Login

आठवणी......गोड की कडू(भाग८)

Sk
काय रे........येताय ते बोललात पण नाही,थांबा जरा बाहेरचं दृष्ट काढते."सागर ची आई

दोघेपण दारातचं थांबतात. सागर ची आई दोघांची दृष्ट काढते,पायावर पाणी टाकते,डोळ्यांना पाणी लावून दोघांना घरात घेते.दोघेपण आईबाबांच्या पाया पडतात.

काय ओ सागरची आई........कोण आलंय...... नवीन सुनबाई वाटते....."शेजारच्या कांता काकू

हो मग, माझ्या सागरची नवरी आहे.........."सागर ची आई

अगगबाई...........विलायती आहे वाटते!!!! जीन्सपॅन्ट घातली आहे ना!!!म्हणून विचारलं हो."कांता काकू
मानसी जाऊन त्यांना वाकून नमस्कार करते.

काकू.......गाडीत आरामदायी प्रवास व्हावा.....म्हणून जीन्सपॅन्ट घातली,पण संस्कार मात्र वागण्यात आणि विचारात आहेत आणि ते आपल्या भारताचेच आहेत."मानसी

बरं बरं.........सुखी रहा........छान आहे हो सुनबाई....जरा फटकळ आहे,असो........ संसार सुखाचा करा हो दोघे........."कांता काकू
काकू निघून जातात.

आई.........काकू अजून आहेत तश्याच आहेत हां....."सागर

हो रे.......मुलगा बाहेरगावी शिकायला गेला, आणि आला तो तिकडून लग्नच करून आला.नवीन सूनबाईं काही दिवस राहिली आणि काही दिवसांतचं त्याची बायको भांडण करून आई वडिलांना उलट बोलून कायमची गेलीत बाहेरगावी.आता तिची भाषा त्यांना समजली नाही...... पण रागाला काही भाषा,रंग,जात नसते. लेकाच्या अश्या वागण्याने भाऊंना अटॅक आला आणि ते गेले.कांता काकू एवढी वर्षे एकट्याच आहेत,अजून पण दूर गेलेल्या मुलाची वाट बघताहेत......म्हणून त्या अश्या वागतात बोलतात.चला ते जाऊदे.......तुम्ही हात पाय धुवून घ्या मी पटकन भाकरी टाकते."सागर ची आई

अगं आई......काही बनवू नको आम्ही जेवण करूनच आलो.एवढा उशीर होणार माहीत होतं आम्हाला.उगाच तुला त्रास नको म्हणून आम्ही जेवूनचं आलो. जरा आराम करतो,पण संध्याकाळी मस्त कांद्या तेलातली सुकट आणि चुलीतली भाकरी कर."सागर

हो रे बाळा.......जा दोघे पण जरा आराम करा."सागर ची आई


सागरचे बाबा......आपल्या मोरेंच्या वाड्यात कालच दोन गाई इयाल्यात.......जरा ग्लासभर चिका भेटतोय का ते बघा ना!!!!! पोरीला लय आवडतो."सागर ची आई

हो हो......बघून येतो मी,तोवर पोरांना आराम करु दे."सागर चे बाबा

सागर पडल्या पडल्याचं झोपतो. मानसी सुद्धा लगेच झोपते पण जागा नवीन असल्याने तिला तासाभरातच जाग येते.

सागरची आई अंगणातला केर काढत असते. मानसी पाठच्या दारात जाऊन तोंडावर पाणी मारते आणि मागची फुल झाडं बघत असते. कारल्याच्या वेलींवर कारली पण आलेली असतात.मानसी उठल्याच सागरच्या आईला समजतं,त्या पाठी येतात तर मानसी झाडं बघण्यात दंग असते.

काय बघतेस एवढं निरखून????"सागर ची आई

काही नाही...... भाज्या किती छान आल्या आहेत.तुम्ही तर मुंबईत होतात तरी भाज्या एवढया टवटवीत कशा???"मानसी

अगं....... मी कांता काकूंना पाणी घालायला सांगून आले होते.कोणी नाही घरात, म्हणून मग त्या अश्या तश्या कामात स्वतःला रमवून घेतात."सागर ची आई

अच्छा!!!!! तरी बऱ्याच भाज्या आहेत घरातच.....बाहेरून फार काही आणावं लागत नसेल."मानसी

हो मग, घरच्या भाज्यांचा स्वाद आणि ते खाण्याचं सुख वेगळंच असत."सागर ची आई.

मला भाज्या वैगरे यामध्ये एवढं काही समजत नाही पण मी आमच्या हॉस्टेलच्या रूममध्ये बरीच फुलझाडं लावली होती.स्पेशली "मोगरा" परीक्षेच्या वेळी मोगऱ्याचा सुगंध अख्या रूममध्ये दरवळला ना की अभ्यासाचा आणि जगरणाचा थकवा कुठल्याकुठे पळायचा.रूममध्ये तीन खिडक्या त्यातल्या दोन खिडक्यांमध्ये फुलझाडं तर एका खिडकीत दुधवाल्यांचे टब असतात ना त्यातल्या दोन टब मध्ये मेथी आणि कोथिंबीर पेरली होती.दर वीस पंचवीस दिवसांनी दोन्ही टब अगदी हिवेगार होत असे.भाजी खाण्यायोग्य झाली की ती कॅन्टीन मध्ये नेऊन द्यायचे.काय चव लागायची त्या भाजीची......आहा.........खरंच खूप सुख मिळायचं त्या एका घासात."मानसी

काय चाललंय सासू-सुनेच.सुनबाई ऍग्रीकल्चर शिकतायत वाटते."सागर

मी आणि ऍग्रीकल्चर......... नको रे बाबा.......शेतकरी नवरा चालेल पण शेतीची काम जमत नाहीत.......मानसी दोन्ही हात जोडत बोलते.

तुम्हाला प्रॉपर्टी हवी असते,एकुलता एक मुलगा हवा असतो, गावाकडे जमीन हवी असते पण शेतकरी मुलगा नको असतो......."सागर

मी कुठे म्हंटल शेतकरी नवरा नको.फक्त शेती जमणार नाही असं बोलली,कारण शेती करणे खायची गोष्ट नाही.
शेतकरी तर जगाचा "पोशिंदा" आहे.शेतकरी एवढा घाम गाळतो म्हणून तर आपल्या ताटात अन्न येतं. शेतकर्यांनी उपोषण केलं तर आपण काय खाणार.कोणी हिरो-हिरोईन मेल्यावर आपण दुःख करत बसतो,पण आपली पोटं भरणारा गेला तर आपण तसूभरही दुःख करत नाही. माझ्या आयुष्यात फक्त तीन हिरो आहेत.पहिला शेतकरी...... जो सगळ्या जगाचा "बाप" आहे.दुसरा माझा प्रत्येक "जवान" भाऊ जो सीमेवर दिवसरात्र एक करून आपलं आणि आपल्या देशाचा रक्षण करतो.आणि तिसरे म्हणजे पोलीस खाकी........जे सगळे सणवार,खाजगी समारंभ स्वतःचा परिवार सोडून आपली रक्षा करायला सदैव तत्पर असतात."मानसी

हो अगदी बरोबर बोललीस.खरंच या सगळ्यांच्या कार्याला सलाम.जे निस्वार्थपणे आपली सेवा करतात."सागर

चला चला आता सगळे चहा पिऊन घेऊ मग जरा मानसीला गाव फिरवून आण."सागर ची आई

हो आई......चालेल."सागर

क्रमशः

कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट मधून नक्की कळवा आणि कथेला लाईक शेअर जरूर करा.