शीर्षक: आवाज भाग-३(अंतिम)
पूजा पटकन आवरली आणि आजूबाजूच्या लोकांना आमंत्रण देण्यासाठी कैवल्य प्रत्येकाच्या घरी गेला.
सगळेजण व्यवस्थित बोलायचे, परंतु कोणते घर हे विचारल्यावर जेव्हा त्यांच्या कानावर पडायचे, तेव्हा त्यांचे बदललेले चेहऱ्यावरचे भाव कैवल्यने टिपले होते.
सगळेजण व्यवस्थित बोलायचे, परंतु कोणते घर हे विचारल्यावर जेव्हा त्यांच्या कानावर पडायचे, तेव्हा त्यांचे बदललेले चेहऱ्यावरचे भाव कैवल्यने टिपले होते.
" इथली जवळची लोकं येतील ना?" घरी आलेल्या आपल्या नवऱ्याला बघून काव्या विचारत होती.
" मला इथली लोकं थोडी विचित्रच वाटतात. आधी व्यवस्थित बोलत होते आणि जसं मी आपल्या घरी यायला सांगितले, तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले आणि काहीतरी कारण सांगून लगेच दरवाजा सुद्धा बंद केला."
" त्यांना काहीतरी काम असेल." असे काव्या म्हणाली.
दुपार होऊन गेली होती आणि थोडा वेळ आराम करून पुन्हा जे राहिलेले जेवण आहे, तेच रात्री खायचं असा दोघांनी विचार केला होता.
तिघे सुद्धा थकल्याने झोपले होते आणि जसे जसे अंधार पडायला लागला, तस तसा अकस्मात जोरजोरामध्ये वारा वाहायला लागला.
खिडक्या बंद करूनही बंद होत नव्हत्या, तसेच संध्याकाळी निरंजन लावले होते, ते सुद्धा वारंवार विझले जात होते.
थोडावेळ असाच वारा वाहत राहील, अशी दोघांनी स्वतःची समजून घातली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या मुलीची जवळपास इथे नवीन शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचा दोघांनी विचार केला होता.
दोघजण बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की, ईशा तिथे नाहिये, म्हणून तर तिला बघण्यासाठी पूर्ण घरभर त्यांनी शोधलं; पण ती काही सापडतच नव्हती.
अचानक बोलण्याचा आवाज त्यांना आला आणि दोघेजण त्या घराच्या मागे असणाऱ्या पडीक जागेच्या इथे गेले, आणि बघतात तर एकटीच ईशा कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत होते.
" कैवल्य ही कोणाशी बोलत आहे ? " काव्या थोडीशी घाबरलेली होती, कारण बाहेर येण्यासाठी त्यांनी हातामध्ये टॉर्च घेतली होती आणि अंधारातच त्यांची मुलगी समोर कोणी नसताना बोलत होती.
त्यांनी खूप वेळ ईशाला आवाज दिला आणि जेव्हा तिच्या कानावर आवाज आला, तेव्हा ती त्यांच्याजवळ गेली.
"काय झालं मम्मी ? मी मस्त माझ्या फ्रेंडशी बोलत होती ना." ईशा आपल्या आईला म्हणाली.
" अगं, तिथे कोणीच नाही आणि तू न सांगता येते बाहेर का आलीस ? इथली जागा नवीन आहे. चल बघू घरी." असे म्हणून तिने तिचा हात पकडला, परंतु तरीसुद्धा ईशा मागे वळून दुसऱ्या हाताने कोणालातरी टाटा करताना दिसली.
हे थोडंसं विचित्रच वाटत होते, परंतु दोघेजण रात्रीचे जेवण केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मुलीला असे कुठेही न जाण्याबद्दल सांगत होते.
रात्री झोपल्यावर मध्यरात्री कैवल्यला स्वप्न पडले आणि तो घाबरून जोरात ओरडून जागा झाला.
" काय झालं?" काव्याने त्याचा घामाने चिंब झालेला चेहरा बघून विचारले.
" माझा अपघात झालेला होता ना, त्यावेळी मला काही मुली समोर दिसलेल्या होत्या आणि म्हणूनच मी जोरात ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी माझी गाडी जोरात धडकली होती." त्याला त्याचा अपघात कसा झाला ते आठवत होते.
" कैवल्य, मला ही जागा काही ठीक वाटत नाहीये. आपण इथून दुसरीकडे जाऊया." काव्या घाबरतच म्हणाली.
" अगं, असं कसं आपण इथून जाणार ? सगळे पैसे आपण दिले आहेत. आता मला समजायला लागले की, ह्या जागेचे भाव जास्त असून सुद्धा आपल्याला हे घर कमी पैशांमध्ये का दिले ? तसेच त्याचा मूळ मालक सुद्धा आपल्याला भेटायला आला नव्हता." तो एक एक कडी जोडायला लागला होता.
आपल्या मुलीला बघितलं तर ती सुद्धा तिथे नव्हती. आता मात्र दोघे सुद्धा घाबरले. पुन्हा घरामध्ये शोधू लागले आणि जसा त्यांना दोन लोकांचा कुजबुजण्याचा आवाज यायला लागला. तसेच ते त्या दिशेने गेले.
तो आवाज येत होता ईशा आणि तिच्यासोबत बोलणाऱ्या मुलीचा, परंतु ती मुलगी काही त्यांना दिसतच नव्हती.
" ईशा, इथे काय करते आहेस तू?" त्यांनी तिला विचारले.
पण जसे त्यांनी ईशाकडे बघितले, तसे त्यांना त्यांची मुलगी ईशा ही वाटतच नव्हती. काव्याने तर घाबरून कैवल्यचा हातच पकडला.
ईशा पटकन तिच्या पालकांजवळ आली आणि म्हणाली,
"मी ईशा नाही आहे."
"मी ईशा नाही आहे."
असे म्हणताच त्यांच्यासमोर सर्व लहान मुलींच्या आत्मा एक एक करून दिसायला सुरुवात झाली.
" तुम्ही कोण आहात?" कैवल्यने त्या लहान मुलींच्या आत्म्याकडे बघून विचारले.
" आम्ही मेलो आहोत आणि आम्हाला या जागेवर पुरण्यात आले होते. तुमच्या घराच्या खाली सुद्धा काही मुलींना पुरण्यात आले आहे. ह्या पूर्ण जागेत त्या सर्वांमध्ये तुम्हाला काही मुलींच्या शरीराचे अवशेष नक्कीच सापडतील." एक मुलगी भयानकरित्या आवाज करत म्हणाली.
अचानकपणे हे असं समोर आल्यावर आता मात्र दोघे सुद्धा खूप घाबरले होते.
" त.. तु... तुम्हाला काय पाहिजे आहे ? तुम्ही माझ्या मुलीला सोडा. त्या मुलीची आत्मा आपल्या मुलीच्या अंगामध्ये येऊन बोलत होती." म्हणून घाबरतच काव्याने हात जोडून त्या एका मुलीच्या आत्म्यास सकट सर्व तिथे उपस्थित असलेल्या आत्म्यांना उद्देशून म्हणाली.
" आम्हाला मुक्ती हवी आहे आणि ती तुम्हीच देऊ शकता." त्या सर्वजणी भेसूर आणि मोठ्या आवाजात एकदम बोलल्या.
" पण तुमच्या सोबत काय झालं होतं ? " आता न राहून काव्याला मात्र ह्या आपल्यालाच का दिसतात, म्हणून प्रश्न पडला होता.
" कारण तुम्ही या घराचे मालक आहात. खूप वर्षांपूर्वी या घराच्या जागी एक मोठा वाडा होता. तिथला जो मालक होता, त्याने त्याला आपल्या घरामध्ये मुलींचे अस्तित्व मान्य नव्हते, म्हणून त्यांनी होणाऱ्या सर्व मुलींना इथे जिवंतपणे गाडलेले होते, म्हणून आम्हाला कधीच इथून मुक्ती मिळाली नाही.
त्यामुळे आम्ही कोणालाच इथे येऊन दिलं नव्हते, परंतु तुम्ही चांगल्या स्वभावाचे आहात, हे आम्हाला आधीच समजले होते; म्हणूनच आधी तुमचा अपघात केला आणि त्यानंतरही तुम्ही इथे आलात. आधी आम्ही सूडाच्या भावनेने तुमचा अपघात केला होता, कारण सर्व पुरुषांचा आम्हाला राग येत होता. "
"बापरे, हे किती भयानक आहे." काव्या म्हणाली.
" इथे ज्या मुलींना मारण्यात आले होते. त्याच्या आधी त्या सर्व मुलींना काही पैशासाठी विकलेले होते आणि जबरदस्ती शारीरिक संबंध झाल्यानंतर सर्वांना जिवंतपणे इथे एक एक करत गाढलेले होते.म्हणूनच आमचा आत्मा कधी मुक्त झालाच नव्हता. जर तुम्ही आम्हाला मुक्ती दिली नाही, तर मात्र आम्ही तुमचे जगणे मुश्किल करून टाकू." एका आवाजात सर्वजण बोलायला सुरुवात करत होत्या.
" ठीक आहे. आम्ही नक्कीच तुम्हाला मुक्ती देण्याचा प्रयत्न करू, पण तुम्ही आमच्या मुलीला काहीच हानी करू नका. हे सर्व झाल्यानंतर आम्हाला तुमचा काही त्रास होणार नाही ना?" काव्याने घाबरतच विचारले.
" हो नक्की, तुम्हाला काहीच त्रास होणार नाही." असे म्हणून त्या सर्व मुलींच्या आत्मा गायब झाल्या.
दुसऱ्याच दिवशी ब्राह्मणांना बोलवून सर्व मुलींचे श्राद्ध घातले गेले आणि त्या सर्वांनी मुलींच्या आत्म्याला मुक्ती मिळाली होती.
ज्यावेळेस कैवल्यचा अपघात झालेला होता. त्यावेळेस त्याला त्याच्या गाडीच्या मागून विचित्र असे आवाज येत होते. तसेच समोर सुद्धा जोरात दिसलेल्या मुलींच्या आत्मा आणि किंचाळण्याच्या आवाजामुळे अकस्मातपणे जोरात आलेल्या आवाजामुळे त्याचे कार चालवताना लक्ष भरकटले आणि तेव्हा त्याचा अपघात झालेला होता.
तिल्या गोष्टी या गूढ होत्या आणि त्या कैवल्य आणि त्याच्या कुटुंबाने तिथे राहायला आल्यामुळे त्यांचा उलगडा झाला होता.
समाप्त.
©विद्या कुंभार
(प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून मनोरंजन म्हणून लिहिली आहे ह्यातून कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केलेला नाही, याची नोंद घ्यावी.)
कथा कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा