प्रेमाची आस..भाग दोन

शांतनूला मी आवडले का हा विचार एकदाही मनात डोकावला नाही

प्रेमाची आस… भाग दोन

आश्वस्त हात

सुशांत जसाजसा मोठा होत होता तसे तो ही प्रश्न विचारायचा पणत्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर नव्हती त्यावेळी सुषमा जवळ .
पण हळूहळू तिला उत्तर गवसू लागले. शांतनुचे फोन कॉल कमी कमी होत बंद झाले. नंबर अनरिचेबल येत होता .कंपनीतून कळले की त्यांनी ही कंपनी केव्हाच सोडली .
तो मध्ये भारतातही परत आला नी परत गेला यांना न भेटता न कळवता..
हे.. सगळं ऐकल्यावर सुषमाच्या पायाखालची जमीनच सरकली. जीवाचा संताप झाला पण काही उपाय दिसत नव्हता! मुलासाठी आला दिवस घालवणं भाग होतं .डोक्यावर छप्पर आणि स्वतःची नोकरी होती म्हणून बरे ,पण शांतनू साठी घेतलेल्या लोन मुळे बरेच पैसे जात. कसेबसे भागत होते !
आपली ठरवून फसवणूक झाली, आपला वापर केला शांतनू ने त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी.

आई-बाबा इतर नातेवाईक सर्वांना तिच्याबद्दल सहानुभूती होती पण तो जबाबदारी झटकून मोकळा झाला तिला डिव्होर्स पेपर पाठवून दिले. .
सुषमाचे बाबा आई मैत्रिणी म्हणाल्या सोडू नको त्याला सुखा सुखी पैसा वसूल कर.
तू त्याच्या पायी आयुष्य पणाला लावलं आणि त्याने तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला.

तिला कळत होतं पण स्वाभिमान आड आला. आहे मी सक्षम, सुशांत माझा आहे मी वाढवेन त्याला म्हणून तिने ही डिव्होर्स पेपर सही करून पाठवून दिले.
काय ठरवले होते आणि काय झाले ?

रात्री झोपताना तिला आठवले
आई-बाबांना वाटायचं मुलगा छान आहे त्याच्या आईलाच पसंत आहे त्यांना अशीच सोज्वळ मुलगी सून म्हणून हवी होती.
हो आपली सुषमा आहेच,इतकी शिकलेली नौकरी करणारी असून ही साधी सरळ.

शांतनू ला आवडले होते कां ?
त्यावेळी हा विचार एकदाही मनात डोकावला नाही. त्यांच्याकडून होकार आला आहे त्याच आनंदात सर्व होते .लग्न झाले दिसायला देखणा शिक्षणाबरोबर नोकरी करत असलेल्या शांतनू ची स्वप्न खूप मोठी होती. एम.बीए पूर्ण झाले आहे त्यांनी नवीन कंपनी जॉईन केली होती अजून काही परीक्षा द्यायच्या होत्या पुढे जायचे तर हे सर्व आलेच. सुषमाच्या एकटीच्या पगारावर घर खर्च भाग

त होते पण पुढे अजून काही कोर्स करायचा म्हणून शांतनु बाहेरच्या देशात निघाला .
एक वर्षाचा तर प्रश्न आहे अस्से निघून जातील दिवस म्हणता म्हणता त्यावेळी वाटले होते…

डोळ्यात आलेले पाणी पुसत सुषमाला जाणवले एक तप लोटले. सुशांत बारावीला आला.
—----------------------------------------------