Login

आवडली का मूलगी भाग १

तो मात्र काही लग्नासाठी तयार होत नव्हता. सगळ्यांनी त्याला खूप समजावून पहिले होते. पण त्याची नकारघंटा कायम कडक वाजायची.
मुंबईच्या नामांकित कॉलेजमधली ती मुल. चांगली पाच ते सहा मुली आणि मुलांची ती टीम होती. वेगवेगळी फॅकल्टी आणि वेगवेगळ्या वर्गात असणारी. तरी एकाच गोष्टीनी त्यांना एकत्र बांधून ठेवलं होत. ती म्हणजे संगीत. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला झालेल्या वार्षिक स्नेहसंम्मेलनापासून त्यांची मैत्री झाली होती. कोणी डान्स करायचे, तर कोणी गाण लिहित होत, तर कोणी ते संगीतबद्ध करत होत. ते संगीतबद्ध केलेलं गाण कोणी त्याच्या सुरेल गळ्याने गायचं. तर कोणी ड्रम, तबला तर कोणी पिआनो, तर कोणी गिटार असा संगीताने वेढलेला त्यांचा तो गट तयार झाला होता.

कॉलेजच्या वेळेचे ठरलेले त्यांचे तास झाले की नंतर ते एकत्रच दिसायचे. संगीतापुरती एकत्र आलेली ती, कधी एकमेकांच्या मैत्रीने एकमेकांशी घट्ट बांधली गेली हे त्यांनाच समजलं नव्हत. शेवटी संगीत अशी गोष्ट आहे की ती दगडालाही पाझर फोडू शकते.

पुढचे दोन वर्ष त्यांनी त्यांच्या कॉलेजचे स्नेहसंम्मेलन चांगलच गाजवलं होत. अधे मधे कॉलेजमध्ये बसवल्या गेलेल्या नाटकाला संगीत देणे, स्पर्धेत भाग घेणे असे वेगवेगळे उपक्रमही ते करत होते.

त्यांच्या त्या गटात हेमंत संगीत द्यायचा, निता, कार्तिकी, जान्हवी, तुषार, आकाश हे उत्तम डान्सर होते. निता डान्ससोबत नाटकही लिहित होती. तर सनी ड्रम, तबला वाजवत होता. तर त्यांचा गट प्रमुख राज हा सुरेल गळ्याने सुंदर सुंदर गाणी म्हणायचा. सोबतीला तो पिआनो, तर कधी गिटार, तर कधी बासरी ही वाजवायचा. या सर्वांमध्ये एक कला मात्र सामायिक होती ती म्हणजे अभिनयाची.

शेवटच्या वर्षाची परीक्षा संपल्यावर दिल्लीला एका संगीत नाटकाची स्पर्धा होती. परीक्षा तर संपणार होती, म्हणून त्यांनी त्यामध्ये भाग घेण्याचे ठरवले होते. फक्त परीक्षा संपल्यावर नाटक, त्याच संगीत, तालीम अशा सर्व गोष्टी जमून आल्या तरच ते जाणार होते. परीक्षा संपल्यानंतर त्यांच्याकडे फक्त दोन आठवडे होते. त्यामुळे त्यांनी निताने फक्त नमुना म्हणून लिहिलेलं नाटकच करायला घेतलं. एकतर ते लिहून पूर्ण होत. त्याच संगीत ही हेमंतने नितासोबत वेळ घालवता घालवता सहज करून ठेवलेलं होत. मग ते लवकर बसणार होत. लागलीच त्याची तालीम उरकून घेण्यात आली.

आठवडाभरातच नाटक बसून तयार झाल. मग त्यांनी तिकीट एका एजंटकडून तात्काळमध्ये काढून घेतली. उन्हाळयाचे दिवस असल्याने त्यांनी एसीचे तिकीट काढायला लावले होते. घरात मात्र ‘ऐनवेळेस हीच तिकीट मिळाली.’’ अस सगळ्यांनीच सांगितल होत.

आपल्या साहित्याची तपासणी, तयारी करणासाठी ते सगळेच राजच्या घरी जमा झाले. नेहमीप्रमाणे हेमंत आणि निता सोबत आले होते. दोघांची जोडी एकदम खुलून आणि एकमेकांना अनुरूप अशी दिसत होती. दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या नात्याला परवानगी दिलेली होती. ग्रुपमधल्या बाकी मुलींचीही लग्न जवळपास ठरल्यात जमा होती. मुल तर त्यांच्या घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे करणार होते. पण राज, तो मात्र काही लग्नासाठी तयार होत नव्हता. सगळ्यांनी त्याला खूप समजावून पहिले होते. पण त्याची नकारघंटा कायम कडक वाजायची.

आजही हेमंत आणि निताला सोबत आलेलं बघून, राजच्या आईने परत राजला लग्नावरून बडबड करायला सुरवात केली. तर राज हेमंतकडे रोखून बघायला लागला. कारण त्याने कालच दोघांनाही वेगवेगळे यायला सांगितल होत. पण ते नेहमीप्रमाणे त्यांचाच धुंदीत एकत्रच त्याच्या घरी अवतरले होते.

राजला बसणारी बोलणी ऐकून त्याचे बाकी मित्र त्याच्यावर हसायला लागले. मग राजला एक कल्पना सुचली आणि तो बोलू लागला.

“तू त्याच्याबद्दल बोलत आहेस?” राज आसुरी स्मित करत बोलला. “पण त्याला तिचा किती त्रास सहन करावा लागतो हे तूला माहिती आहे का? ते फक्त मीच ऐकलेलं आहे.”

आता हेमंत राजला रोखून बघायला लागला. तर निता हेमंतकडे रागात बघयला लागली. बाकी जण तर फक्त या नौकझोकचा आनंद घेत होते.

“ते तू नको शिकवूस मला. “राजची आई चिडून बोलली. नंतर त्या निताकडे वळल्या. “तू त्याच काही ऐकू नको गं. लग्न करायला नको म्हणून तो असा बोलत आहे. एवढी गोड मुलगी आहेस तू, तुझा बरं त्याला काही त्रास होईल?” त्यांनी एक नजर हेमंतवर टाकून त्याच्यावर डोळे वटारले. निताही हेमंतकडे बघत असल्याने तिला राजच्या आईने वटारलेले डोळे काही दिसले नाहीत.

तर तिकडे हेमंतने आलेल्या संधीच सोन केल आणि बोलला. “मग काय तर, ह्या राजला काहीच काम नाहीत.”

तेव्हा कुठे निताची कळी खुलली. तर राज डोळे फिरवत सरळ टेरेसवर निघून गेला. त्याचामागे बाकी ग्रुपही राजच्या आईसोबत राजवर हसत त्याच्यामागे गेली.

चहा नाश्ता झाल्यावर त्या सगळ्यांनीच त्यांच्या त्या साहित्याची तपासणी आणि तयारी करून घेतली. ते सगळच एका ठिकाणी बांधून ठेवलं. तोपर्यंत दुपार झाली होती. आत जेवायची वेळ झाल्याने बाकी मुली राजच्या आईला मदत करण्यासाठी पळाल्या.

काही वेळाने राज त्याच्या बाकी मित्रांसोबत खाली हॉलमध्ये आला. राज जसा किचनमध्ये गेला, तस किचनमधल्या महिलामंडळींनी त्यांच बोलण अचानक थांबवलं. ते बघून राजला त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याचा वास आला. पण आता काही विचारून अर्थही नव्हता. कारण त्याने सरळ विचारूनही त्याला त्याच उत्तर काही मिळणार नव्हत. मग त्याने परत त्याचे डोळे फिरवले आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन हॉलमध्ये गेला.

दुपारची जेवण आटपून बाकी सगळेच ज्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले. मधले हे दोन दिवस त्यांच्या तयारीमध्ये कसे भुरकन उडून गेले? कोणालाही समजल नाही. त्यांचा दिल्लीला जायचा दिवस उजाडला. आज दुपारची गाडी होती, ती देखील मुंबई आणि दिल्लीला इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळात जोडणारी राजधानी एक्सप्रेस.

दुपारची जेवण आटोपली की ते सगळेच थेट रेल्वे स्टेशनवर भेटणार होते. राज आणि हेमंत स्टेशनकडे जाणाऱ्या एकाच रस्त्याला राहत होते. मग ते दोघ सोबत जाणार होते. राजने त्याच सगळचं आवरलं आणि त्या दिवशी बांधून ठेवलेलं त्यांच सामान बाहेर आणून ठेवलं. त्याचे वडील त्याला सोडायला स्टेशनला येत होते. म्हणून त्यांनी त्यांची गाडी काढली. राजने ते सगळच सामान गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं आणि ठरलेल्या वेळेत दोघे बाप लेक घरातून निघाले. राज घरातून निघताना त्याच्या आईचा आशीर्वाद घ्यायला विसरला नाही.

हेमंतच्या घराजवळ येऊन त्यांना जवळपास पंधरा ते वीस मिनिट झाली. पण त्याचा काही यायचा पत्ता नव्हता. मग त्याने लगेच हेमंतला फोन लावायला सुरवात केली.

“अरे कुठे आहेस तू?” राज जरा चिडून बोलला.

“हो रे बाबा.” हेमंत “आलोच, हा काय पोहोचलोच.” हेमंत घाईघाईत बोलला.

अजून पाच मिनिट गेली. तसा राजने थेट हेमंतच्या आईलाच फोन लावला. तेव्हा त्यांना समजल की तो अजून जेवणच करत होता. खाणाऱ्या हेमंतने तोंड वाकड करत आपल्या आईकडे पहिले आणि राहिलेली चपाती तोंडात कोंबून तसाच निघायला लागला. तशी त्याच्या आईने त्याच्याकडे बघून बडबड करायला सुरवात केली. दारातून बाहेर गेलेला हेमंत परत घरत आला आणि आईच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेतला. आता मात्र तो पळतच निघाला. त्याची अशी घाईगडबड बघून त्यांना खूप हसायला आल होत.

“आधीच उशीर झालाय. गाडी जर चुकली ना तर बाकीच्यांना तुझचं नाव सांगेल मी.” हेमंतला पळत येताना बघून राज चिडून बोलला.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all