आवाज.... भाग - ३
"काकू, मला सगळं खरं ऐकायचं आहे."  सिया ठामपणे म्हणाली. त्यावर काकू तिच्याकडे एकटक बघत राहिल्या. मग काकू हळूच म्हणाल्या.
"माया ही माझी पुतणी होती. ती जितकी सुंदर आणि हुशार होती तितकीच हट्टीसुद्धा होती. तू आता जिथे राहतेस तिथेच ती त्या खोलीत राहत होती. एका रात्री तिला आरशातून आवाज ऐकू यायला लागले… अगदी तुझ्यासारखेच." काकू म्हणाल्या ते ऐकून सिया थक्क झाली आणि पुढे बोलू लागली.
"मग तिचं पुढे काय झालं?" सियाने विचारलं तेव्हा काकूंचे हात थरथरले.
"ती आरशातून बाहेर पडायचा प्रयत्न करणाऱ्या आत्म्याला वाचवायचा प्रयत्न करत होती. पण त्या आत्म्याने तिलाच घेतलं. त्या रात्रीनंतर ती गायब झाली… फक्त तिचा आवाज उरला." काकूंचं बोलणं ऐकून सियाला घामच फुटला. तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला.
"म्हणजे… आता ती माझ्या मागे आहे?" सियाने थरथरत्या आवाजात विचारलं.
"हो, पण तिला तुझी गरज आहे,  काहीतरी अपूर्ण राहिलंय तिचं आणि ती तुला ते पूर्ण करायला लावणार आहे." काकू म्हणाल्या. त्या क्षणी सियाचा फोन वाजला, अर्जुनचा कॉल होता.
"सिया, माझ्या खोलीत तुझं नाव लिहिलंय भिंतीवर... कुणी, कसं काय माहित." तो म्हणाला. ते ऐकून सिया थरथरली. 
"काय?" सियाने घाबरत विचारलं.
"हो आणि ते लिहिताना… मला आरशात तुझाच चेहरा दिसला. पण डोळे लाल दिसत होते..." अर्जुन म्हणाला. तेवढं बोलून त्याने फोन ठेवला.
अर्जुनने फोन ठेवल्यानंतर सिया काही क्षण पूर्ण स्तब्ध उभी राहिली.
तिच्या डोक्यात एकच विचार होता तो म्हणजे....
"माझा चेहरा अर्जुनच्या आरशात का दिसला?" ती विचार करतच धावत अर्जुनच्या घराकडे गेली.
तिथे गेल्यावर पाहिलं तर दरवाजा अर्धवट उघडा होता, आतून हलका थंड वारा येत होता.
“अर्जुन?” तिने त्याला आवाज दिला पण आतून उत्तर आलं नाही. मग ती आत शिरली आणि थांबली. तर तिला अर्जुनच्या खोलीच्या भिंतीवर रक्तासारख्या लाल रंगात काहीतरी लिहिलेले दिसलं म्हणून ती वाचू लागली.
तिच्या डोक्यात एकच विचार होता तो म्हणजे....
"माझा चेहरा अर्जुनच्या आरशात का दिसला?" ती विचार करतच धावत अर्जुनच्या घराकडे गेली.
तिथे गेल्यावर पाहिलं तर दरवाजा अर्धवट उघडा होता, आतून हलका थंड वारा येत होता.
“अर्जुन?” तिने त्याला आवाज दिला पण आतून उत्तर आलं नाही. मग ती आत शिरली आणि थांबली. तर तिला अर्जुनच्या खोलीच्या भिंतीवर रक्तासारख्या लाल रंगात काहीतरी लिहिलेले दिसलं म्हणून ती वाचू लागली.
"आरशाला स्पर्श करू नकोस..." ते वाचून सियाचं हृदय जोरात धडधडू लागलं.
सियाला आरशात तिचं प्रतिबिंब दिसत होतं, पण ते थोडं विचित्र होतं. तिचं प्रतिबिंब हसत होतं… आणि तिला हात दाखवत होतं.
सियाला आरशात तिचं प्रतिबिंब दिसत होतं, पण ते थोडं विचित्र होतं. तिचं प्रतिबिंब हसत होतं… आणि तिला हात दाखवत होतं.
"हे… हे काय चाललंय?" ती म्हणाली आणि घाबरून मागे सरकली. त्याचवेळी अचानक आरशातून अर्जुनचा आवाज आला,
 "सिया, ती मला घेऊन गेली…" तो आवाज ऐकून सिया ओरडली.
"अर्जुन! तू कुठं आहेस?" सिया ओरडली त्याचवेळी आरशात तिला आता अर्जुनचा चेहरा दिसू लागला. तो फिकट, पांढरा दिसत होता आणि डोळे खोल गेलेले वाटत होते.
"सिया, मला वाचव… माया मला तिच्या जगात ओढून नेतेय…" अर्जुनचा आवाज त्या खोलीत घुमला. तेवढ्यात खोलीत लाईट चमकू लागली. आरशावर काळा धूर जमा होऊ लागला आणि त्यातून हळूहळू मायाचा चेहरा दिसू लागला.
"सिया… आता तू मला थांबवू शकत नाहीस. आता प्रत्येक आरशात माझं जग आहे." माया म्हणाली. ते ऐकून सिया घाबरून बाहेर पळाली आणि सरळ तिच्या घरी गेली. त्यानंतर ती जिथे जिथे ती बघत होती, तिथे तिला स्वतःचा चेहरा दिसत होता. तो ही अगदी वेडसर हसताना. ती ज्या आरशात पाहिल त्या आरशात तिला तिचाच चेहरा दिसू लागला अगदी बाथरूम, गाडीची काच, फोनची स्क्रीन. सर्वत्र तिचं दुसरं प्रतिबिंब मायाच दिसत होती.
"मला वाटतं की मला हा आरशाचा शाप आहे…" आरशात पाहून सिया थरथरत्या आवाजात स्वतःशीच म्हणाली. त्या क्षणी तिच्या फोनवर एक मेसेज आला  अनोळखी नंबरवरून. ती तो वाचू लागली.
त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं....
त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं....
 "आरसा फोड… पण तेव्हाच फोड, जेव्हा तुला सत्य कळेल…" ते वाक्य सिया गोंधळली.
“सत्य म्हणजे काय?” ती म्हणाली आणि काही कळायच्या आत तिच्या घरातील आरशातून पुन्हा आवाज आला....
"सिया… वेळ संपत चालली आहे…" ते ऐकून आता सियाला समजलं होतं हा शाप फक्त मायाचा नाही,
तर त्या आरशामागचं काहीतरी अजून गूढ आहे… काहीतरी जुनं… काहीतरी भयावह.
तर त्या आरशामागचं काहीतरी अजून गूढ आहे… काहीतरी जुनं… काहीतरी भयावह.
पुढच्या भागात उघड होणार आहे रहस्याचा पहिला धागा तेव्हा पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः 
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा