे. काकू मलाच ओरडतील. तुला घरी नेऊन सोडायची जबाबदारी माझ्यावर आहे. काकूंचा ओरडा माहित आहे मला."

" एवढी घाबरते का? माझ्या आईला." नैना हसत बोलत होती."

" थोडा वेळ थांबते का सेजल."

" काय? बोलली परत एकदा बोल."

" हे चक्क तू बोलते आहेस."

" हो ग. "

" एरव्ही मी थांब म्हणते तेव्हा चल म्हणते. आणि आज काय झाले. तुला सोडून परत मला घरी जायचे. उशीर होईल.नंतर थांबूया केव्हातरी असच."

" बर चल जावूया."

" बराच वेळ झालय आता. नैना कदाचित घरी गेली असेल."

" राजला भेटायचे राहिले. मनात उगाच भेटीची हुरहूर का लागली कळत नाही. फोन करायला त्याचा नंबर देखील नाही."

" नैनाला भेटून मला माझ्या मनातल्या भावना बोलून दाखवायला हव्यात."

" काय झालय मला राजने जेव्हा पासून मला थांबायला सांगून काहीतरी बोलायच म्हटला. तेव्हापासून मन सारख राजचा विचार का करत असाव? राज बद्दल एवढी ओढ निर्माण का होत असेल? "

एकमेकांचा विचार करत तीन महिने उलटून गेले होते.
कदाचित तेवढ्यापुरतीच एकमेकांविषयी ओढ असेल असे दोघांना वाटत होते.

एका प्रोजेक्ट मिटिंग दरम्यान राज आणि नैनाची पुन्हा एकदा भेट घडून आली होती. नियतीचा संकेत म्हणावा की, आयुष्यभराची गाठ?

" नैना मी त्या दिवशी तुमची वाट बघत होतो."

" खरतर मला तुम्हांला फोन करुन माफी मागायची होती. पण तुमचा नंबर माझ्याकडे नव्हता."

" माफी कशाबद्दल? "

" मी माझी मैत्रिणी सेजल बरोबर आले होते. ती माझ्या घरापासून लांब राहते. मला सोडून तिला घरी जायला उशीर झाला असता. त्यामुळे तुम्हांला न भेटताच मला तिथून जावे लागले."

" रात्र देखील खूप झाली होती. बरोबर होत तुमच पण. "

" नैना सरांनी तुला बोलवल आहे."

" आपण यावेळी नक्की भेटूया. आता मला जाव लागेल."

" हो नक्की भेटूया."

" या हाॅटेलच्या गार्डन जवळ एक कारंजे आहे तिथे मी तुमची वाट पाहतो. त्या आधी आपण एकमेकांचे नंबर घ्यायचे का? "

" हो चालेल ना. मी करते तुम्हांला फोन, माझे काम आवरले की."

" आपण एकमेकांना अहो- जावो करण्यापेक्षा मैत्रीपूर्वक बोलूया का? "

" चालेल ना हरकत नाही वो."

" परत वो काय? राज बोला ना."

" तू पण मग बोल ग अस म्हणा."

दोघेही एकमेकांकडे हसत पाहत निघून जातात. खरतर तीन महिन्यांनी अचानक एकमेकांना पाहून दोघांना आधी इतकीच ओढ जाणवत होती.

राज आपल्या मनातल्या भावना नैनाला सांगितल्यावर नैना कोणता निर्णय घेईल? राजचे आई-वडिल राजला साथ देतील का? पाहूया अंतिम भागात.

🎭 Series Post

View all