Login

'आवळ्याचे विविध प्रकार.'

आवळ्याचे विविध प्रकार

आवळा सरबत

साहित्य -

एक किलो मोठे आवळे

कृती -

प्रथम आवळे स्वच्छ धुऊन, पुसून घ्या. त्याचे चाकूने काप करा. बी काढून टाका. हे काप कडक उन्हात चांगले वाळवा. नंतर मिक्सर मधून त्याची पूड तयार करा. जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा साखर, मीठ, पाणी घालून सरबत करा. हे सरबत पित्तशामक व अतिशय पौष्टिक असते.


आवळा पाक

साहित्य -

आठ दहा  मोठे आवळे, एक वाटी साखर अर्धी वाटी आल्याचे तुकडे, काळे मीठ.

कृती

प्रथम आवळे स्वच्छ धुऊन, पुसून स्टीलच्या किसणीने किसून घ्या. आले सुद्धा किसून घ्या.हा कीस स्टीलच्या कढाईत घालून त्यात साखर व थोडे मीठ घालून मंद आचेवर शिजवा. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा. हा आवळे पाक पित्तशामक आहे. पोट साफ होण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे.


केशवर्धक आवळा तेल

साहित्य

आठ ते दहा मोठे आवळे,  खोबरेल तेल.

कृती

प्रथम आवळे किसून घ्या. बिया काढून टाका. हा आवळा किस   खोबरेल तेलात शिजवा. पूर्ण अर्क निघाल्यावर थंड करून, गाळून काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. हे आवळा तेल रोज केसांच्या  मुळाशी लावा.


सौ.रेखा देशमुख

0