प्रेमाची आस.. आश्वस्त हात भाग एक

प्रधान सर काय शिकवतात पिन ड्रॉप सायलेंट असते

प्रेमाची आस भाग एक
*आश्वस्त हात*


आई….— तुला साधा की मसाला डोसा ?
नको… डोसा नको, आज काहीतरी चटपटीत.
छोले भटूरे खाऊ या.
अरे वा !माझी आवडती डिश! सुशांत उत्साहात म्हणाला.”
“ हो आज तुझा वाढदिवस आहे ना म्हणून, तुझी आवड तीच माझी .”

ओके ,..नंतर कॉफी की कसाटा आईस्क्रीम ?”

आधी कसाटा आणि मग कॉफी.”

क्या बात है?

खाता खाता सुषमा च्या लक्षात आले सुशांत चे लक्ष त्या दूरच्या टेबलवर च्या बसलेल्या मुलीकडे सारखे जातआहे .

”कोण आहे रे कोणी गर्लफ्रेंड?”

आमचे कोचिंग इन्स्टिट्यूट चे सर आहेत अशोक प्रधान ते आणि त्यांची मुलगी ईशा, आमच्याच ग्रुपमध्ये शिकते.

हो? अच्छा!

आईस्क्रीम घेऊन येताना ती मुलगी आणि सुशांत बोलत बोलत येत होते
“ ही माझी आई आणि ही ईशा सुशांतने ओळख करून दिली तेवढ्यात तिचे बाबाही तिथे आले..

“ सर–तुम्ही घेणार आईस्क्रीम?’
हो चालेल, चालेल ना गं? ईशाकडे पाहत ते म्हणाले
यस..आजचासुशांत चा वाढदिवस आहे ना ,
अच्छा अच्छा! हसत हसत सर म्हणाले”
, “Happy birthday my boy “
हसताना त्यांच्या गालावर खळी पडलेली पाहून सुषमाला शांतनु आठवले .

मी ओळख करून दिलीच नाही “आई हे आमचे प्रधान सर आणि सर ही माझी आई!”

आईस्क्रीम संपवून ते दोघे निघून गेले.

कॉफी प्यायची? इथे की—?
नको आता पुरे चलू या घरी!” उदास होत सुषमा म्हणाली .
तिचाउदास स्वर लक्षात येऊनही सुशांत ने तसे दाखवले नाही ,

“मम्मा प्रधान सर काय शिकवतात म्हणून सांगू क्लासमध्ये” पिन ड्रॉप” असते.

आणि ही त्यांची मुलगी, कशी आहे अभ्यासात?

बरी आहे, पण इतर भानगडीत जास्त लक्ष असतं ,फटकळ आहे सगळ्यांची भांडत असते .

तुझ्याशी पण?

हं कधीकधी..

कपडे बदलून सुशांत अभ्यासाला बसला .सुषमा बेडवर आडवी झाली.


कॉलेजला निघताना ती सुशांत च्या खोलीत डोकावली, तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता बोलताना त्याचा चेहरा त्याचा आवाज हुबेहूब शांतनू सारखा भासत होता.

शांतनू…कितीतरी वर्ष झाली! सुशांत तीन-चार वर्षाचा असेल साधारण तेव्हा शांतनू त्यांना सोडून गेला होता. तो गेला तेव्हा सुषमा किती आनंदात होती आपला नवरा फॉरेनला जातोय म्हणून.
कॉलेजमध्ये तिच्या कलिग्स नी”मॅडम पार्टी “ म्हणताच तिने कॅन्टीन मधून मिठाई आणि समोस्याची ट्रिट दिली.

सुरुवातीला सहा महिने एक वर्ष करता करता शांतनू चे येणं लांबतच गेले. सुरुवातीला तिला फक्त शंका वाटत असे पण हळूहळू शंका विश्वासात बदलू लागली. खरंच परत येणार की?
सुशांत मोठा होत होता तो ही प्रश्न विचारायचा!त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर नव्हती त्यावेळी सुषमा जवळ.
—-----------------------------------------+++