मागील भागात.
अजून पाच मिनिट गेली. तसा राजने थेट हेमंतच्या आईलाच फोन लावला. तेह्वा त्यांना समजल की तो अजून जेवणच करत होता. खाणाऱ्या हेमंतने तोंड वाकड करत आपल्या आईकडे पहिले आणि राहिलेली चपाती तोंडात कोंबून तसाच निघायला लागला. तशी त्याच्या आईने त्याच्याकडे बघून बडबड करायला सुरवात केली. दारातून बाहेर गेलेला हेमंत परत घरत आला आणि आईच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेतला. तो परत पळतच निघाला. त्याची अशी घाईगडबड बघून त्यांना खूप हसायला आल होत.
“आधीच उशीर झालाय. गाडी जर चुकली ना तर बाकीच्यांना तुझचं नाव सांगेल मी.” हेमंतला पळत येताना बघून राज चिडून बोलला.
आता पूढे.
तब्बल अर्धा तास उशीर केला होता त्याने. राज त्याची वाट पाहून खूपच वैतागला होता. सगळे स्टेशनला पोहोचले होते. पण हे अजूनही हेमंतच्या घराजवळच उभे होते. त्यांच्या घरापासून स्टेशनला जायला किमान एक तास तरी लागणार होता आणि हेमंतमुळे दोघांना चांगलाच उशीर झाला होता. राजच्या वडिलांनी दोघांना त्यांच्या वादातून बाहेर आणत पटकन गाडीत बसायला सांगितले.
दोघही लगबगीने राजच्या गाडीत बसले आणि स्टेशनच्या दिशेने निघाले. आता राजचा फोन वाजायला सुरवात झाली. त्याने तो सुस्कारा सोडतच फोन उचलला.
“साहेब, गाडी आपल्या पिताश्रींची आहे का?” एक सौम्य पण तितकाच कडक आवाज राजला आला.
“अगं, निघालोच आहे.” राज उगाच हसत बोलला.
“एवढा उशीर करतात का?” निता ओरडली. “बिचाऱ्या हेमंतला किती वाट पहायला लावलीस तू?”
“व्हॉट?” राज हेमंतकडे बघून चमकलाच. “कोणी वाट पाहिली? हेमंतने? आँ?”

“हा मग?” निता हेमंतच्या काळजीपोटी राजला बोलू लागली. “बिचारा वाट पाहुन किती दमला होता. बोलला मला तो.”
“हो का?” राजने हेमंतला जोरात चिमटा काढला.
आज सकाळी हेमंतला उठायलाच साडेबारा वाजले होते. निताने केलेल्या फोनमुळेच तर त्याला जाग आली होती. त्याची आई त्याला आवाज देऊन कंटाळली होती. मग जेवण झाल की त्याला उठुवू असा विचार करून ती किचनमध्ये निघून गेली होती. नंतर थोड्याचवेळात निताने फोन केला होता. त्यावेळेस त्याने तो तयार असल्याच सांगुन राजच आला नाही अस तिला खोट बोलला होता. शेवटी गर्लफ्रेंडचा धाकच इतका असतो नाही का?
राजने हेमंतला चिमटा तर काढला होता. पण हेमंत आवाज काढेल तर शप्पथ. तो ओरडला असता तर राजने तिला सगळ काही रंगवून सांगीतल असत याची खात्रीच होती हेमंतला.
“आम्ही माझ्या बाबांसोबत आहोत.” राजने हेमंतला एक स्माईल दिली. त्यावर हेमंतने एक आवंढा गिळला होता. “आता समजलचं असेल की कोण कोणाची वाट बघत होत ते?”
राजचे वडील वक्तशीर होते. त्यांच्यासोबत असताना राज कधीच उशीर करू शकत नव्हता. हे त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच माहिती होत. राजने बोलुन फोन ठेवुन दिला. आता तो हेमंतकडे रोखून बघायला लागला.

“तुला गर्लफ्रेंड नाही ना. म्हणून तुला आमची व्यथा समजत नाही.” हेमंत गाल फुगवुन हळूच बोलला.
“आणि मला ती जाणुनही घ्यायची नाहीये.” राजने नेहमीचा त्याचा डायलॉग मारला. “तुम्ही कामच असे करता ना. म्हणून शिव्या खाता.” राज एवढ बोलून हसायला लागला.
गप्पा मारता मारता हेमंत आणि राज स्टेशनला पोहोचले. हेमंत उतरताच त्याला समोरच निता दिसली. जी त्याला रागात बघत होती. पण आता राजचे वडील सोबत असल्याने सध्या तर ती त्याला काहीच बोलली नाही.
राजचे वडील सर्वांना भेटले. त्यांना शुभेच्छाही दिल्या आणि राजने त्यांना लगेच घरी पाठवूनही दिले. कारण एकदा ऑफिस सुटायची वेळ झाली की रस्त्याला गाड्यांची खूपच गर्दी व्हायची. त्यात ते सापडू नये, म्हणून राजने त्यांना जायला लावलं होत. ते गेल्यानंतर हेमंतची भर स्टेशनवर जी आरती सुरू झाली, बास रे बास. सगळा ग्रुप त्याच्यावर हसत होता. मग ते सगळे ज्या प्लॅटफॉर्मवर गाडी येणार होती तिथे जाऊन पोहोचले. पुढच्या पाच मिनीटात गाडीपण त्या प्लॅटफॉर्मवर येऊन पोहोचली.
गाडी येताच सगळे त्यांच्या रिझर्व्हेशन असलेल्या सीटवर जाऊन बसले. सुदैवाने सगळ्या ग्रुपला एकाच कंपार्टमेंटमधे रिझर्वेशन मिळालं होत. थोड्याचवेळात गाडी सुरू झाली. सगळे जण ज्याच्या त्याच्या सीटवर विसावले. हेमंतही निताला मनवण्यात यशस्वी झाला होता. दुपारी जेवण तर सगळ्यांनीच केल होत. पण प्रवासाला सोबत हलक फुलक खायला कोणीच काही घेतलं नव्हत. तो विचार करेपर्यंत गाडी पुढच्या स्टेशनला पोहोचली. गाडी थांबलीच होती की राज उठून स्टेशनवरच्या एका दुकानात गेला आणि बिस्कीट, चॉकलेट, वेफर्स अस काही घेतलं. तो ते घेऊन त्याच्या सिटकडे येतच होता की समोर त्याला भांडण चालु असलेली दिसली. त्यात एक मुलगी तावातावाने सीटवर बसलेल्या माणसांना भांडत होती.
ते बघून राज तिथे जाऊन पोहोचला.
“तुमच रिझर्व्हेशन आहे तर दाखवा ना टिकीट.” ती मुलगी चिडून बोलली.
“तुम्ही कोण? आणि तुम्हाला का दाखवु?” समोरचा माणूसही तोऱ्यातच बोलला.
“मग आम्ही कस समजू की ही तुमचीच सीट आहे म्हणून?” ती मुलगी त्यांच्याकडे रोखून बघत हाताची घडी घालून विचारू लागली. “या काकांनी त्यांच टिकीट दाखवलं आहे. त्यात ही सीट त्या दोघांची दिसत आहे. त्यामुळे तुम्ही आता गपगुमान उठा.”
“नाही उठणार. काय करायचं आहे ते करा.” तो माणूस अरेरावीच्या भाषेत बोलला.
राज ते सगळचं पाहिलं आणि त्याने त्या सीटजवळ असलेली आपातकालीन चैनच खेचली.
“अरे! काय केल हे?” तो माणूस अजूनच रागाला येत बोलला. “विनाकारण चैन खेचण गुन्हा आहे. माहित नाही का तुला?”
“मी थोडीच ओढली. ती तर तुम्हीच ओढली ना.” राज त्याचे खांदे उडवत आसुरी स्मित करत बोलला.
“खोट बोलायला लाज नाही वाटतं?” तो माणूस रागातच बोलला. “तू लाख बोलशील रे. पण बाकी लोकांनी तर तुलाच ओढताना पाहिलं ना, ते बोलतीलच की.”
एवढं सगळ चाललेलं बघून त्या मुलीच्या डोक्यातही प्रकाश पडला आणि ती पुढे बोलू लागली.
“हो मी पण बघीतल.” त्या मुलीला असं बोलताना पाहुन त्या माणसाला आनंद झाला, जो जास्त काळ टिकला नाही. कारण नंतर ती मुलगी त्या माणसाकडे वळाली आणि बोलली.
“तुम्हीच ती चैन ओढली.” मुलगी

तसे ती सीटवर बसलेली सगळीच माणस जरा चपापलीच. तोवर रेल्वेचे पोलीस अधिकारीही येऊन पोहोचले. राज आणि त्या मुलीसोबतच बाकीच्या प्रवाशींनीही त्या माणसाच्या विरोधातच स्टेटमेंट दिले. कारण त्यांच्या वागण्याला आजुबाजुचे सर्वच प्रवासी वैतागले होते. मग काय? त्या दोन्ही माणसांची रवानगी पोलीसांसोबतच झाली.
“थँक्स” त्या मुलीने राज समोर तिचा हात केला. “मी भावना.”
“अरे थॅंक्स काय, अशा माणसांना असाच धडा शिकवावा लागतो.” राजने तिच्या डोळ्यात पाहिले आणि तो तिला बघतच राहीला. आज आयुष्यात पहिल्यांदाच तो कोण्या मुलीच्या डोळ्यात हरवला होता.
“पण तरीही.” भावना मंद स्मित करत बोलली. “थँक्स.”
तिच्या मंजुळ आवाजाने राज लागलीच भानावर आला. “बरं, आता निट बसवा तुमच्या काकांना सीटवर.”
“अरे! ते माझे काका नाहीत. ती माणस त्यांना उगाच त्रास देत होती म्हणून मग मला तसं बोलाव लागल.” भावना हलकेच हसून बोलली.
तिचं ते हसण बघून, राजच्या हृदयाने सुरु झालेल्या गाडीचा वेग धारण करायला सुरवात केली.
“तसं तर तसं. पण खुप खुप धन्यवाद पोरी.” त्या काकू मध्येच बोलायला लागल्या. “बराच लांबचा प्रवास उभ्याने नसता झाला या वयात.”
तिची मदतीसाठीची धडपड बघुन राज काही त्याच्या नवीन उमलणाऱ्या भावनांमधून बाहेर यायलाच मागत नव्हता.
“आता म्हटलं आहेसच काका, तर माझ्याकडुन तुला हे एक चॉकलेट.” काकांनी एक डेरीमिल्क तिच्यापुढे धरली.
आत्तापर्यंत एक सुजाण नागरीक म्हणून वागणारी भावना आता लहान मुलीसारखी उड्या मारायला लागली.
“वॉव. माय फेवरेट.” भावनाने आनंदाने ती डेरीमिल्क घेतली आणि ती फोडून खायलाही सुरवात केली. त्याचा एक तुकडा त्या काका काकूंना भरवायला विसरली नाही.
पण तिला उड्या मारताना पाहून राज हरवलेल्या विचारातून बाहेर आला आणि तिला बघून त्याला आता हसायला आल होत. कारण ती आता त्याला खूपच गोड दिसत होती.
“आत तुला हसायला काय झाल?” भावनाने तिच तोंड वाकड करत विचारलं.

क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा