Login

आठवणी.... गोड की कडू(भाग ७)

Sk


सागर...... बॅग्स आईबाबांच्या खोलीत ठेव म्हणजे घरभर पसारा नाही होणार,आणि असही ती खोली बंदच असते ना!!! मग बरं पडेल काम आवरायला...."मानसी

हो ते ठेवतो मी पण लगेच कामाला नको लागू अजून आपल्याकडे आठ दिवस आहेत ऑफिस जॉइनिंग साठी.दोघे मिळून आवरू सगळं म्हणजे काम पटापट होतील."सागर

हो चालेल. आज जरा आराम करू."मानसी हाताला बॉडिलोशन लावताच म्हणते.

हो थोडा थकवा आलाच आहे. तू आराम कर. आज मी चिकन पुलाव बनवतो. तू माझ्या हातचं जेवण जेव."सागर

अरे वाह!!!!! मग आज माझी मज्जाच आहे.."मानसी

हो मगsssssss लाडाची बायको आहेस माझी."सागर मानसीची दोन्ही गाल ओढत म्हणाला. मानसी पण मग मांजरीसारखे डोळे करून सागरला हसून दाखवते.

मानसी रूम आवरून थोडा आराम करते.सागर पण मेल चेक करून थोडा पडतो. संध्याकाळी मानसी उठून किचन स्वच्छ पुसून घेते आणि चिकन पुलाव ची तयारी करते.इकडे सागर पण फ्रेश होऊन चिकन आणि पुलाव साठी सामान घेऊन येतो.सोबतच दुसऱ्याच दिवशीची कोल्हापूरची दोन तिकिटं पण काढून आणतो.

मानसी सागरला काय हवं नको ते हाताशी देते.असचं दोघे मिळून चिकन पुलाव आणि कोशिंबीर बनवतात.

वाह सागर............काय घमघमाट सुटलाय पुलावचा. मला तर खूप जोरात भूक लागली आहे."मानसी

हो ना.......चल तू कोशिंबीरचं आवरून घे, मी वाढतो."सागर

हो चालेल."मानसी

सागर पटपट वाढतो आणि दोघेही जेवायला बसतात.सागर स्वतःच्या हाताने मानसीला घास भरवतो.

अम्म्मम्म..........वाव सागर........काय भारी झालाय चिकन पुलाव............क्या बात हे........"मानसी हाताचा मोर करून दाखवते आणि सागरला बोलते.

खरचं आवडला तुला??"सागर

अरे आवडला म्हणजे काय विचारतोयस......मी तर फॅनचं झाली तुझी.."मानसी पण तिच्या ताटातून एक घास उचलत सागरला भरवते.

आयला....... खरचं की, एकदम भारी झाली आहे.."सागर स्वतःचचं कौतुक करतो.

मानसी लगेच सागराचा हात पकडते आणि त्याला मिठी मारते.

काय झालं????"सागर

तू मला सोडून कधीच जाणार नाहीस ना???"मानसी

अगं वेडे......अचानक का हा प्रश्न????"सागर

काही नाही असंच...."मानसी

अगं......मी तर तुला माझ्या प्रत्येक जन्मात मागितलं आहे. फक्त सात जन्मासाठी तू नको मला..........त्यामुळे हा विचार........मनात पण आणू नको. आणि हे सोडून जाऊ वैगरे खूळ मध्येच कुठे आलं???"सागर

ते आपलं.......असचं...... मी तर बघत होते तू काय बोलतोस ते."मानसी


अच्छा.........!!!!!! बरं मी उद्याची कोल्हापूरची आपल्या दोघांची रिजर्वेशन केली आहे. सुट्टी आहे तर चार दिवस गावी जाऊन येऊ म्हणून काढली आहेत. आणि परत मग आईसाठी जे आणलं आहे ते पण देता येईल.

काय????? खरचं...... आपण उद्या जातोय."मानसी खुश होऊन विचारते.

Yes madam!!!! "सागर

अरे पण आता एवढ्या कमी वेळात मला काही बनवता ही येणार नाही."मानसी

अगं आता राहूदे ते........मनालीवरून जे आणलं आहे ना तेच देऊ.गावी गेल्यावर आई आपल्याला देवीच्या दर्शनाला तर पाठवणारच........मग तेंव्हा घे तिकडून तुला हवं ते."सागर

बरं ठीक आहे.आपण किती दिवसासाठी जाणार आहोत."मानसी

चार दिवस जाऊ, मग इकडे येऊन परत सगळी ऑफीसची तयारी करावी लागेल."सागर

ओके चालेल,मी हे सगळं आवरून बॅग भरते.गावी जातोय म्हंटल्यावर चार साड्या घेते आणि दोन गाऊन टाकते रात्रीसाठी."मानसी

हो चालेल.मी पण हेल्प करतो तुला म्हणजे पटकन होईल.
"सागर

दोघेपण सगळी काम भरभर आवरतात.
अरे पण सागर......असं अचानक का जायचं ठरवलं....."मानसी

सुट्टी आहे ना,म्हणून विचार केला जाऊन येऊ.आताच ऑफिस ने एवढ्या सुट्ट्या दिल्या, परत गावी जायला सुट्टी घ्यायला बरं नाही वाटणार,आणि एवढं काम पण पेंडिंग आहे,नंतर एकदम खुप लोड पडेल कामाचा आणि असं पण जॉईन झाल्यावर किमान आठ दिवस तरी मला लेट होईलचं."सागर

बरं ठीक आहे.....चार दिवस तर चार दिवस तेवढंच गावच घर ही बघता येईल मला."

घर..........अगं वाडा आहे आपला........तुझ्या स्वप्नात यायचा ना अगदी तसा........"सागर

खरचं!!!!"मानसी

बघ आता,जाऊ तेंव्हा......."सागर

आईबाबांना सांगितलं का तू???"मानसी


नाही.......त्यांना सरप्राईज द्यायचं आहे."सागर

ओह.......छान आहे आयडिया......."मानसी


बरं चल मला मदत कर आता,काय रे......मी काय म्हणते निदान एक दिवस तरी द्यायचा होता तयारीसाठी........सकाळीच आलो तिकडून आणि लगेच निघतोय आपण."मानसी

आपल्याला कुठे जास्त काही काम करायचं आहे, म्हणून ठरवलं......तू म्हणत असशील तर कॅन्सल करू का??"सागर

नको नको........जाऊया."मानसी

दोघे रात्रभर आवरतचं असतात,कारण सकाळी चार ची गाडी होती.मानसी आणि सागर मनालीच सामान दुसऱ्या खोलीत ठेऊन सकाळी लवकरचं निघतात. गाडी सुटेपर्यंत मानसी थोड्या भाज्या घेते कारण गावी सगळ्याच भाज्या ताज्या ताज्या असतात म्हणून मग नेमक्याच गोष्टी म्हणजे मिरची कोथिंबीर, आलं, यासारख्या गोष्टी घेते. गाडी तिच्या वेळेत सुटते.


गाडीत बसल्यावर मानसीला गावची आणि गावच्या घराची खूप ओढ लागलेली असते.तीच गावी घर नसल्याने तिला आता खूप आनंद होत असतो. गाडीत बसल्या बसल्याचं मानसी सागरला त्याच्या गावच्या गमतीजमती विचारत असते. सागर सांगत असतो पण खूप थकलेली मानसी ऐकता ऐकताच झोपी जाते.सागर तिच्या खांद्यावरची ओढणी हातापर्यंत नीट सोडतो आणि दुसऱ्या हाताने तिच डोकं खांद्यावर घेऊन थोपटत असतो.


दुपारच्या वेळी दोघेही कोल्हापूरला पोचतात.खूप भूक लागल्याने दोघे तिकडेच एका हॉटेलमध्ये जेवायला बसतात.तांबडा पांढरा रस्सा,भाकरी,उकडीचा भात,सुक मटणं, अंड्याच कालवण असा मस्त मेनू असतो. दोघेपण एकच प्लेट शेअर करतात आणि रिक्षा करून निघून जातात.कोल्हापूरपासून अर्धा एक तासाचा रस्ता असल्याने दोघे जेवण करून जातात.आणि अचानक जाण्यामुळे उगाच आई ची धावपळ होऊ नये.


आईssssssssss ए आईsssssssss"सागर

अगगबाई.....काय हो.....हा आवाज आपल्या सागर सारखा आहे का ओ."सागर ची आई

नाही हो......झोपा तुम्ही, तुम्हाला भास होत असेल."सागर चे बाबा

ए आईsssssssss"सागर


ते बघा, आता परत आला आवाज......ऐकलात का???? "सागर ची आई


हो ओ........ चला चला बघूया!!!!!सागर चे बाबा

समोर सागर आणि मानसीला असं अचानक बघून आईबाबा खूप खुष होतात.

क्रमशः

कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद???