मागील भागात.
आत्तापर्यंत एक सुजाण नागरीक म्हणून वागणारी भावना आता लहान मुलीसारखी उड्या मारायला लागली.
“वॉव. माय फेवरेट.” भावनाने आनंदाने ती डेरीमिल्क घेतली आणि ती फोडून खायलाही सुरवात केली. त्याचा एक तुकडा त्या काका काकूंना भरवायला विसरली नाही.
पण तिला उड्या मारताना पाहून राज हरवलेल्या विचारातून बाहेर आला आणि तिला बघून त्याला आता हसायला आल होत. कारण ती आता त्याला खूपच गोड दिसत होती.
“आत तुला हसायला काय झाल?” भावनाने तिच तोंड वाकड करत विचारलं.

आता पूढे.
“आत्ता थोड्यावेळापुर्वी तुला मी मॅच्युअर्ड समजत होतो. पण आता तर तू अगदीच लहान मुलगी झालीस.” राज त्याच हसण थांबवत बोलला.
“जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए.” भावनाने मुव्ही मधला डायलॉग मारला. “हे छोटे छोटे क्षण आपल्याला भरपुर आनंद देत असतात.” या वाक्यावर आपले राज महाराज तिच्यात परत हरवले.
त्याचा हा सगळा प्रकार त्याचा ग्रुप कधीचा बघत राहीला होता. बराच वेळ झाला तरी राज आला नाही, त्यात गाडीही स्टेशनवरून सुटली होती. म्हणून हेमंत त्याला बघायला आला होता. तर त्याला राजच हे दुसर रुप बघायला भेटलं. राजला पहिल्यांदाच एखाद्या मुलीत एवढं हरवलेल बघून त्यालाही जरा धक्काच बसला. त्याने स्वतःला चिमटा काढला आणि समोरच दृश्य खरोखर चालू असल्याची खात्री करत त्याने त्यांचा सगळाच ग्रुप तिथे बोलावून आणला. त्यात हेमंतलाही राजने त्याच्यासोबत केलेल्या पराक्रमाचा बदला जो घ्यायचा होता.
राजने त्याच्या ग्रुपकडे पाहिलं. त्यांना त्याच्याकडे अस डोळे फाडून बघताना बघून त्याने सुस्कारा सोडला आणि तसाच तो त्याच्या ग्रुपकडे गेला. मग ते सगळेच तेव्हा काहीच न बोलता त्यांच्या त्याच्या सीटवर जाऊन बसले. तिथे गेल्यावर मात्र त्यांनी सुरवात केली.
“आँखो मै तेरी अजबसी अजबसी अदाये है.” हेमंतने बिघडलेला सूर लावला.
“तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिल का ले गये चैन.
मेरे दिल का ले गये चैन,
तेरे मस्त मस्त दो नैन.” कार्तिकी, जानव्ही आणि नितानेही सूर लावले.
राजला समजून गेल की आता ह्या सगळ्यांचा टार्गेट आता तोच रहाणार म्हणून. मग तो त्यांना काहीच बोलायच्या भानगडीत पडला नाही.
“आवडली ना?” तुषारने राजला धक्का मारला.
“म्हणुन तर असा बघत होता तिच्याकडे.” आकाशनेही दुसऱ्या बाजूने त्याला धक्का मारला.
“बास हं.” राज जरा चिडूनच बोलला. “असं काही नाहिये. तिची मदतीची वृत्ती मला आवडली. त्यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काही नाहीये.”
मग काय बाकी सगळ्यांचा लगेच मूड ऑफ झाला. मग सगळेच शांत बसले. गाडीचा प्रवास सुरु होऊन बराच वेळ झाला होता. म्हणूनच पुढच्या स्टेशनवर गाडी थांबताच सगळ्यांनी चहाचा आस्वाद घेतला. चहा झाल्यावर सगळ्यांनाच तरतरी आली. परत त्यांच्या गप्पांना उधाण आल. बोलता बोलता सहजच हेमंतने गिटारच्या तारा छेडल्या. जश्या तारा छेडल्या गेल्या तसा राजही गुणगुणायला लागला. नंतर एकामागे एक गाण्यांची सुरवातच झाली होती.
त्यांचा आवाज ऐकून बाजूच्या कंपार्टमेंट मधली मुलही तिथे आली. त्यांनी राजच्या ग्रुपला बरोबर ओळखल. त्या मुलांनी राज आणि त्याच्या ग्रुपची गाणी आणि संगीत त्यांच्या युट्युबच्या चॅनलला पाहिली होती. मग तेही तिथेच गोळा झाले. मग काय एक एक फर्माईश बाहेर पडत राहिल्या आणि गाडीतल्या त्या मावळत चाललेल्या संध्याकाळला मैफिलीचा साज चढला. हेमंतने बाकीचे बांधलेल्या साहित्यापैकी छोटा ड्रमही बाहेर काढला. जो सनीने वाजवायला घेतला.
थोड्यावेळाने राजने त्या सगळ्यां मुलांवरून नजर फिरवली तर त्याला भावना त्यांच्यात दिसली होती. तसे त्याचे डोळेच चमकले. तर दुसरीकडे निता, कार्तिकी, जान्हवी त्या तिघींमध्ये त्यांचे इशारे सुरु झाले. जे राजला काहीच समजले नाही.
राजला त्या ग्रुपमधल्या मुलांसोबत बोलता बोलता ते मनालीला चालले असल्याचे समजले. अर्थात त्या विषयाला सुरवात राजनेच केली होती. राजला तिच्यात हरवलेलं बघून निताने लगेचच रोमॅन्टिक गाण्याची सुरवात केली. इतका वेळ राज भावनालाच बघत होता. पण आता भावनाचीही नजर त्याच्यावर पडली. तस तिने त्याच्याकडे बघून मंद स्मित केल. मग नितानंतर त्याचाही गोड गळा सुरु झाला. गाणी गाता गाता दर पाच ते सहा सेकांदानी भावनावर नजर टाकल्याशिवाय त्याला राहावलंच जात नव्हत.

त्याचा आवाज तिच्या ह्रदयापर्यंत सहज पोहोचलेला त्याला दिसायला लागला. कारण तिच्या गालावर एक प्रकारची लाली चढलेली त्याला दिसली. नंतर लगेच मात्र राजला ती कोणत्यातरी विचारात हरवलेली दिसली. पण तिला बघून राजला आज बरेच प्रेमगीत आठवायला लागले होते.
बाकी सगळ्यांनीही राजला चांगलीच साथ दिली. एवढे सगळे सोबत असतानाही त्याला मात्र तो आणि ती एवढेच दिसत होते. आयुष्यात पहिल्यांदाच कोण्या मुलीने त्याला इतक प्रभावीत केल होत. दिसायला सुंदर होतीच पण मनानेही त्याला ती श्रीमंत जाणवली होती. ती देखील हलक्या आवाजात चालू असलेली गाणी गुणगुणत होती. इतक्या मुलांच्या आणि गाडीच्या आवाजातही तो आवाजही राजला सहज आला होता. गाण थांबवून त्याने थेट भावनाकडे पाहिलं. त्याच्या अशा वागण्याने सगळेच गोंधळून त्याच्याकडे बघायला लागले.
“तुझा आवाजही गोड आहे.” राजच्या या वाक्याने भावनाच तोंडच उघड पडलं.
“हो, तिचा आवाज पण छान आहे.” भावनाची मैत्रीण बोलली.
“कलाकाराला कलाकाराची बरोबर ओळख होते.” हेमंतचा टोमणा त्याच्या ग्रुपला बरोबर कळला. मग काय भावनाच्या मित्र - मैत्रीणींनी देखील भावनाला गाण्यासाठी चिअरअप केल. सगळ्यांनीच आग्रह केल्यामुळे ती देखील राजला गाण्यासाठी जॉईन झाली. परत जो मैफिलीला प्रेमाचा रंग चढला तो रात्रीची भुक लागल्यावरच थांबला होता.
सगळ्यांनीच ज्यांच्या त्यांच्या जागेवर बसून जेवण केली. आता बराच उशीर झाल्याने सगळेच पेंगायला लागले. इकडे राजच्या ग्रुपमध्ये जणु उत्साहाच्या लाटाच वाहत होत्या. राजला कोणीतरी आवडली आहे हेच त्यांच्यासाठी खुप होत. एवढे दिवस कोणाच्या बोलण्याने, समजावण्याने, रागाने, ओरडण्याने, धाकाने, शपथेने शक्य झाल नाही. ते आज तिच्या फक्त दिसण्याने शक्य झाल होत. पण कोण कुठली ती काहीच माहित नसल्याने राज मात्र त्यावर बोलण टाळत राहीला.
एक मात्र खरं की ती त्याला आवडायला लागली होती. ती दिसायला सुंदर होती म्हणून नाही तर तिची दुसर्यासाठीची मदतीची धडपड आणि तिचा गाणारा गोड तो गळा, त्याचा मनाचा ठाव घेऊन गेले होते. पुढच्या गोष्टी नशिबावर सोडून तो आजची रात्र झोपून गेला.
दुसर्या दिवशी सकाळीच भावना राजला शोधत आली. राज तर फ्रेश होण्यासाठी गेला होता. बाकी हेमंत, सनी, तुषार, आकाश या चौघांनाही तर संधीच भेटली होती भावनाकडुन तिच मन जाणुन घेण्यासाठी. पण भावनाने तिच्या मनाचा त्यांना काही थांगपत्ताच लागू दिला नव्हता. पण तिची आणि निता, कार्तिकी, जान्हवी या तिघींची चाललेली नजरेची भाषा या चौघांनाही कोड्यात टाकत होती. काहीतरी त्यांच्यात चालू असलेल चौघांनाही समजून गेल होत. तोवर राज ही येऊन पोहोचला होता. मग तो विषय कोणी काढला नाही. तिला तिच्या घरी फोन करायला मोबाईल पाहिजे होता. तिचा स्विचऑफ झाला होता आणि तिचे बाकी सोबती अजूनही चादरीआड होते. मग राजने तिला त्याचा मोबाईल दिला. भावनाने मोबाईलवर थोडफार बोलून तो परत राजला आणुन दिला.
तसा तिने या बाकी चौघांकडेही मागीतला असता पण त्यांनी ती आल्या आल्या तिचीच फिरकी घ्यायला सुरवात केली होती आणि त्या तिघींकडे तिने काही त्यांचा मोबाईल मागितला नाही. म्हणून मग तिने राजचीच वाट बघीतली.
भावनाच वागण बघून त्या चौघांनाही भावना आणि त्यांच्या ग्रुपमधल्या त्या तिघी यांच्यावर जरा शंका यायला लागली. ‘कूछ तो गडबड हय दया.’ हे मनातल्या मनात ह्या चौघांनी एकमेकांकडे बघून म्हटले. पण पुरावा नसल्याने बोलता कोणालाच आल नाही.

क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा