Login

उमेद - आशा जगण्याची

लघुकथा
"अरे सुमित आवरले की नाही अजून तुझे,किती वेळ होतोय.चल पटकन"रमा थोडीशी वैतागत बोलली.

"अगं झालं ग आलोच मी,तू बाहेर जाऊन थांब"...सुमित

तर हे आहेत आपल्या कथेचे नायक आणि नायिका.

दोघांचं सुखी संसार सुरू होता.दोघे अनाथ होते त्यामुळे एकमेकांना खूप जीव लावायचे.सगळं कसं छान सुरू होते.दोघे पण जॉब ला होते.well settered family म्हणून शकता.लग्नाला २ वर्ष झाली होती.आता बाळासाठी प्रयत्न करत होते.असा सगळं छान सुरू असताना अचानक एक दिवस ऑफिस मधून येताना सुमित चा अपघात झाला आणि त्यातच तो गेला.रमा तर पूर्ण खचून गेली होती.तिला जगायची सुद्धा इच्छा नव्हती.मित्र मैत्रिणी तिला भेटून जायचे तिला ह्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नव्हते.कारण रमाला स्वतःला जगायचे नव्हते.पण आत्महत्या करण्याचे धाडस तिच्यात नव्हते.असेच २ महिने गेलेत.आणि एक दिवस रमनी ठरवले आज स्वतःला संपवायचे.......

ती शहारा पासून लांब गेली तिथे एखाद्या टेकडीवरून उडी घेऊन संपवू स्वतःला असा विचार तिने केला...

शहारा बाहेर आली खरी पण पुन्हा ती घाबरली आणि परत जावे म्हणून U टर्न घेतला.तिथेच थोड बाजूला तिला एक मंदिर दिसले.मान खूप सैरभैर झाले होते.त्यामुळे मंदिरात गेले तर थोड शांत वाटेल म्हणून ती तिथे गेली.दर्शन करून ती पायऱ्यांवर बसली होती.तितक्यात तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला.मंदिरात पुजारी काका आणि तीच होती.दोघांनी पण बाळाचा आवाज ऐकला आणि तसेच त्या दिशेला गेले.बघतात तर काय एक छोटंसं बा पांढऱ्या कपड्यात गुंधळलेले दिसले.रमने पुढे जाऊन लगेच बाळा ला उचलून घेतले पण बाळ काही रडायचे थांबत नव्हते त्याला बहुतेक भूक लागली असेल......

पुजारी काका लगेच गाभाऱ्यात गेले आणि दुधनी भरलेला तांब्या घेऊन आलेत आणि रमाला दिला.तिने जमेल तसे बाळा ला दूध दिले आणि बाळ लगेच झोपी गेले....

ह्या दोघांनी आजूबाजूला बघितले चौकशी केली पण ह्या  बाळाच्या आईंचा शोध लागला नाही...

बराच वेळ झाला होता पुजारी काका रमा ल म्हणालेत पोरी तू बाळा ला घेऊन जा आणि पोलिस कंप्लेंट कर.कदाचित त्याचे आई वडील त्याला शोधत असतील मी राहतो इथे मंदिरात मला जाणे शक्य नाही ...

हे ऐकून रमा ने होकारर्थी मान हलवली आणि ती बाळा ला घेऊन निघाली.ती पोलिस स्टेशनला पोहचली आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला.पोलिसांनी रीतसर कंप्लेंट नोंदवून घेतली.पण बाळा ला ठेवायचे कुठे हा प्रश्न होता
त्यांनी रमाला रिक्वेस्ट केली की काही दिवस तुम्ही बाळा ला ठेऊ शकता का?....

तिला आधी थोडे टेन्शन आले होते पण त्या बाळा कडे बघून ती हो म्हणाली आणि तिथून घरी आली...

घरी आल्यावर तिने पटपट काम आवरले आणि त्या बाळा ला जवळ घेतले.तिला पुन्हा सुमित ची आठवण झाली.

"आपल्याला पण बाळ झाले आरे तर असेच असते ना सुमित"ती स्वतःशीच बोलली आणि पुन्हा डोळे भरून आलेत तिचे....

तेव्हढ्यात बाळाने चुळबुळ केली.ती पटकन किचन मध्ये जाऊन दूध घेऊन आली आणि चमच्याने बाळा ला दूध दिले.बाळ इतके लहान होते की पोट भरले की लगेच झोपायचे....

त्या बाळा कडे बघून रमा विचार करत होती का सोडले असेल ह्या बाळा ला?मुलगी आहे म्हणून की लग्ना आधीचे असेल म्हणून?बराच वेळ ती तशीच बसून होती ..

थोड्या वेळानी उठून जेवण करून रमा झोपायला आली.बाळ अजून पण झोपलेले होते..

ती पण बाजूला झोपली.रात्री ३-४ वेळा बाळ उठले होते त्यामुळे तिची नीट झोप झाली नव्हती.ती तशीच उठली आणि कामाला लागली.सगळं आवरत होती की बाळाचा आवाज आला.ती तशी बेडरूम मध्ये गेली बाळा ला फ्रेश करून दूध दिले आणि हॉल मध्ये घेऊन आली असेच ६-७ दिवस गेलेत.

आज तिने पोलिस स्टेशनला फोन केला पण त्यांनी सांगितले अजून पण काही शोध लागला नाही.तुम्हाला आता शक्य नसेल तर बाळा ला अनाथ आश्रमात ठेवा....

जे ऐकून रमा अस्वस्थ झाली पण जसे पोलिसांनी सांगितले तसे केले पाहिजे म्हणून ती पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर निघाली.तिला खूप हुरहूर वाटत होती.आपण काहीतरी चुकीचा करतो आहोत असे तिला वाटायला लागेल...

विचार करता करता ती आश्रमात पोहचली.तिथे एक लेडी पोलिस आधीच आलेली होती.तिने रमाला अस्त नेले आणि प्रोसेस करायला सांगितली...


तिथल्या बाईने ओके म्हटले आणि बाळा ला द्या म्हणाली.तशी रमा सैरभैर झाली.आपल्या जवळचे कोणी आपल्या कडून हिसकावून नेते आहे असे तिला वाटले आणि ती ती बाळा ला आपल्या छातीशी कवटाळू लागली.हे बघून पोलिस आणि ती बाई दोघी बुचकळ्यात पडल्यात.लेडी पोलिस समोर आणि म्हणाली "रमा काय होतंय तुम्हाला?ते बाळ का देत नाही आहात?"

हे ऐकून रमा भानावर आली.आणि म्हणाली "मी ह्या बाळा ला लिगली दत्तक घेऊ शकते का?"

त्या दोघी विचित्र नजरेने तिला बघत होत्या.

हे बघा मी एकटीच आहे माझा नवरा २ महिन्या आधी अपघातात गेला.त्या दिवशी मी पण स्वतःला संपवणार होते पण हिम्मत नाही झाली.आणि मग ही मला मिळाली...

तुम्हाला खरं सांगते या ७ दिवसात मला खूप छान वाटले. आत्महत्येचा विचार सुद्धा आला नाही.प्लिज काय प्रोसेसासेल ती करा आणि हिला मला द्या...

मला जगण्याची उमेद मिळेल.आशा मिळेल मला जगण्यासाठी.मी खूप छान सांभाळ करेल तिचा..

हे ऐकून पोलिस आणि ती बाई भावूक झाल्यात आणि पोलिस म्हणाली असा होऊ शकते का? त्या बाईने हसुन हो म्हटले आणि प्रोसेस करायला घेतली...

थोड्या वेळात सगळे आवरून रमणे तिथेच बाळाचे नाव ठेवले " माझी आणि सुमित ची समित्रा"म्हणजेच "सुमा"....

आणि हसतच घरी निघाली.आज तिला नवीन दिशा मिळाली होती.आता ती अजून जोमाने आणि आनंदाने आयुष्य जगणार होती.खर च आहे जे  म्हटल्या जाते "उम्मिद पे तो दुनिया कायम है"
आशा प्रत्येकाला नवीन दिशा दाखवून आयुष्य जगण्याची उभारी देते.

समाप्त

माझ्या कथा मालिका वाचण्यासाठी मला फॉलो करा,आणि वाचनाचा आनंद घ्या.धन्यवाद.