लग्न होऊन मी, सासरच्या उंबरठ्यावरचे माप ओलांडून घरात प्रवेश केला..
नव्या नवरीचे, नवलाईचे काही दिवस..
घरातील सासू-सासरे, छोटे दीर आणि आम्ही दोघे राजा-राणी असा हा माझा, माझ्या माणसांचा छोटासा परिवार..

माहेरी आई-वडील. वडील शिक्षक तर आई गृहिणी. आणि दोन लहान भाऊ..
ते दोघे ही शिक्षण घेत होते. एक कॉलेजला होता. आणि दुसरा शाळेत जात होता.
मला सासरी खूप प्रेम मिळाले. पतीचेही आणि सासू-सासरे यांचेही.
घरात मुलगी नसल्याने, 'मुलीची उणीव तुझ्या रूपाने भरून निघाली आहे.' असं ते दोघेही नेहमीच म्हणत होते.
लग्नानंतर काही दिवसांनी चुलत चुलत जावेच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमा ला जाण्याचा योग आला. त्यावेळी कळले की असे गरोदर स्त्रीचे सातव्या महिन्यात ओटी भरण करत असतात. याआधी म्हणजे लग्नापूर्वी या गोष्टीकडे कधी लक्ष दिले नाही. आणि खेड्यात वडिलांची नोकरी होती. तिथे असा अनुभव कधीच आला नाही.

बरं माझे घर जिथे होते (म्हणजे सासरचे) तेथील वातावरण ही तालुका प्लेस असूनही खेड्यासारखेच होते. मला तर नेहमी असेच वाटायचे की,'आपण स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात परत आलो आहोत की काय?'
पण काय करणार? '
'दिल्या घरी तू सुखी रहा.' या ओळीप्रमाणेच मी सगळं स्वीकारलं. घराच्या अवतीभवतीचे लोकही म्हणजे जेथे आमचे घर होते. शिक्षित असूनही विचाराने मागासलेली?? नाही, असेही नाही म्हणणार मी.
'जुन्या विचारसरणीची होती.' आणि मी जरा आधुनिक विचारांचा टच असलेली मुलगी होते.
पण लग्नानंतर अशाच वातावरणा मध्ये राहण्याचा, वावरण्याचा मला सराव करावा लागला. पण माझ्या घरातील माझे पती यांचे विचारही असे मिक्स स्वरूपाचेच होते. सासरे ही तसेच होते. पण सासूबाई यांचे विचार मात्र चांगले होते. म्हणजे आधुनिकतेचा टच असलेले होते.त्यामुळे माझे आणि त्यांचे ट्युनिंग छान जमले.
म्हणून मला कायम त्यांचा आधारच वाटला.
देव्हाऱ्यात, मंद समई तेवत असते ना? अगदी तश्याच त्या माझ्या साठी होत्या.
मला जिवापाड प्रेम करणारे पति मिळाले. आणि मी स्वतःला विसरून त्याच रंगात रंगून गेले. अगदी शाममय झाले. यांच्यासाठीच आपले हे आयुष्य आहे. अशी मी स्वतःची समजूत करून घेतली.
त्यामुळे काही गोष्टींचा त्रास अजिबात जाणवला नाही.

पुढे काहीच दिवसात मला मातृत्वाची चाहूल लागली. या बातमीने सर्व घरात एक चैतन्याची लहर आल्यासारखी झाली. सगळ्यांनाच खूप खूप आनंद झाला.
सासूबाईंनी मग माझी, तिसऱ्या महिन्यात चोर ओटी भरण्याचा इवलुसा कार्यक्रम ठेवला.
पौर्णिमेच्या रात्री अंगणात मस्त हा कार्यक्रम, फक्त चुलत सासूबाईंना बोलावूनच माझी फळांनी ओटी भरण्यात आली.

पुढे..
या दिवसांमध्ये प्रत्येकीलाच काहीतरी वेगळे खावेसे वाटते. तसेच मलाही वाटत होते.
पण मी काहीही न सांगता सासऱ्यांना ते कसे कळत होते? राम जाने.
ती वस्तू ते घेऊन यायचे. आणि माझी इच्छा पूर्ण व्हायची. काय ऋणानुबंध होते माहित नाही?
मला आठवा महिना चालू होता. सगळा आनंदी आनंद होता.
पण..
अचानकच माझा पाय कसा घसरला? काहीच कळले नाही.
संध्याकाळी पोटात दुखू लागले.काय होते आहे? काहीच कळेना?
मग रात्री दवाखान्यात नेले. नेहमीच्या डॉक्टर मॅडमनी सांगितले की, 'तुम्ही आणायला उशीर केला आहे. मी काही करू शकत नाही. तुम्हाला बीडला न्यावे लागेल.'
सगळे घरातले हवालदिल झाले. त्यावेळी गाड्यांच्या अशा सहज सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. पण मिस्टरांनी मित्रांच्या सहकार्याने आणि ओळखीने गावातीलच मोठ्या डॉक्टरांच्या दवाखान्यात हलवले. आणि तेथे रात्री अकरा वाजता माझी डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाली पण…
पण माझे बाळ नाही वाचु शकले!
यावर डॉक्टरांनी मिस्टरांना सांगितले.
'तुमचे नशीब चांगले आहे. म्हणून तुमच्या मिसेस वाचल्या. नाहीतर शक्यतो अशा केसेस मध्ये, हे होत नाही. त्यामुळे पुढे काळजी घ्या.'

झाल सगळ्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या.मलाही खुपच दु:ख झाले.
मला नंतर टीव्हीच्या जाहिरातीत छोटेसे बाळ बघितले तर मनात कालवा कालवा होत असे. आणि 'सहज ते बाळ हातात घ्यावे' अशी इच्छा निर्माण होत होती.
या घटनेनंतर दोन वर्षानी मी आई झाले. मला मुलगा झाला.(आज तो इंजिनियर झाला आहे)आणि घर आनंदाने आणि बाळाच्या इवल्याशा रडण्याने गजबजून गेले.
फक्त दोन किलो वजनाचा हा बाळ.. कसा घेऊ? न कसा नाही? असं प्रत्येकाला वाटत होते.
पण तरीही सासरे त्याला आनंदाने मांडीवर घेऊन बसत होते. त्याच्या येण्याने माझ्या मनाला आलेले रिते पण भरून निघाले. आणि एक परिपूर्णतेची जाणीव मला होऊ लागली. बाळ जेव्हा आईचे दूध प्राशन करते. त्यावेळचा तो अनुभव म्हणजे,
या या जाणवणाऱ्या सुखाची तुलना, कशाशीच होऊ शकत नाही. असे मला तरी वाटते.
म्हणूनच म्हटले आहे, 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे' याचा प्रत्यय आला.
काही दिवसांनी बाळाला संडासचा त्रास होऊ लागला. तर डॉक्टरांनी, 'त्याला आईचे दूध देऊ नका. असे सांगितले. आणि 'वरचे, म्हणजे गाईचे दूध पाजा.'
पण हे दूध बाळ पितच नव्हते कारण, 'हे दूध, तुझ्या या घटातले का अधिक गोड लागे न कळे.' याप्रमाणेच त्याला गाईच्या दुधाची चव लागत नव्हती. म्हणून ते उपाशी राहायचे. आणि रडायचे. पोट भरत नव्हते म्हणून. आणि त्याला रडताना पाहून, माझ्या मनाला असंख्य इंगळ्या डसल्यासारख्या वेदना होत होत्या.
पुढे परत काही दिवसांनी दुसरा मुलगा झाला. आणि यांचे संगोपन करण्यात, माझा वेळ कसा जात होता? माझे मलाच कळत नव्हते.

लग्नापूर्वी काही कविता मी लिहिल्या होत्या. जमल्याही होत्या छान. पण कुठेही प्रकाशित नाही केल्या.त्यानंतर 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' यांच्या जीवनावरील लेख लिहिला. आणि तो एका व्यक्तीमार्फत 'एकमत' या पेपरमध्ये छापूनही आला.
त्यानंतरही मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील लेख ही लिहिला. पण तो कुठेही छापून आला नाही.

मग लग्न झाले. पण तेथील वातावरण वेगळेच असल्याने, या आवडीवर मी झाकण ठेवले.
नंतर मोठा मुलगा बाहेर खेळत असताना, चार पाच वर्षाचा होता तेव्हा. खेळता खेळता टीव्हीवर लागलेले राष्ट्रगीत ऐकून तो घरात आला. आणि टीव्ही समोर सावधान पोझिशन मध्ये, सॅल्यूट करून उभे राहिला. आणि राष्ट्रगीत संपेपर्यंत तो तसाच उभा राहायचा. यामध्ये सैनिकांविषयी दाखवत होते.असंच त्याचं मी चार पाच वेळा पाहिले.
आणि मी त्याला सहज विचारलं तर तो म्हणाला, "मम्मी, मला हे आवडते. शाळेत आम्ही असेच सावधान मध्ये उभे राहतो. राष्ट्रगीत चालू असताना."
म्हणून यावर माझे विचार मंथन सुरू झाले. आणि सहजच एक दहा दहा बारा ओळी कागदावर लिहून काढल्या. सैनिका विषयी. त्यानंतर मीच वाचल्या. पण माझाच विश्वास बसला नाही.की हे मी लिहिलेलं आहे.
छान वाटलं वाचून!
तेव्हा आमच्याकडे लोकमत हा पेपर यायचा. त्यामध्ये 'सखी' म्हणून एक कॉर्नर यायचा. त्यासाठी मग हे लिहिलेले मी पाठवून दिले. तर ते काही दिवसानंतर पेपर मध्ये आले.
*सैनिक हो..*
तेव्हा वाचून माझे मलाच प्रौढ फील झाल्या सारखे वाटले.
त्यानंतरही अशाच काही गोष्टी, ज्या माझ्या मनाला स्पर्शून जात होत्या. त्यावरही मी थोडेफार लिहायचे. आणि लोकमतला पाठवून द्यायचे. आणि ते सखी मध्ये प्रकाशित व्हायला लागली. या माध्यमातून मग मला काही जण ओळखू लागली.
आजूबाजूच्या ज्या मैत्रिणी होत्या, त्यामध्ये एक मैत्रीण अशी होती की, ती मला म्हणायची, "शुभांगी, तू या वातावरणात मिक्स झाली नाही. तू वेगळीच आहेस." त्यावेळी मनाला एक समाधान मिळत असे.
परत असेच छोटे छोटे लेखच मी लिहिले.

आम्ही काही दिवसांपूर्वी म्हणजेच माजलगाव येथुन, गेवराई येथे राहायला आलो.तर मी जिथे राहायचे तेथील मॅडम ह्या टीचर आहेत. त्यांच्यासाठी शाळा म्हणजे जीव की प्राण आहे. मग असेच गप्पा मारता मारता त्यांच्या शाळेच्या विषयी खूप गप्पा व्हायच्या. आणि या गप्पा ऐकल्यानंतर माझ्या मनात कुठेतरी चमकून गेले की, मी यावर लिहू शकते. आणि मी प्रयत्नही केला.
आणि छान 'दप्तरा विना शाळा' हा लेख लिहिला. आणि तो दिव्य मराठीच्या मधुरिमा या पुरवणीसाठी पाठवला. त्यामध्ये तो प्रकाशितही झाला. त्यानंतरही एक लेख, म्हणजे माझ्या काही मैत्रिणी सहलीला गेल्या होत्या. त्या सहलीवरील लेख, तोही मधुरिमा मध्ये प्रकाशित झाला.
त्यानंतर मुलाने मला ब्लॉग बनवून दिला लिखाणासाठी. छोटे छोटे लेख लिहून मी त्यावर टाकू लागले. आणि ते फेसबुकला शेअरही करू लागले. पण त्याला व्ह्यूज येत नव्हते. असेच करता करता सहज मी कथा हा प्रकार हाताळायचे ठरवलं.
आणि 'चिऊ चिऊ ये' ही माझी पहिली कथा मी लिहिली. आणि ती फेसबुकला शेअरही केली. तर त्याचे व्ह्यूज वाढले.
म्हणून मग मी कथाच लिहायला सुरुवात केली.
मग मी कथेसाठीचे विषय आठवू लागले. विचार करू लागले. मग एक प्रसंग मला मांडायचा आहे. तर तो कसा मांडावा लागेल? यावर विचार मंथन करू लागले. आणि त्या कथेची पात्रं, माझ्या अवतीभोवती पिंगा घालू लागली. आणि मग लिहायला बसले की, हळूहळू ती कागदावर उतरू लागली. आठ ते नऊ महिन्यापासूनच मी कथा हा प्रकार लिहायला लागले आहे.
मग एका मैत्रिणीने मला सल्ला दिला की, तू ईरावर कथा पोस्ट करत जा. म्हणून मग मी इरावर पोस्ट करायला सुरुवात केली.काही कथा मी इरावर पोस्ट केल्या आहेत.
तर माझे हे 'आठवणींचे कोंदण' आहे.
कसे वाटले? नक्कीच कमेंट मध्ये सांगा.
आणि लाईक करा.कारण तुमचे लाईक हे लेखिकेला प्रेरणादायी असते.
सौ.शुभांगी सुहास जुजगर.