आवाज.... भाग - ४
रात्री सियाला काही केल्या झोप येत नव्हती डोक्यात नुसतं विचारांचं काहूर माजलं होतं.
आरशातून आलेला तो मेसेज....
“आरसा फोड, पण तेव्हाच जेव्हा तुला सत्य कळेल…”
तोच तिच्या मनात सारखा सारखा घुमत होता. ती सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. शेवटी ती उठून बसली आणि मनाशी काही तरी ठरवू लागली.

"बसं झालं आता... खुप विचार केला, या भीतीत जगणं थांबवायचं आणि त्या शापामागचं सत्य शोधायचं." ती स्वतःशीच म्हणाली आणि जे काही असेल ते सत्य शोधायचं आणि त्याला सामोरे जायचे हे तिने मनाशी ठरवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा विजया काकूंकडे गेली. तेव्हा दार उघडण्याआधीच आतून त्यांचा आवाज आला.
“सिया, मला माहीत होतं तू येणार आहेस.” काकू म्हणाल्या पण काकूंच्या चेहऱ्यावर काळजी होती.
“सिया, मला माहीत होतं तू येणार आहेस.” काकू म्हणाल्या पण काकूंच्या चेहऱ्यावर काळजी होती.
"काकू, तुम्ही काळजीत दिसताय!" सियाने विचारलं.
“तू त्या आरशाचा शाप तोडायचा विचार करतेस का?” काकूंनी विचारलं तेव्हा सियाने मान हलवली.
“हो. पण मला आधी हे जाणून घ्यायचं आहे... हा आरसा कुठून आला?” सियाने विचारलं. त्यावर काकू दीर्घ श्वास घेत म्हणाल्या,
“तो आरसा साधा नाही. तो ‘राणे वाड्या’च्या तळघरातून आला होता. ती हवेली गावाबाहेर आहे... ती आता बंद आहे. मायाच्या मृत्यूनंतर कोणी तिकडे पाऊल टाकलं नाही.” काकू.

“मग तिथेच मला सत्य मिळेल.” सिया ठामपणे म्हणाली. पण त्याचवेळी काकूंनी तिला थांबवायचा प्रयत्न केला,
“सिया, तो वाडा काही चांगला नाही. तिथे गेलेला प्रत्येक जण… गायब झाला आहे, आत गेलेले कोणीच बाहेर आलं नाही." काकूंनी सांगितले पण सिया मागे हटली नाही. ती संध्याकाळी तिकडे गेली.
सियाने पाहिलं तर वाड्याचा दरवाजा पुर्ण गंजलेला होता आणि आत पूर्ण अंधार होता. मग तिने मोबाईलची टॉर्च लावली.
तिथे धुळीने भरलेलं तळघर, मोडकळलेले फर्निचर होतं आणि एका भिंतीवर कोरलेलं चिन्ह होतं.
“R” ते चिन्ह बघताच तिच्या हाताला थंड वारा लागला. आणि त्याचवेळी भिंतीच्या पलीकडे हलका आवाज आला. तो ती ऐकू लागली.
“R” ते चिन्ह बघताच तिच्या हाताला थंड वारा लागला. आणि त्याचवेळी भिंतीच्या पलीकडे हलका आवाज आला. तो ती ऐकू लागली.
“सिया… इथेच सगळं सुरू झालं होतं…” त्या आवाजाने ती वळली आणि तिला दिसलं एक जुना, फुटका आरसा.
त्याच्या चौकटीवर काहीतरी लिहिलं होतं. ते ती वाचू लागली.
त्याच्या चौकटीवर काहीतरी लिहिलं होतं. ते ती वाचू लागली.
“सत्याचं घर… आरशाच्या पलीकडे आहे.” ते वाचल्यावर तिने आरशात पाहिलं आणि तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं ते एक घर… पण ते तिच्या जगातलं नव्हतं.
भिंतींवर रक्ताच्या हाताचे ठसे, आणि दरवाज्याजवळ उभं मायाचं प्रतिबिंब होतं. ते मायाचं प्रतिबिंब तिला म्हणालं.....
भिंतींवर रक्ताच्या हाताचे ठसे, आणि दरवाज्याजवळ उभं मायाचं प्रतिबिंब होतं. ते मायाचं प्रतिबिंब तिला म्हणालं.....
“तुझं स्वागत आहे, सिया इथे… तू शेवटी माझ्या घरात आलीस.” ते ऐकून सिया घाबरली.
आता सियाचं पाऊल त्या दुसऱ्या जगात पडलं आहे. जिथे सत्य आणि मृत्यू यांच्यामधली रेषा खूप पातळ आहे. पण सियाला अजून ते माहिती नव्हते.
क्रमशः