शीर्षक: आवाज भाग-२
"बाळा, तू इथेच बस. मी लगेच आले." काव्याने रिसेप्शन जवळ बाकावर आपल्या मुलीला बसायला सांगितले आणि त्याच्यानंतर ती परतच नाव सांगून तिथे जायला निघाली.
तिथे गेल्यावर तिने त्या खोलीच्या दरवाजा उघडला आणि बघते तर कितीतरी मशीन तिच्या नवऱ्याला लावलेल्या होत्या. कैवल्यचा अपघात झालेला होता आणि तीच बातमी दिला फोनवर सांगण्यात आली होती.
थोड्याच वेळापूर्वी आपल्याशी बोलणारा नवरा आता समोर जीवन आणि मरणाच्या स्थितीत असलेला पाहून तिला अश्रू अनावर होऊन ते गालावर कोसळले.
तिने लगेच डॉक्टरांकडे जायचा विचार केला आणि तेव्हाच तिला आपल्या मुलीची आठवण झाली. ती कुठे हरवायला नको म्हणून, ती जिथे आहे तिथे गेली; तर जसे सांगितले त्याप्रमाणे ईशा त्या बाकावर शांतपणे बसून होती.
" मी लगेच दहा मिनिटांमध्ये येते, तोपर्यंत इथून कुठे जाऊ नको हा. " ती म्हणाली.
काहीतरी महत्त्वाचं काम असेल, म्हणूनच आपल्याला आई बोलत आहे, असा विचार येऊन ती सुद्धा शांत बसली होती.
थोड्याच वेळात काव्याने डॉक्टरांना जाऊन आपल्या नवऱ्याच्या परिस्थितीबद्दल विचारायला सुरुवात केली.
" हे बघा त्यांचे शुद्धीवर येणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच आम्ही पुढे काही सांगू शकतो." डॉक्टरांनी सांगितले.
हताश मनाने काव्या डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आली आणि तिचे पाय आपली मुलगी जिथे बसली होती, तिथे आपोआप वळले.
रिसेप्शनिस्टकडे येऊन तिथे कुठे कॅन्टीन आहे का, हे विचारून ती आपल्या मुलीला तिकडे घेऊन गेली.
सकाळी फक्त नाष्टा केला होता आणि दुपारी आपल्या नवऱ्याची येण्याची वाट बघत असल्यामुळे दोघींनी जेवण केलेच नव्हते आणि आपल्या मुलीला आता भूक लागली असेल असा विचार करून, काव्याने ईशाला कॅन्टीन मधलेच जेवण खाण्यास सांगितले.
" मम्मा, तू का खात नाहीये ?" तिने एक घास आपल्या चिमुकल्या हाताने पुढे करत तिला विचारले.
" नको, तू जेवण कर हा नीट. मी नंतर जेवण करेन." ती म्हणाली.
आपल्या नवऱ्याला अशा अवस्थेत बघून तिच्या घशा खालून अन्नाचा एक कण उतरणार नव्हता. त्यामुळे तिने आपल्या मुलीला खोटेच सांगितले.
दोघांचेही आई-वडील युरोप टूरला गेले होते. त्यांना तिने अजून काही सांगितले नव्हते. तो शुद्धीवर येण्याची वाट बघत होती.
तिने अजून पर्यंत ईशाला काही कैवल्यकडे नेले नव्हते. प्रत्येक वेळी असे बाहेर एकटे बसवणे बरोबर नाही, म्हणून तिला आता त्याच्याजवळ न्यावे लागले होते. आतमध्ये आपल्या पप्पांना हॉस्पिटलच्या बेडवर बघून आणि हाताला लावलेली सलाईन बघून छोट्या मुलीला ते दुखत असेल असे वाटून ती, तिच्या पप्पांच्या जवळ गेली.
तिने हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु बेशुद्ध असलेला कैवल्याने काहीच प्रतिसाद दिला नव्हता.
" पप्पा का उठत नाहीत ? त्यांना सांग ना काय झालं आहे?" ती काव्याकडे बघून भरलेल्या डोळ्यांनी विचारत होती.
" पप्पांना काही नाही झालं. त्यांना थोडंसं लागलं आहे. इंजेक्शन दिले त्यामुळे झोपले आहेत." कसंतरी तिने आपल्या लहान मुलीला समजावलं.
एक दिवस असाच निघून गेला. त्यानंतर कैवल्य शुद्धीवर शुद्धीवर आला होता. तो झटकन ठीक झाला हे आश्चर्य होते.
त्याचा कसा अपघात झाला, हे काही कळायला मार्गच नव्हता आणि तेवढ्या वेळची त्याची स्मृति सुद्धा गेलेली होती. तो कसा हॉस्पिटलमध्ये आला हा प्रश्न त्याने विचारायला सुरुवात केली होती.
डॉक्टरांनी सुद्धा त्याला जास्त काही न विचारण्याबाबत सल्ला दिलेला होता.
घरी आल्यावर त्याला मध्यस्थीचा फोन आलेला होता आणि त्यामुळे त्यांना सुद्धा लवकरच तो तिथे शिफ्ट होईल असे सांगितले होते.
सर्व सामानाची पॅकिंग झालेली होती आणि लवकरच कैवल्य रिकव्हर झाल्यामुळे, त्यांनी त्यांच्या नवीन घरामध्ये पूजा करण्याचा विचार केला होता.
तिथे त्यांना जवळपास तिकडचा पूजेसाठी सुद्धा पुजारी भेटत नसल्यामुळे, त्यांनी आता जिथे राहत होते तिथलाच ओळखीचा पुजारी स्वतः सोबतच घेऊन येण्याचा विचार केलेला होता.
जसे तिथे त्यांनी पाय ठेवला. तसे त्या पुजाऱ्यांना काही वेगळेच वाटायला लागले होते, परंतु आपण आता पूजा करण्याचे सांगितले आहे, त्यामुळे त्यांनी लगेच पटापट सर्व पूजेची मांडणी करण्यास सुरुवात केली होती.
ईशा तर नवीन घरामध्ये सगळीकडे पळत फिरत होती.
तिच्यासाठी नवीन घर म्हणजे एक नवीन आणि कुतूहालाची गोष्ट होती.
तिच्यासाठी नवीन घर म्हणजे एक नवीन आणि कुतूहालाची गोष्ट होती.
पूजेसाठी दिवे लावण्यात आले, परंतु अचानक एवढा जोरात वारा बाहेरून आला की ते सगळेच्या सगळे दिवे विझले गेले.
आता मात्र त्या पुजाऱ्यांना इथे आल्यापासून नकारात्मकता जाणवत होती, ती अजूनच जाणवायला लागली.
" कैवल्य तुम्ही व्यवस्थित चौकशी केली आहे ना? " न राहून पुजाऱ्याने विचारले.
"हो, मी नीट चौकशी केली आहे." तो म्हणाला.
क्रमशः
पुजाऱ्याने असे का विचारलं ?
©विद्या कुंभार.
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा