Login

आस ही वेडी अंतिम भाग ४

कथा विश्वासाच्या निख्खळ मैत्रीची.
मागील भागात आपण पाहिले की नैनाने आॅफिसची पार्टी एन्जाॅय केली होती. तिथे कामा निमित्त राज देखील आला होता. त्याला काहीतरी सांगायचे होते. परंतु नैनाला रात्र झाल्यामुळे थांबता आले नव्हते. तीन महिन्यानंतर त्यांची भेट होते. आता पाहुया पुढे,

" मला यायला उशीर तर झाला नाही ना? "

" उशीर झाला तरी तू आली आहेस हे महत्वाचे."

" बोल ना काय झाले. काय बोलायचे होते त्यावेळी तुला."

" कस बोलाव समजत नाही मला."

" त्यात काय अस काय बोलायच होते."

" नैना मला तू पहिल्या भेटीत आवडली होती. त्याचवेळी ठरवल होत लग्न करेल तर तुझ्याशीच."
पूर्ण धीर एकवटून राज घडाघडा नैनाला सांगून टाकले होते.

" मला देखील तू आवडला होता. काका-काकूंनी नोकरी करण्याकरता बंदी घातली होती. माझा नायलाज होता त्यावेळी. आई-वडिलांना मला शेवटपर्यंत साथ द्यायची आहे. त्यांना माझ्यापरीने जमेल तेवढी मदत करण्याकरता मला नोकरी करणे आवश्यक होते. तसही शिक्षण आणि जगाशी समतोल कायम राखण्याकरता नोकरी करुन नविन टेक्नालॉजी आत्मसात करणे आजच्या काळाची गरज आहे."

" बरोबर आहे तुझे. तू त्यावेळी बरोबर बोलत होती. आई- बाबांना मी तेव्हा समजावून सांगू शकलो नव्हतो. पण आता तू बोलते त्यामागची भावना लक्षात आली माझ्या. मी परत एकदा आई-वडिलांशी बोलून बघतो."

" त्यांना मी याबाबत हट्टी वाटत असेल. पण वेळीच बोलणे महत्वाचे होते."

" नक्कीच. मला आत्ता निघाव लागेल. फोनवर आपले बोलणे होईलच. भेट देखील होईलच. तू कधी निघाणार आहेस उद्या."

" आम्ही सकाळी ११ वाजता फ्री होवून घरी जायला निघाणार आहोत."

" ग्रेट, मी देखील दहा वाजता फ्रि होईल. तू माझ्या बरोबर येशील का? आपण सोबतच जावूया. मी सोडतो तुला घरी."

" मी सांगते सकाळी कस ठरते ते फोन करुन."

" नैना येते ना तू माझ्या बरोबर. मी हाॅटेलच्या गेट जवळ गाडी घेवून उभा आहे."

" मी फोन करणार होते आत्ता. कि दहा मिनीटात मी फ्रि होईल. बरोबरच आपण जावूया असे."

" हो. ये मग तू."

आज नैनाला खास सरप्राइज द्यायचे म्हणून राजने ड्रायव्हिंग सीटच्या मागे कॅडबरी, आणि सुंदर असे ग्रिटिंग ठेवले होते. गाडीच्या दरवाजाच्या कोप-यात गुलाबाचे फुल ठेवले होते.

" मला यायला उशीर झाला का? निघूयात का आपण. "

" नाही.बरोबर दहा मिनीटात आली तू."

पुढच्या सीटवर बसताच राजने गुलाबाचे फुल नैनाच्या हातात दिले होते. नैनाने देखील लाजून ते फुल हातात घेतले होते.

" चंद्र देखील आज या हसण्यापुढे फिका पडेल. असे हास्य तुझ्या चेह-यात सामावले आहे."

" काहीतरीच काय."

" अग खरच. चल आता आपण या हाॅटेलमधे जेवण करायला थांबूया."

" काय मेनू घ्यायचा तू सांग."

" काजू करी, रोटी आणि मटार पनीर घेवूया का."

" वा ! हे तर माझे पण आवडतीचे मेनू आहेत."

" हो का."

" अग खरच. आपली खाण्याबाबात आवड जुळलेली दिसते."

राजचे जेवण लवकर होते. तो गाडीच्या मागच्या सीटमधे ठेवलेले ग्रिटिंग आणि कॅडबरी हातात घेवून नैनाच्या दिशेने जात होता. नैनाचे देखील जेवण होवून ती हाॅटेल जवळच्या करंजाजवळ उभी राहून न्याहाळत होती.

" हे घे नैना."

" कॅडबरी! वाव. माझ्या आवडीची आहे. जेवणानंतर मी घरी रोज एक कॅडबरीचा तुकडा खातेच."

" आता हे पण आपले जुळते बर का."

" राज मला इथेच सोडा. घरी मी आॅफिसच्या कारने येणार हे माहित आहे. तुझ्या बरोबर येणार अजून सांगितले नाही."

" हरकत नाही. भेटूया परत आपण. "

" आज स्वारी खूश दिसते आहे. आॅफिसच्या मिटींगला काही विशेष घडले का? " राजचे बाबा राजकडे पाहत बोलत होते.

" बाबा तुमचे आपले काहीतरीच."

" खरच मला पण तुझ्यात बदल दिसत आहे."

" आई मला येवून पाच मिनीट पण झाले नाही. तुला लगेच माझ्यात बदल वाटायला लागला का? "

" कशी झाली तुझी मिटिंग? आज एवढा प्रवास करुन आली तरी फ्रेश दिसते तू."

" नेहमी अशीच असते मी."

" हॅलो, नैना काय चाललय उद्या भेटायच का आपण."

" उद्या मला नेमकी पुण्याला बहिणीच्या घरी कार्यक्रमाला जायचे आहे. आपण परवा भेटलो तर चालेल का? "

" हो, चालेल ना.मी केव्हाही भेटायल सरकार."

" काय बोलला राज तू."

" ते आपल काही नाही."

" तरीपण सांग ना."

" ते आपल चुकून सरकार बोललो मी. तुला आवडले नसेल तर माफ कर मला. पुन्हा नाही बोलणार मी असे."

" कोण बोलल मला आवडल नाही."

" म्हणजे तुला आवडले का? "

" हो. पण लग्नानंतर अशी हाक ऐकायला जास्त आवडेल."

" काय बोलली तू नैना. "

" ते काही नाही. ठेवते मी फोन." लाजेने नैनाने फोन ठेवून दिला होता.

" नैना लग्न झाल्यावर हाका ऐकायला आवडेल बोलली. आई- बाबांशी बोलायला हवे."

" आज लवकर घरी आलास राज तू."

" अग आज लवकर काम संपले. इतके महिने क्लोजिंगचे काम होते त्यामुळे मिटींग आणि टूर करता इकडे-तिकडे जायला लागत होते. आई, आज आपण बाहेर जावूया जेवायला."

" एवढा मस्का मारतोस काय काम आहे तुझे."

" काही नाही ग आई आणि बाबा बसा आपण गप्पा मारूया."

" आज साहेबांना आपल्याशी बोलायला वेळ मिळाला म्हणजे आपले अहो भाग्य."

" काही बोलता का? बाबा."

" नका नजर लावू तुम्ही माझ्या राजबिंड्याला. तो आपल्याशी रोजच बोलतो."

" आजच्या जगात मला सांगा प्रत्येकाला स्वावलंबी असणे कितपत योग्य वाटते."

" मग काय किती वेळा सांगते मी तुम्हा दोघांना मी आजारी पडल्यावर मला स्वयंपाक करता येत नाहीतर तुमच्या दोघांचे देखील खाण्याचे किती हाल होतात."

" आम्ही नंतर शिकलो ना पण राणी सरकार."

" हो ना. त्यामुळे आता आजारी पडायला मला कसलीच चिंता वाटत नाही."

" बाबा तुम्हांला काय वाटते."

" मला कोरोना झाला होता तेव्हा अर्जंट पैसे आपल्याला हवे होते. तेव्हा पहिल्यांदा तुझ्या आईला बॅंकेत जावून घाबरत का होईना व्यवहार केला होता."

" अगदी बरोबर हो. मला खरतर तेव्हा रडायला आले होते.पण नंतर माझा आत्मविश्वास वाढला."

" त्यानंतर सरकार आजपर्यंत सर्व बॅंकेचे व्यवहार तुम्हीच करता."

" एक पटले ना तुम्हांला दोघांना. प्रत्येक काम हे यायला हवे."

" हो." आई-बाबा एक सुरात बोलले होते.

" मला एकच सांगायचे आहे. आजच्या युगात स्त्री देखील सक्षम व्हायला हवी. स्वत:च्या पायवर उभी राहायला हवी. याकरता तिने कोणावरही अवलंबून राहायला नको."

" बरोबर बोलतो बाळा."

" आज हे सर्व बोलण्यामागे काय सांगायचे आहे तुला. स्पष्टच बोलावे लागेल."

" आपण नैना नावच्या मुलीला पाहायला गेलो होतो. तेव्हा तुम्ही तिला ती नोकरी करणार म्हणून नापसंत केले होते."

" ती हट्ट सोडायला पण तयार नव्हती मग कसे काय आपण होकार देणार होतो."

" त्यामागे आपण ज्या विषयावर आता बोललो तेच कारण आहे."

" हे आता पटले आम्हांला. तुला ती मुलगी आवडली होती का."

" हो बाबा."

" अच्छा,हे कारण आहे तर."

" उद्याच मी त्यांना फोन करुन आपल्या घरी बोलून घेतो."

" आज काय जादू केली तू. तुझ्या आई-बाबांनी माझ्या आई-बाबांना तुमच्या घरी बोलावल आहे. काही खास काम आहे का."

" कळेल तुला लवकरच. "

" या या. कसे आहात. आज तुम्हांला काही कारणाने बोलावले आहे."

" कोड्यात नका बोलू. सांगा लवकर. आम्हांला तुमचा फोन आल्यापासून बैचेन वाटत आहे."

" घाबरण्याचे काम नाही हो. आम्हांला तुमच्याकडून दोन मागायच्या आहेत. द्याल ना."

" म्हणजे. आमच्या देण्याजोग्या असतील तर मी नक्की देईन."

" मग आम्हांला एक श्रीफळ आणि तुमच्या मुलीचा हात हवा आहे."

" अहो काय बोलताय तुम्ही.ही तर आनंदाची बातमी आहे."

" एवढेच नाहीतर तुम्हांला योग्य वाटत असेल तर आपण पुढच्या महिन्यात साखरपुडा करुयात."

" नैनाशी बोलून तुम्हांला कळवतो आम्ही."

" हॅलो, ऐका ना. आपण साखरपुडा नको करायला."

" काय झाले. नैना लग्न करायला तयार नाही का? तिला आम्ही नोकरी करुन देणार आहोत. आम्ही त्याबद्दल कोणतीच तक्रार नाही. हवतर तिची माफी मागायला आम्ही तुमच्या घरी येतो."

" तसे काहीच नाही. साखरपुडा नाही तर दोन महिन्यांनी आपण लग्नाचाच मुहुर्त धरुयात. तुम्हांला काय वाटते."

" अगदी माझ्या मनातले बोललात."

शेवटी राज आणि नैनाचे प्रेम यशस्वी होवून लग्नाच्या बेडीत कायमस्वरुपी बंदिस्त झाले होते.

समाप्त:

🎭 Series Post

View all