Login

आवळ्याचे विविध प्रकार

आवळ्याचे विविध प्रकार

सध्या बाजारात आवळे मुबलक मिळत आहेत. आवळा आरोग्याच्या दृष्टीने बहुगुणी समजला जातो. आवळ्यामध्ये विटामिन सी .मुबलक प्रमाणात असते. पित्ता पासून ते हाडांच्या मजबुती पर्यंत आवळा गुणकारी मानला जातो.

आवळा लोणचे

साहित्य

दहा ते बारा मोठ्या आकाराचे आवळे, तिखट, मीठ, मोहरी डाळ, हिंग, हळद, तेल, मोहरी.

कृती

आवळे स्वच्छ धुऊन पुसून कुकरमध्ये उकडून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या अलग अलग फोडी करून घ्या.बीया काढून टाका. त्या फोडींना मीठ लावून घ्या. कढईत तेल घेऊन ते कडकडीत तापवा. गॅस बंद करा.(कारण कडकडीत तेलात मोहरी डाळ व इतर साहित्य करपट होऊ शकते)  तेलात मोहरी डाळ, हिंग, तिखट, हळद ,घाला. हे मिश्रण आवळ्याच्या फोडींवर टाका. आवडीनुसार थोडा गुळ टाकू शकता. हे लोणचे थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा. अतिशय रुचकर लागते.


आवळ्याचा मोरावळा

साहित्य

दहा ते बारा मोठे आवळे, अर्धा किलो साखर.

कृती

आवळे स्वच्छ धुऊन पुसून घ्या. नंतर टूथ पिक ने टोचून कुकरमधून वाफवून घ्या. साखरेचा एकतारी पाक तयार करून त्यात ते उकडलेले आवळे टाका. पुन्हा एखादी उकळी येऊ द्या. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा. हा मोरावळा पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी अतिशय गुणकारी असतो.


आवळा सुपारी

साहित्य

दहा-बारा मोठे आवळे, काळे मीठ.

कृती

आवळे स्वच्छ धुऊन पुसून घ्या. स्टीलच्या किसणीने त्याचा किस तयार करा. त्या किसाला काळे मीठ लावा व उन्हात वाळवा. व बरणीत भरून ठेवा जेवणानंतर मुखशुद्धीसाठी याचा चांगला उपयोग होतो.



0