Login

आठवणी......गोड की कडू (भाग १३)

Sk


Good morning.........."विक्रम

Very good morning........ चला पटापट आवरून घ्या....म्हणजे ऑफिसला जायला मोकळा.....


हां...... आता स्नानसंध्या आटोपून कार्यालयात रवाना होतो."विक्रम


थांब......गार पाणी नको घेऊ.शेजारच्या काकुंकडून मी हिटर घेऊन आलोय."सागर

अरे कशाला.......बरं चल राहूदे.मी आवरतो पटकन.
विक्रम आंघोळ करून रेडी होतोच असतो की मेंदुवड्यांच्या वासाने तो बाहेर येतो.


क्या बात हे.......मेंदूवडे...."विक्रम

हम्मम......सकाळी खालून घेऊन आलो म्हंटल उपाशी कुठे जाशील......आणि खालच्या कोपऱ्या वरच्या टपरीवरून चहा आणला.चल खाऊन घे पटकन."सागर


हो यार....पटकन घेतो खाऊन नाहीतर उशीर होईल कसला झालाच आहे उशीर.साला लवकर उठून पण लेट होतोच नेहमी........विक्रम उभ्या उभ्याचं मेंदूवडे खाताना बोलतो.


उशीर झालायं....... मान्य आहे पण नीट बसून खा."सागर


नको नको.....झालं माझं...चल निघतो मी....आणि हे घे वीस हजार आहेत.काल काकांनी माझ्या अकाउंटला टाकले होते. आता खर्चाला लागतीलचं ना!!!! मी रात्रीच काढुन आणले पण द्यायच्या वेळी नेमका तू झोपला होतास."विक्रम


गेली तीन वर्षे सगळं बाबाचं बघताहेत. दोन्ही कडचा भार त्यांच्या एकट्यावरचं आला होता शिवाय माझ्या ट्रीटमेंटचा खर्च वेगळाचं........ त्यांनी सगळी बिलं भरली होती म्हणून लाईट होती. घरपट्टी-पाणीपट्टी सगळं क्लिअर केलं होतं त्यांनीच.मला खूप अपराधी वाटत आहे."सागर


त्यात काय अपराधी वाटण्यासारखं.....जे झालं तो एक अपघात होता आणि आता जर त्याची भरपाई करायची असेल तर लवकर खुश रहा.तू खुश राहिलास तर त्यांनाही समाधान वाटेल.काय??? चल निघतो मी.काळजी घे आणि जास्त काम करत बसू नको.....थोडा आराम पण कर.......ok..... bye......"विक्रम


Ok......चल bye...."सागर


घर साफ करायचं असत म्हणून सागर फक्त हात, पाय,तोंड धुतो. नाश्ता करतो आणि साफसफाई करायला घेतो. शेजारच्या काकूंकडच्या कामवाल्या मावशी पण येतात.दोघे मिळून सगळं घर चकचकीत करतात.घरात जास्त सामान नसल्याने फार वेळ नाही लागत.सागर गॅस कम्पनीत फोन करून सर्व्हिसिंग साठी माणूस पाठवायला सांगतो.इलेक्ट्रिशन वाल्याला पण बोलावून सगळी वायरिंग चेक करून घेतो.सगळी कामं जिथल्या तिथे करून सागर दुपारी साडे तीन च्या सुमारास आंघोळ करून आईने दिलेले दोन बेसनाचे लाडू खातो आणि औषध घेऊन झोपतो.


सागर............सागर..........शीट यार........हा दार का खोलत नाही????? सागर..........फोन तरी उचल यार.....
सागर दार वाजवत स्वतःशीच बोलत असतो.शेवटी नाईलाजाने दाराची कडी तोडण्यासाठी तो माणूस बोलावतो आणि दाराची कडी तोडायला लावतो.दार उघडल्यावर विक्रम पळतच आतमध्ये जातो,कारण दाराची कडी तुटेपर्यंत त्याच्या मनात नको नको ते विचार येत असतात.सागरच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.खूप समजवल्यावर तो शांत झाला होता.सागरला तेच आठवत होतं.

सागर रूममध्ये जाऊन बघतो तर सागर अजिबात हालचाल न करता झोपलेला असतो.


विक्रम सागरच्या चेहऱ्यावर एकदोनदा थोपटतो.


सागर......ए सागर........दाराची कडी तोडायच्या आवाजाने शेजारचे पण जमलेले असतात. सागरच्या बाबतीत झालेला सगळा प्रकार त्यांना माहीत असतो म्हणून तेही जरा घाबरलेले असतात आणि विक्रम पाठोपाठ ते पण सागरच्या रूममध्ये जातात.

सागर.............
काकू.......जरा पाणी आणता का किचमधून.....विक्रम शेजारच्या काकूंना विनंती करतो ज्या तिथेच असतात.काकू हो म्हणून किचनमध्ये पाणी आणायला जातात.विक्रम जरा घाबरतचं सागरच्या नाकाला हात लावत चेक करत असतो तर सागरचा श्वास चालू असतो हे बघून विक्रमला थोडे बरे वाटते. काकू पाणी घेऊन येतात तसा विक्रम लगेच ग्लासतील पाणी हातावर घेऊन सागरच्या चेहऱ्यावर शिंपडतो आणि पुन्हा सागरला आवाज देतो.


सागर.........ए सागर.........सागर......."विक्रम


हम्मम्म्म........हां...... कोण.......सागर डोळ्यांची उघडझाप करत विचारतो.


अरे मी..........विक्या.......उठ बरं.......सावकाश उठ...... काय रे.....काय झालं???? चक्कर वैगरे आली का????"विक्रम


नाही रे.....का??? आणि तू आत कसा आलास......"सागर


कसा म्हणजे.....दाराची कडी तोडून."विक्रम


पण तू दाराची कडी का तोडलीस????बेल वाजवायची ना. "सागर

अरे बेल वाजवली मी पण बहुतेक बेल बंद आहे आतून. जवळ जवळ वीस मिनिटे दार वाजवलं मी.......तुला कॉल पण केले. शेवटी नाईलाजाने लॉक वाल्याला बोलावून कडी तोडून घेतली."विक्रम


अरे यार......i am so sorry........ अरे मी थकलो होतो म्हणून जरा डोकं दुखत होत,मग दोन लाडू खाल्ले आणि औषध घेऊन झोपलो.बहुतेक मी झोपेची गोळी पण घेतली.थांब मी चेक करतो.
अरे.......हां यार.......ही बघ....खरंच sorry यार."सागर


अरे sorry काय........मी घाबरलो ना.....बाकी काही नाही."विक्रम


अरे.....इ am so sorry......... sorry काकू......तुम्हाला पण त्रास झाला.मला आवाजच नाही आला कसला.खरचं sorry."सागर


अरे बाळा......sorry कशाला बोलतोस......होतं कधी कधी.....काळजी घे आणि आराम कर जरा....."शेजारच्या काकू


हो काकू......सागर पुन्हा हात जोडून माफी मागतो आणि काकू जातात.

बरं वाटतंय का आता तुला.........घाबरवलसं यार मला.......जाऊदे चल....फ्रेश होऊन घे मी त्या माणसाला दुसरी कडी बसवायला सांगतो आणि गॅस चं काम झालंय का???"विक्रम


हो झालंय...."सागर

बरं मग तू फ्रेश हो आणि मस्त कडक "सागर स्पेशल" चहा टाक. मी कडीचं बघतो."विक्रम

क्रमशः

कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.