प्रेमाची आस..भाग तीन आश्वस्त हात

खाओ, पिओ मौज करो.
प्रेमाची आस … भाग तीन

*आश्वस्त हात*

घरी येऊनही बराच वेळ झाला सुषमाला. सुशांत चा काही पत्ता नव्हता.


तिने फोन केला तेव्हा म्हणाला” अग मी सरांच्या घरी आलो आहे तासाभराने येतो .” एक वर्ष झाले या क्लास ला जाता जाता बारावी बरोबर “नीट “चा अभ्यास , सुशांत हुषार आहे नक्कीच निघेल.

आताशा याचे त्यांच्या घरी जाणे वाढले आहे, कुठे ईरामध्ये तर गुंतला नाही?”
मुलगी जरा जास्तच अटीट्युड वाली वाटली सुषमाला प्रथम दर्शनी…

रात्री जेवताना सुशांत स्वतःच’ बोलला काही डिफिकल्टीजअसतात ,सर म्हणाले घरी ये खूप छान वाटतं त्यांच्यासोबत, आई खूप केअरिंग नेचर आहे त्यांचा'.. खूप प्रेमळ आहे.

‘आणि तिचा?’

‘कोणाचा ?’

‘त्यांच्या मुलीचा!’

ओह,अच्छा !’अग तू समजते तसं काही नाही, ती नसतेच घरी.
तिच फ्रेंड सर्कल वेगळच आहे “खाओ, पियो मौज करो” मलाही म्हणत होती जॉईन हो .
पण नो- - सध्या फक्त नी फक्त अभ्यास असे म्हणत सुशांत हात धुवायला उठला ..

चला अजून तरी करिअरवर लक्ष आहे.

सकाळी नेहमीप्रमाणे क्लासला निघालेला सुशांतने सहज विचारले “आई, बाबांचा स्वभाव कसा होता ग? ते मला प्रेम करायचे ?’

सुषमा दचकली इतक्या वर्षा नंतर आज हा प्रश्न?
म्हणजे असं गं सरांना पाहतो ना तेव्हा वाटतं बाबा असते तर असेच असते कां?

काय माहित त्याला कुठे पर्वा होती आपली सुषमा कडवटपणे म्हणाली..

तिला जाणवले वरवर जरी दाखवत नसला तरी खूप लहानपणापासून बाबा ही रिकामी जागा सतत सुशांतला अस्वस्थ करते आहे. पण ती तरी काय करणार?

डोळ्यात येऊन पाहणारे पाणी म्हणत प्रयासाने तिने रोकले त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली ,’येऊ मी ऑफिसला वेळ होतोय….’

संध्याकाळी सुशांत तिच्या आधी घरी पोहोचला होता, चहा नाश्ता होऊन ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली तेवढ्यात सुशांतचा फोन वाजला तो घाबरा घुबरा होऊन कोणाशी तरी बोलत होता ” हो, हो ,मी येतोच.

आई मी जाऊन येतोय सरांची तब्येत बरी नाहीये म्हणत तो घाई घाईने गेलाही ..

रात्रीचे दहा वाजले तरी सुशांत घरी आला नव्हता सुषमा नी फोन केला तेव्हा म्हणाला आई आज रात्री मी इथेच दवाखान्यात थांबणार आहे सरांना बरं नाहीये त्यांचा एक्सीडेंट झाला होता थोडक्यात वाचले .

बापरे, पण् त्यांच्या घरचे कोणीच नाही कां?

ते कोणी असते तर ही वेळच आली नसती, बरं मी उद्या घरी पोहोचलो की बोलू. पण तू वेळेवर झोप माझी काळजीकरु नको.

रात्री पडल्या पडल्या सुषमाला सकाळी सुशांत ने विचारलेला प्रश्न आठवला त्याला आपले बाबा कसे होते हेही फारसे आठवत नाही फक्त फोटो पाहिला .
लहानपणी बरेचदा इतर मुलांचे बाबा पाहून तो सैरभैर होत असे, पण जसा जसा मोठा होत गेला त्याने तो विषय बंदच केला तरीही मनातून दुखावला गेला आहे हे तिला जाणवत असे बाबाची कमतरता मी कशी भरून काढणार होते माझा नाईलाज होता .

दुुसर्‍या दिवशी संध्याकाळी तो घरी आला तेव्हा खूप थकलेला दिसत होता.
‘ कसे आहेत तुझे सर?
आता स्टेबल आहे ब्लड दिले होते मी आमचा ब्लड ग्रुप एकच निघाला ,काल तर माझा जीव जागेवर नव्हता ग त्यांची ती हालत पाहून.
‘ आई मला त्यांना नाही गमवायचं बाबांच्या जागी मी त्यांना मानतो.’

‘ अरे पण त्याचे घरचे? ती मुलगी आहे ना त्यांना .’
ती गेली सोडून त्यांना तिच्या आईकडे.’

‘ म्हणजे?

आई त्यांची स्टोरी अशीच आहे त्यांची बायको केनडा ला राहते ,मुलीला ही सोडून गेली होती .पण ईशाअगदी आईच्या वळणावर गेली सरांच्या स्ट्रीक्ट वागण्यावरनं, अभ्यासावरनं रागवण्यावरन त्याचा राग म्हणून तीही आईकडे निघून गेली. सरांना खूप मोठा धक्का बसला त्याचाच परिणाम.’

अरे देवा! आता कसे आहेत ते?’
एक-दोन दिवसांनी डिस्चार्ज देणार आहेत, मी विचार करतो चार दिवस तिकडेच राहू का, आणि नंतर त्यांना आपल्या घरी…. तुला चालेल?
पण ते दिसायला बरे दिसेल कां? आणि त्याहीपेक्षा त्यांना आवडेल कां?

आई कोणाला काही वाटू दे माझे मनलहानपणापासून बाबाच्या प्रेमासाठी असुसलेले होते ते प्रेम मला त्यांच्याकडून मिळते आहे,एक बापाचा जो आश्वस्त हात मुलाला अपेक्षित असतो तो ते ठेवतात माझ्या पाठीवर , ते आता मला गमवायचे नाही .मी त्यांच्या डोळ्यात त्यांच्या स्पर्शात तेच प्रेम पाहतो ज्या “प्रेमाची आस” होती मला ते आता मला मिळते आहे .

अरे तुला जे वाटतं ते त्यांना…?

हो आई त्यांनाही अशाच प्रेमाची गरजआहे .

ठीक आहे, घेऊन ये घरी ‘तुझ्या बाबांना तू’ असे म्हणत सुषमाने सुशांतला जवळ घेतले.
—-----------------------------------------------लेखन..सौ.प्रतिभा परांजपे