असेच सहा महिने निघून जातात. एव्हाना सागरची गोळ्या औषध पण बंद झालेली असतात.दिवसभर काम करून थकून भागून सागर पडल्या पडल्याचं अंथरुणात झोपत असे.बाबा पण अधून मधून सागरला भेटायला यायचे.
त्यातच सागरच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन होते. कृतिका सरपोतदार.......पुण्याच्या आमदारांची मुलगी.कृतिका सगळ्यांशी ओळख करून घेते.आमदारांची मुलगी असली तरी तिला जराही घमेंड नव्हती.पैसे,प्रॉपर्टी,पॉवर......सगळं असूनही ती खुश-समाधानी नव्हती.लहानपणापासूनचं तिला आईवडिलांच हवं तसं प्रेम मिळालं नाही.शाळा,कॉलेजमध्ये तिच्या वडिलांचा दबदबा असल्याने तिच्या कोणी जात नसे.सतत बॉडीगार्ड सोबत असल्याने मुलंच काय..........मुली सुदधा तिच्यापासून चार हात लांबच राहायच्या. त्यामुळे ती पहिल्यापासून एकटीच असायची.सगळी सुखं...... पायाशी लोळण घालत होती पण तरी ती सुखी नव्हती.
वडिलांशी भांडून घर सोडून कृतिका पुण्याहून मुंबईत आली. लेकीच्या अश्या वागण्याने ते जरा नाराजचं झाले होते पण तरी त्यांनी लेकीसाठी एक आलिशान फ्लॅट घेतला आणि कृतिका निघण्याआधी तिला घराच्या किल्ल्या कुठून घ्यायच्या वैगरे सगळं नीट समजावून सांगितलं आणि बॉडीगार्ड सोबत न पाठवण्याची तिची अट सुद्धा मान्य केली.कृतिका आई वडिलांना भेटून मुंबईत शिफ्ट झाली.
कृतिका तशी बोलकी होती पण वडिलांमुळे शांत असायची पण आता कृतिकाला बरेच मित्र-मैत्रिणी भेटले होते.तिच्याशी कुणीच आमदारांची मुलगी म्हणून पाहत नसे किंवा बोलत नसे. आपल्यातलीचं एक समजून वागत बोलत असे म्हणून ती फार खुश होती.
सागरशी पण कामाचं बोलता बोलता त्यांची छान मैत्री झाली. सागरच्या बाबतीत जे झालं होतं ते तिला तिच्या कलीग कडून समजलं होतं आणि नकळत तिला सागर आवडू लागला होता किंवा ती सागरच्या प्रेमात पडली होती असं म्हणू शकतो.
विक्रम सागरचा जवळचा मित्र आहे हे तिला माहीत होतं म्हणून तिने विक्रमशी बोलायचं ठरवलं.
हाय विक्रम........मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. महत्वाचं आहे. वेळ आहे का????"कृतिका
तुझ्या सारख्या स्वर्ग सुंदरीशी बोलायला माझ्याकडे वेळचं वेळ आहे......."विक्रम
काय??????"कृतिका
काही नाही गम्मत केली..........बोल तू...."विक्रम
माझं प्रेम आहे तुझ्या मित्रावर.मला तो खूप आवडतो."कृतिका
कोण तो भाग्यवान.......ज्याच्यावर तुझ्यासारखी स्वर्ग सुंदरी भाळली."विक्रम
चेष्टा करू नको हां........"कृतिका
बरं सॉरी..... सांग ......आणि मी काय मदत करू शकतो ते पण सांग."विक्रम
तूच करू शकतोस मदत......"कृतिका
हो.......पण त्या भाग्यवानाचं नाव तरी सांग."विक्रम
सागर........."कृतिका
What????? Are you serious..........." विक्रम
Yes विक्रम........
विक्रम...........कसला विचार करतोयस."कृतिका
सागरला काय आणि कसं सांगू....."विक्रम
ते आता तू बघ.
एवढं बोलून कृतिका तिच्या डेस्क वर निघून जाते आणि इकडे विक्रम डोक्याला हात लावून बसतो.
कृतिका इशाऱ्याने विक्रमला सागरशी बोलायला सांगते.सागर हे बघत असतो पण त्याला समजेना ह्यांचे इशारे कशासाठी चालू आहेत. असेच आठ दिवस निघून जातात.
काय रे विक्या.…....तू आणि कृतिका एवढं इशाऱ्यात काय बोलत असता????? सागरच्या प्रश्नाने विक्रमला ठसकाचं लागतो.सागर पटकन त्याला पाणी देतो आणि म्हणतो......ती..........बघ चिमणी कशी उडते.
आता........रात्री दहा वाजता कुठली रे चिमणी."विक्रम
अरे मला लहानपणी ठसका लागला की आई असंच म्हणायची. पण त्या चिमणीचं राहूदे तुमचं काय चाललंय.... ते सांग आधी."सागर
काही नाही रे........ते आपलं असचं......कामच.तेवढ्यात विक्रमच्या फोनवर मॅसेज ब्रिन्ग होतो.
सागर बघतो तर त्यावर कृतिका असं नाव असत.
कृतिका..….हम्मम्म......यंदा कर्तव्य आहे.......हां..."सागर
अरे नाही रे बाबा......माझी आयटम दुसरी आहे."विक्रम
दुसरी......म्हणजे......कृतिका सोबत काय टाईमपास करतोस की काय???? बघ रे बाबा......तिचा बाप आमदार आहे हां...... उगाच पंगा होईल."सागर
पंगा तर झालाय........अजून काय बाकी आहे."विक्रम तोंडातल्या तोंडातच पुटपुटतो.
काय बोलतोयस तू?? मला समजेल अस बोलशील का?"सागर
काही नाही जेव आधी.......नंतर सविस्तर बोलू आपण."विक्रम
सविस्तर.......काही serious आहे का???"सागर
हो पण आणि नाही पण........"विक्रम
अवघड आहे तुझं......"सागर
माझं नाही......तुझं अवघड आहे.जेव आता."विक्रम
काय बोलतोयस ना........जाऊदे."सागर
जेवण आटोपल्यावर सागर किचन आवरते तर विक्रम टेबल साफ करून पाण्याच्या बॉटल भरत असतो.किचन आवरून सागर गॅलरीत जाऊन बसतो.पाठोपाठ विक्रम सुद्धा बडीशेप घेऊन येतो.
हम्मम्म......ही घे...."विक्रम
Thanks...........बरं ते सगळं सोड.आपला मगाशी राहिलेला विषय आधी पूर्ण कर.तुला आवडते का कृतिका."सागर
हो.....पण मला नाही आवडत."विक्रम
हो.......पण मला नाही आवडतं म्हणजे.......तू काय बोलतोयस तुला तरी कळतंय का?????"सागर
हो..."विक्रम
परत हो......."सागर
हो म्हणजे मला ती नाही आवडत तिला तू आवडतोस."विक्रम
काय?????"सागर
हो.…......म्हणजे मला माहित पडून आठ दिवस झाले पण तुझ्याशी कसं बोलावं हेच सुचेना."विक्रम
विक्या.......माझं लग्न झालं आहे.माहीत आहे ना तुला."सागर
सागर........डोकं बिकं फिरलयं का तुझं?? अरे साडे तीन वर्षे झाली आता मानसीला जाऊन......पंधरा दिवस पण संसार नाही केला आणि म्हणे लग्न झालंय माझं........आयुष्यभर असाच राहणार आहेस का?विक्रम जरा चिडतचं बोलतो.
हे बघ विक्या.......मानसीला विसरुन शक्य नाही. संसार जरी पंधरा दिवसांचा असला ना......तरी नात्याला खूप वर्षे झालीत आणि त्या आठवणी विसरणं अशक्य आहे.प्लिज तू कृतिकाला नाही सांग."सागर
अरे तुला कोण म्हणतंय मानसीला विसर.......फक्त move on कर.आयुष्यभर काय आईवडिलांच्या जीवावर जगणार आहेस का???? त्यांची पण इच्छा असेलच की,तू पुन्हा नव्याने सुरुवात करावी अशी.मग समोरून व्यक्ती जर जवळ येत असेल.....तर तू तिला का झिडकारतोयस.अरे लहानपणापासून प्रेमासाठी आसुसली आहे ती........तिला पण हक्क आहेच ना.असं समज मानसी पुन्हा तुझ्या आयुष्यात कृतिकाच्या रूपाने आली आहे.मानसीला मामी च्या त्रासामुळे प्रेम भेटलं नाही.....आणि कृतिकाला सगळं सुख असूनही प्रेम भेटलं नाही."विक्रम
विक्या.......मानसी असणं आणि मानसी समजणं सोप्प वाटत का तुला."सागर
नाही........अजिबात नाही......पण अवघड तरी कुठे आहे."विक्रम
अरे तूच म्हणालास ना आता समज म्हणून.......मग."सागर
अरे यार.......काय तू पण डोक्याची आयबहिन करतोस........जाऊदे झक मार तू......तुला काय करायचं ते कर. तुझ्यासारख्या आठवणी कुरवाळत बसणाऱ्या मूर्ख माणसाशी मला वादचं नाही घालायचा.मी पुन्हा माझ्या घरी राहायला जातोय उद्यापासून.तुझं तू बघ.
विक्रम चिडतचं सोफ्यावर येऊन झोपतो तर सागर विक्रमच्या बोलण्याचा विचार करत असतो.
क्रमशः.....
कथा कशी वाटली हे तुमच्या कमेंट द्वारे जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.सोबतच सागरने काय निर्णय घ्यावा असे तुम्हाला वाटते हे मला तुमच्या कमेंट मधून सांगा.
धन्यवाद??