तुला तर माहीत आहे ना.....होस्टेलमध्ये असतांना पण आई काय काय द्यायची.......तिच्या खाऊच्या डब्ब्यावर तर महिना जायचा आपला....."सागर
हो ना.......बापामुळे आईने मला पण होस्टेलला पाठवलं होतं....... मोठा असून पण किती रडलो होतो मी.......पण त्यामुळेच तुझ्यासारखा मित्र भेटला. "विक्रम
हो का.......चला आता.......हे सगळं ठेवूया......नाही म्हणजे मला आठ दिवस आहेत जॉइनिंग साठी पण तुला उद्या जावं लागेल.....काय???? "सागर
हो रे..........बरं, घरी कळव आपण पोचलो तर.....काकू काळजी करत असतील."विक्रम
हो........तू जा......फ्रेश होऊन घे.....आतमध्ये गीजर आहे बघ. तोवर मी आईला कळवतो." सागर
Yes boss.....!!!!!!" विक्रम
सागर आईला फोन करतो.
हॅलो........आई........हां अगं आम्ही पोचलो हां....."सागर
पोचलात का???? बरं बरं....... आता लवकर आवरून जेवून खाऊन झोपा..... तुला औषध पण घ्यायची आहेत ना!!" सागरची आई
हो आई.....तुम्ही पण झोपा आता आणि बाबांना पण सांग पोचलो ते."सागर
हो हो सांगते. इथेच आहेत बाबा.......देऊ का फोन?? "सागर ची आई
नको नको......आता खूप थकलोय आणि प्रवास करून डोकं पण जड झालंय थोडं.......विक्रम गेलाय आंघोळीला..... तो आला की मी आंघोळ करतो आणि मस्त गरम गरम खिचडी लावतो कुकरला.....मग जेवून गोळ्या घेऊन थोडा आराम करेन........बाबांना सांग उद्या सकाळी फोन करतो......."सागर
बरं...... चालेल. काळजी घे हां बाळा.....जास्त पण दगदग करू नको.."सागरची आई
हो आई.......चल......ठेवतो....."सागर
सागर......अरे पाणी गरम करायला ठेव तुझ्यासाठी......गीजर बिघडला आहे बहुतेक....."विक्रम
अरे मग तू गार पाण्याने आंघोळ करतोयस का??? "सागर
हो.....मला चालतं..... पण तू पाणी ठेव."विक्रम
हो चालेल........असं म्हणून सागर गॅस पेटवतो.पण तीन वर्षे घर बंद असल्याने घरातील बऱ्याच गोष्टी खराब झालेल्या असतात.
अरे विक्या........बहुतेक घर बंद असल्याने हा प्रॉब्लेम झालाय.... हे बघ गॅस पण बंद आहे."सागर
काय बोलतोयस.....अरे यार......आता????? "विक्रम
आता काय???
थंडे थंडे पानी से नहाना चाहिये.....
गाना आये या ना आये.........गाना चाहिये.......
चला......जातो आंघोळीला....तोपर्यंत जेवण ऑर्डर कर......"सागर
Ok...... done? "विक्रम
सागर आंघोळीला जातो आणि इकडे विक्रम जेवणाची ऑर्डर देतो.
हॅलो......हां....... हॉटेल राजहंस......."विक्रम
हो सर......."रिसिव्हर
हां....... मला एक राजमा चावला,एक व्हेज कोल्हापुरी आणि चार बटर नान........"विकर
Ok sir.........तुमचा addres........"रिसिव्हर
मी massage करतो."विक्रम
Ok sir........"रिसिव्हर
सागर पण फ्रेश होऊन येतो.घराची हालत तर खूप वाईट असते. कोपऱ्या कोपऱ्यात जाळ्या आणि धुळमाती झालेली असते.
ऑर्डर दिलीस का???" सागर
हो दिली......येईलचं इतक्यात."विक्रम
हम्मम्म.......घराची हालत पण बघ......खूप वाईट झाली आहे.......तीन वर्षे बाबा इथली सगळी बिलं भरत होते म्हणून लाईट तरी आहे नाही तर ती पण नसती कदाचीत.तू उद्या ऑफिसला गेलास की, सगळी साफ सफाई करून घेतो."सागर
हो कर.....पण तबब्येत सांभाळून......काय??? उगाच जास्त कामं करू नको.काय???? "विक्रम
हा रे बाबा.......आधी जरा केर काढून घेतो."सागर
हां.....मी पण जरा ओला कपडा मारतो फरशी वर."विक्रम
अरे.......बाथरूममध्ये मॉप आहे बघ........आणि आता जास्त काही करू नको.वरवर चं करूयात.उद्या मी शेजारच्या काकू आहेत ना.....तर त्यांच्याकडे मावशी येतात कामाला,त्यांना विचारतो आणि घेतो एक दिवस आपल्याकडे कामाला."सागर
अरे......great........
एवढयात दारावरची बेल वाजते. विक्रम दार खोलतो.
एवढयात दारावरची बेल वाजते. विक्रम दार खोलतो.
सर.......तुमची ऑर्डर......"डिलिव्हरी बॉय
ओहहह........great.......... wait...... मी आलोच कॅश घेऊन."विक्रम
विक्रम पैसे देतो आणि त्यांची ऑर्डर घेतो.
Thank you sir....."डिलिव्हरी बॉय
Welcome buddy..... good night."विक्रम
Good night sir...... sweet dream......"डिलिव्हरी
बॉय
चल सागर,पटपट आवरू आणि गरमागरम जेवून घेऊ........म्हणजे तुला पण मेडिसिन घेऊन rest करता येईल."विक्रम
सागर कचरा काढून घेतो आणि डायनींग टेबल पुसून घेतो तर विक्रम फरशी पुसून घेतो.
प्लेट्स घेऊ का विक्या???? "सागर
हो घे घे......आलोच मी." विक्रम
सागर डब्बा खोलतो.
अरे वाह....व्हेज कोल्हापुरी.....क्या बात हे..."सागर
अरे कोपऱ्यावर हॉटेल आहे."हॉटेल राजहंस" मी बऱ्याचदा तिथे येऊन गेलो आहे.तिथली व्हेज कोल्हापूरी एवढी भारी असते ना.......आहाहा.....एकदम झणझणीत...... आणि तुला तर माहितीचं आहे आपल्याला तिखट जास्त आवडतं."विक्रम
सागर स्मित करतो आणि दुसरा डब्बा खोलतो.
राजमा चावला......."सागर
अरे हो.......तुला आवडत ना.......प्रवासातून आलोय म्हणून जास्त काही मागवलं नाही......"विक्रम
हम्मम......आमचं लग्न झालं ना विक्या.........तेंव्हा आई बाबा चार दिवस राहिले होते इकडे. इथे जवळच कुठे बाबांचे मित्र राहतात.त्यांच्या पण मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं म्हणून पाहुणचाराला बोलवलं होतं सगळ्यांना,पण आम्ही फक्त आईबाबांना पाठवलं.आम्ही नाही गेलो. संध्याकाळी उशीर होईल असं सांगून गेले आईबाबा.
जास्त त्रास नको म्हणून मानसीला खिचडी करायला सांगितली.म्हंटल जरा किचनमध्ये romance करू........आम्ही दोघांनी मिळून खिचडी बनवली.......म्हणजे खिचडी मानसीनेच बनवली मी फक्त तिला जरा त्रास देत होतो.मानसीने खिचडी कुकरला लावली आणि मी मानसीला कवेत उचलून घेतलं आणि रूममध्ये नेलं.......romance च्या नादात कुकरच्या शिट्ट्याकडे दुर्लक्ष झालं...... नि आमची खिचडीचं करपली......हे आत्ता सांगायचं कारण इतकंच की आता जसं मला आवडत म्हणजे तू राजमा चावला ऑर्डर केलास....... तसंच आम्ही पण एकमेकांच्या नकळत दोघांच्या आवडीचं मागवलं होतं.......मानसीने माझ्यासाठी राजमा चावला ऑर्डर केला होता .........त्याचीच आठवणं आणि नि डोळ्यात पाणी आलं......"सागर
मित्रा.......आठवणी अश्याच असतात.पण त्या गोड..... समजून त्यात आनंदी रहायचं...... की कडू समजून आयुष्यभर रडत कुढत बसायचं हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं." विक्रम
क्रमशः
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.ही कथा pro blog नसून फ्री सबस्क्रिशन आहे.