Login

आठवणी.....गोड की कडू( भाग १५)

Sk


विक्रम सागरला ignore करत असतो तर सागर कृतिकाला ignore करत असतो. तिघांचा हा लपंडाव सरांच्या लक्षात येतो.

मिस कृतिका......माझ्या केबिन मध्ये या लगेच....."सर
कृतिका लगेच सरांपाठोपाठचं केबिन मध्ये जाते.

मिस कृतिका.........any problem........"सर


No sir........."कृतिका

नक्की......"सर

हो सर.......नक्की."कृतिका


मग सागर तू आणि विक्रम असे नजरेचे खेळ का खेळताय........"सर


काही नाही सर.........ते.......आपलं.......सहजच."कृतिका

हे बघ......काही प्रॉब्लेम असेल तर सांग.. . .आपण solve करू."सर

नाही सर.......खरंच काही नाही."कृतिका


ठीक आहे. विक्रमला मेहेतांची फाईल घेऊन आत पाठव.त्यांचे अकाउंट चेक करायचे आहेत."सर


Yes sir........."कृतिका

कृतिका विक्रमला सरांचा निरोप देते.
विक्रम फाईल घेऊन दार नॉक करतो.

May i come in sir......."विक्रम

Yes please......"सर

सर,ही घ्या मेहेतांची फाईल."विक्रम

Thank you...... please have a seat...."सर

Yes sir."विक्रम

विक्रम.....खरंतर फाईल हा एक बहाणा होता तुला बोलावण्याचा.बरं मला सांग.....तू ,सागर आणि कृतिका मध्ये काही बिनसलं आहे का??? "सर

नाही सर.......आमचं काही चुकलं का??? "विक्रम

नाही........पण मी गेले काही दिवस बघतोय........मला तुम्ही तिघे एकत्र दिसत नाही.काही झालं असेल तर सांग आपण मिळुन solve करू.विक्रम विचारात पडतो.सरांना काय आणि कसं सांगावं याचा.

विक्रम........"सर
सरांच्या आवाजने विक्रमची तंद्री उडते.

हां सर........ते.....काय सांगू........असं म्हणून विक्रम सगळा प्रकार सरांना सांगतो.

Ohhhh...... अस आहे तर........ठीक आहे.इज काम कर तू.........सागरच्या बाबांचा नंबर दे मला.मी त्यांच्याशी बोलून घेतो.सागरने life मध्ये move on करावं ही माझी पण इच्छा होती. मी माझ्या मुलीसाठी सागरच्या आईवडिलांशी बोलणार होतो.सागर सारखा inocent मुलगा शोधूनही सापडणार नाही,शिवाय त्याला खूप वर्षांपासून ओळखतो.कृतिकाला सागर आवडत असेल तर मी स्वता सागरशी बोलतो."सर


सर......खरंच तुम्ही great आहात. तुमच्या मुलीचं लग्न सागरशी व्हावं अशी इच्छा असूनही तुम्ही कृतिकाच्या प्रेमाचा विचार केलात........ hats of you sir........"विक्रम


अरे.......आपलेपणाने मिळवण्याची भावना असते.ते हिसकावून नाही घेता येत.बरं जा तू........मला नंबर sms कर. करू आपण काही तरी."सर

हो सर.........सागर जर लग्नाला तयार होणार असेल तर मी पण माझं लग्न पुढे ढकलतो. असं पण काही इश्यूमुळे दिवाळीचं लग्न कॅन्सल करावं लागलं,पण सागर तयार झाला तर दोघे पण लग्नाचा बार एकदमचं उडवून टाकू.......एवढं बोलून सागर पटकन जीभ चावतो.

सॉरी सर...भावनेच्या आणि आनंदाच्या भरात खूप काही बोलून गेलो.माझ्या लक्षातच नाही आलं......ऑफिसमध्ये आहे ते...."विक्रम

It\"s ok....... काही हरकत नाही.....ये तू आता."सर

हो सर म्हणून विक्रम लगेच केबिन बाहेर येतो आणि सरांना सागरच्या बाबांचा नंबर sms करतो.

हॅलो...... सागरचे बाबा आहेत का?"सर

आपण कोण??"सागरची आई

मी सागरचा सर बोलतोय....... "सर

अगगबाई सर......नमस्कार...... कसे आहात. असा अचानक फोन वैगरे.....सगळं ठीक आहे ना!!! सागर.........."सागरची आई

हो हो......सगळं ठीक आहे आणि आणि सागर पण मस्त आहे मजेत.मला जरा सागरच्या बाबांशी बोलायचं होतं. आहेत का???"सर

हो देते हां..... अहो......काय ओ..... अहो सागरच्या सरांचा फोन आहे.म्हणे तुमच्याशी बोलायचं आहे."सागरची आई

सरांचा फोन......सगळं ठीक आहे ना!!! "सागरचे बाबा

बोला आधी...."सागरची आई

हॅलो......नमस्कार सर."सागरचे बाबा

नमस्कार......."सर

कसे आहेत सर......घरी कसे आहेत सगळे."सागरचे बाबा

सगळं ठीक आहे...... उलट सगळं उत्तम चालू आहे.मला जरा सागरच्या लग्नाविषयी बोलायचं होत म्हणून फोन केला होता खरतर."सर

हो बोला ना..."सागरचे बाबा


आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे.कृतिका सरपोतदार......तिला सागर आवडतो.पण सागरने लग्न करण्यास नकार दिला आहे असं मला विक्रम कडून समजलं.खरतर हा तुमचा कौटुंबिक मुद्दा आहे,पण सागरसारख्या गुणी मुलाने आयुष्यभर अस एकटं राहू नये. त्याविषयीच बोलायला फोन केला."सर


अहो सर.......सगळ्यात आधी तुम्ही पण आमच्याच कुटुंबात येता. आणि दुसरं म्हणजे...... सागरने लग्न करून त्याच पुढील आयुष्य सुखाने जगावं अस आम्हाला पण वाटते.मी एक दोनदा बोललो होतो त्याचासोबत पण तो सरळ विषय टाळतो म्हणून मीच हा विषय बंद केला."सागरचे बाबा


अच्छा...... ठीक आहे.तुमची परवानगी असेल तर मी बोलून बघू का?"सर

अहो सर.....परवानगी कसली मागताय.......तुम्ही एवढा आपलेपणाने त्याचा विचार करता यातच सगळं आलं.नक्की बोला सर तुम्ही......तुमचं तरी ऐकतो का बघू.....नाही समजलं तर चांगले कान धरून समजावं."सागरचे बाबा

बरं.....मग मी उद्याचं बोलतो त्याच्याशी......मग तुम्हाला काय ते कळवतो."सर

बरं....... चालेल.....पण मुलगी कुठली आहे."सागरचे बाबा.

मुलगी आमच्या ऑफिस मधली आहे.उत्तम आहे आणि पुण्याच्या आमदारांची एकुलती एक कन्या आहे."सर


काय??????आमदारांची मुलगी. अहो सर......आमदारांची मुलगी म्हणजे......."सागरचे बाबा

काळजी नका करू......तुमची भीती समजू शकतो.माझ्यावर विश्वास ठेवा........मुलगी उत्तम आहे."सर

सागरच्या बाबांना कृतिका विषयी थोडक्यात माहिती देऊन सर फोन ठेवतात.

काय हो...... आमदारांचं काय म्हणत होते ते......."सागरची आई

सागरचे बाबा सरांचं आणि त्यांचं बोलणं थोडक्यातच सागरच्या आई ला सांगतात. सागरची आई देवाजवळ साखर ठेवून हात जोडते.

देवा.......सगळं नीट होऊन आता तरी माझ्या लेकाचं आयुष्य मार्गी लागू दे."सागरची आई

क्रमशः....

कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा आणि आपल्या या कथेला लाईक..... शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद??

🎭 Series Post

View all