Ok sir........ लगेच आवरतो."सागर
सागर तासाभरात त्याची सगळी कामं आटोपतो आणि सरांसोबत मिटिंगसाठी निघतो. जवळपास तीन चार तासांच्या मिटिंग नंतर दोघेपण फ्री होतात.
सागर.......आता आपण लंच करू मग तू डिरेक्टली घरी गेलास तरी चालेल. पुन्हा ऑफिसला उलट सुलट जाण्यापेक्षा हे बरं......."सर
Ok sir....."सागर
बरं...... आता काय खाणार तू......"सर
काहीही चालेल सर......"सागर
Excuse me......."सर
Yes sir......"वेटर
एक चिकन हंडी,चार रोटी आणि स्टीम राईस."सर
Ok sir....."वेटर
वेटर ऑर्डर घेतो आणि निघून जातो.
सागर........एक विचारू का???"सर
हो विचारा ना सर........."सागर
तुझा लग्नाचा......काही विचार वैगरे आहे का????"सर
सर.........ते........विक्रम.......म्हणजे विक्रम काही बोलला का?"सागर
हो.......तसं समज हवं तर.......खरतरं मी माझ्या मुलीसाठी तुला विचारणार होतो,पण स्वतःच्या लेकीसाठी मी दुसऱ्याच्या लेकीच प्रेम नाही मारू शकत म्हणून तुला कृतिकासाठी मी स्वतः विचारतोय....."सर
सर .......मला ते......"सागर
हे बघ सागर.......तुझं आणि विक्रमचं जे बोलणं झालं आहे ते सगळं मला माहित आहे.मला विचारशील तर मी विक्रमच्या बाजूने आहे.तो जे काही बोलला ते बरोबरच आहे.तू move on झालं पाहिजे.जर तर च्या गोष्टींना काही logic नाही........ Present आणि future चा विचार कर.आमदारांची मुलगी आहे म्हणून सर तिची वकिली करतायत अस नको समजू........खरचं कृतिका खूप चांगली मुलगी आहे."सर
मी जरा फ्रेश होऊन येतो.असं सांगून सागर washroom कडे जातो.तोंडावर थोडं पाणी मारतो तर त्याला आरश्यात मानसी त्याच्या पाठी उभी असलेली दिसते. तो मागे वळून बघणारचं असतो की मानसी बोलते.
थांब सागर........मागे वळू नकोस.
जे आहे ते तुझ्या समोर आहे आणि तुझ्या पुढच्या नवीन आयुष्याची वाट बघतंय........ कृतिका खरचं चांगली मुलगी आहे.माझ्या आठवणीत असा कायम राहिलास तर मलाच अपराधी वाटेल. तू आनंदी राहिलास तर मला पण खूप आनंद होईल.आपण दोघांनी पाहिलेली स्वप्न कृतिका सोबत पूर्ण कर.तुझ्या सुखातंच मी सुखी आहे राजा.......प्लिज..........सागर.......विक्रम आणि सरांचं ऐक. अरे आईबाबांची पण हीच इच्छा आहे.त्यांना तुझी फार काळजी वाटते रे..........
जे आहे ते तुझ्या समोर आहे आणि तुझ्या पुढच्या नवीन आयुष्याची वाट बघतंय........ कृतिका खरचं चांगली मुलगी आहे.माझ्या आठवणीत असा कायम राहिलास तर मलाच अपराधी वाटेल. तू आनंदी राहिलास तर मला पण खूप आनंद होईल.आपण दोघांनी पाहिलेली स्वप्न कृतिका सोबत पूर्ण कर.तुझ्या सुखातंच मी सुखी आहे राजा.......प्लिज..........सागर.......विक्रम आणि सरांचं ऐक. अरे आईबाबांची पण हीच इच्छा आहे.त्यांना तुझी फार काळजी वाटते रे..........
सागर सगळं वळून न बघता ऐकून घेतो आणि पटकन मागे वळून बघतो.तर मानसी नसते. तो पुन्हा तोंडावर पाणी मारतो आणि बाहेर जातो.
सर.......मी तयार आहे लग्नासाठी......."सागर
खरचं सागर........"सर
हो सर......."सागर
Fantastic...........मी लगेच कळवतो विक्रम ला....."सर
नको सर.....त्याला मी सांगतो."सागर
Ok..... no problem......."सर
दोघे पण जेवण उरकून निघतात.सागरने जेवता जेवताचं विक्रमला भेटायचं आहे असा मॅसेज केलेला असतो सोबत कृतिकाला घेऊन ये असंही सांगितलेलं असतं. घरी जाऊन सागर जेवण वैगरे करून ठेवतो.ऑफिस मध्ये जास्तीच कामं असल्याने विक्रमला लेट होणार असतो.तसं तो सागरला कळवून ठेवतो.
नऊ च्या दरम्यान दारावरची बेल वाजते.सागर दारात जाऊन दीर्घ.......श्वास घेतो आणि दार खोलतो.
नऊ च्या दरम्यान दारावरची बेल वाजते.सागर दारात जाऊन दीर्घ.......श्वास घेतो आणि दार खोलतो.
विक्रम आणि कृतिका दोघेपण आत येतात.सागर दोघांना पाणी आणून देतो. विक्रम आणि कृतिका पाणी पितांनाच एकमेकांकडे बघत असतात.विक्रमला थोडा अंदाज आलेलाच असतो की सागरने का बोलावल आहे,पण हो म्हणायला की नाही म्हणायला हे समजतं नसतं.
सागर पण दोघांसोबत येऊन बसतो.
तू काय असा प्रश्नार्थक नजरेने बघतोयस......"सागर
बघत नाही.......विचार करून अंदाज लावायचा प्रयत्न करतोय.तू नक्की हो बोलणार की नाही......"विक्रम
हो........मी हो म्हणायलाच बोलावल आहे तुम्हाला."सागर
म्हणजे????? "विक्रम
कृतिका दोघांकडे काही न समजल्यासारखी बघत होती.
कृतिका दोघांकडे काही न समजल्यासारखी बघत होती.
म्हणजे........मी.......कृतीकसोबत लग्न करायला तयार आहे."सागर
काय?????"कृतिका
हम्मम्म.........म्हणजे मी असा अचानक कसा तयार झालो याचाच विचार करताय ना........."सागर
हो......"कृतिका
मला सरांनी सगळ्याच गोष्टींची जाणीव करून दिली.......खरं तर ज्या गोष्टी विक्रमने सांगितल्या त्याच सरांनी सांगितल्या......पण विक्रम मित्र असल्याने मी त्याच्यावर फक्त चिडलो, मात्र सरांचं बोलणं ऐकल्यावर मी विक्रमच्या बोलण्याचा विचार केला आणि मानसीने पण सरांच्या आणि विक्रमच्या बाजूने मला समजावलं म्हणून मग तयार झालो."सागर
मानसीने???"विक्रम
हो.........कदाचित माझ्या मनाने मानसीच्या रुपात येऊन सांगितलं असेल."सागर
हो सागर......पण मग असं नेहमीच होणार का?????म्हणजे मानसी येऊन एखादी गोष्ट सांगेल आणि मग तू तयार होणार अस......."कृतिका
नाही कृतिका........हा निर्णय घेणं खूप कठीण होतं....... पण आपल्या नात्यात तुझ्या निर्णयाला महत्व असेल......पण कृतिका ......आपलं नातं पुढे न्यायला मला थोडा वेळ द्यावा लागेल तुला........कारण........"सागर
सागर......तू वेळ नक्की घे.......पण हक्क नको मारू......"विक्रम
नाही.......मी कधी कोणाचाचं हक्क मारला नाही.कृतिका चा पण हक्क नाही मारणार.फक्त थोडा वेळ लागेल."सागर
विक्रम खुश होऊन सागरला मिठी मारतो. कृतिका उठून हॉल मध्ये लावलेल्या मानसीच्या फोटो कडे जाते.
कृतिकाला मानसीच्या फोटोकडे जातांना बघून सागर आणि विक्रम पण तिच्या पाठी जातात.
मी तुझी जागा नाही घेऊ शकत आणि मला ती घ्यायची पण नाही.........सागरच्या मनात माझं स्वतःच असं स्थान असावं एवढीच इच्छा आहे. त्याने तुला विसरावं असा अट्टहास नाही फक्त माझी तुलना कधी तुझ्याशी होऊ नये.तुझ्यासारखं वागता नाही येणार पण प्रेम मात्र तुझ्यापेक्षा जास्तच करेन सर्वांवर. तू माझी सोबत केलीस तर मला खूप आवडेल."कृतिका
कृतिका.......Thanks......... मला समजून घेतल्याबद्दल."सागर
चला.......आता आभार प्रदर्शन झालं असेल तर जेऊन घेऊ.......एवढया आनंदाच्या बातमी ने खुपचं जोरात भूक लागली आहे."विक्रम
चला.......आता आभार प्रदर्शन झालं असेल तर जेऊन घेऊ.......एवढया आनंदाच्या बातमी ने खुपचं जोरात भूक लागली आहे."विक्रम
हो चल......जेऊन घेऊ......त्या आधी मी जरा आईला फोन करतो."सागर
हो चालेल........तू आईला कॉल कर. मी जेवण वाढतो."विक्रम
हम्मम.....मी पण येते मदतीला....."कृतिका
हो हो मॅडम.......आता तुमचचं घर आहे......सगळं तुम्हीच करायचं आता."विक्रम कृतिकाची चेष्टा करत बोलला.
सागर गावी आईला कॉल करतो.
हॅलो........आई......"सागर
हॅलो........"सागरची आई
हां आई........अगं मी बोलतोय.........काय चाललंय.......झालं का जेवण...."सागर
हो......कधीच...... तुझं झालं का???"सागरची आई
नाही गं..... बसू आता."सागर
बाकी काय????? म्हणतोयस.......सगळं ठीक आहे ना......"सागरची आई
हो आई.......सगळं ठीक आहे. बरं....... आई......मी काही तरी सांगायला फोन केला आहे."सागर
काय रे???? बोल ना...."सागरची आई
आई.......मी लग्न करायचा विचार करतोय."सागर
काय???? खरचं......."सागरची आई
हो आई.......आमच्या ऑफिसमध्ये...."सागर
अरे आम्हाला माहीत आहे......तुझ्या सरांचं फोन आला होता......पण तू तयार झालास हे सांगितलं नाही त्यांनी."सागरची आई
हो आई....मीचं सांगितलं त्यांना........बरं बाबांना पण सांग. मी उद्या ऑफिसला जायच्या आधी फोन करेन त्यांना असं सांग.......आता जेवतो आम्ही पण."सागर
हो हो चालेल........बरं सागर..........खूप छान वाटलं हां........ तू लग्नाला तयार झालास हे ऐकून........खुश रहा बाळा......"सागरची आई
हो आई......चल ठेवतो आता......"सागर
हो चल......काळजी घे."सागरची आई
सागर मनोमन देवाचे आभार मानतो.ज्याने त्याला एवढी चांगली माणसं त्याच्या आयुष्यात दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आई देवासमोर दिवा लावते आणि साखर ठेऊन हात जोडते.
देवा..........माझ्या लेकराला सुखी ठेव.......आता त्याचं आयुष्य मार्गी लागुदे......आमचं आयुष्य पण त्याला दे रे देवा......"सागरची आई
दुसऱ्या दिवशी सकाळी आई देवासमोर दिवा लावते आणि साखर ठेऊन हात जोडते.
देवा..........माझ्या लेकराला सुखी ठेव.......आता त्याचं आयुष्य मार्गी लागुदे......आमचं आयुष्य पण त्याला दे रे देवा......"सागरची आई
क्रमशः
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा.कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद???
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा.कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद???