आवाज.... भाग - ७
सिया आरशातून बाहेर आली, पण तिचं मन अजूनही त्या पलीकडच्या जगात अडकलेलं होतं.
टेबलावर पडलेली काळी चौकट तिच्याकडे बघत असल्यासारखी वाटत होती. ती साधी चौकट नव्हती तिच्या कडांवर विचित्र अशी कोरीव चिन्हं होती आणि मधोमध धुसर धूर हलत होता.
सियाने थरथरत तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली.... “हीच ती चौकट?” असे बोलून तिने ती चौकट उचलली.
ती उचलताच तिच्या हातात थंड वाऱ्याचा झटका बसला.
तिच्या कानात हळू आवाज आला...
“मी तुझी वाट पाहत होतो…” त्या आवाजाने तिने घाबरून चौकट खाली ठेवली. नंतर घरभर तो आवाज पसरला, जणू काही तिथल्या भिंतीच बोलत होत्या.

“तू मला सोडवणार आहेस का, की स्वतः कैद होणार आहेस, सिया?” असा आवाज आला तसं सिया थरथरली.
“कोण आहेस तू?” ती मोठ्याने किंचाळली. तेव्हाच भिंतीवर सावली दिसली. उंच, पोकळ, आणि डोळ्यांच्या जागी खोल काळेपणा.
ती सावली हलू लागली, आणि हळूहळू तिच्या समोर मानवी आकारात आली.
“कोण आहेस तू?” ती मोठ्याने किंचाळली. तेव्हाच भिंतीवर सावली दिसली. उंच, पोकळ, आणि डोळ्यांच्या जागी खोल काळेपणा.
ती सावली हलू लागली, आणि हळूहळू तिच्या समोर मानवी आकारात आली.
“मी आहे राणे, तुझ्या वडिलांचा शिष्य. त्या मायाचा आत्मा या चौकटीत मीच बांधला आहे. ती मुक्त झाली तर माझं जग संपेल.” तो म्हणाला. ते ऐकून सिया मागे सरकली.
“तू मला का अडवतो आहेस?” तिने घाबरत विचारलं. त्यावर तो हसला. त्याचं हसू थंड, श्वास रोखणारं होतं.
“तू मला का अडवतो आहेस?” तिने घाबरत विचारलं. त्यावर तो हसला. त्याचं हसू थंड, श्वास रोखणारं होतं.
“कारण तू तिच्या रक्ताची आहेस. तूही आरशाच्या रक्तवंशातून आली आहेस, सिया. माया तुझ्या आईची मुलगी होती, पण तू… तू त्या शापाची पुढची पिढी आहेस.” ते ऐकून सियाच्या अंगावर काटा आला.
“तू खोटं बोलतोय!” ती ओरडली.
“तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या आईने आरशाच्या आत्म्याशी करार केला होता. मायाच्या जागी तुला वाचवण्यासाठी.” राणे म्हणाला. ते ऐकून सियाला गरगरल्यासारखं झालं.
“म्हणजे माझं अस्तित्वच एका करारावर उभं आहे?” ती सुन्न होत विचारू लागली. त्यावर राणे पुढे आला.
“हो, आणि आता तो करार मोडण्याची वेळ आली आहे.
तू ती चौकट फोडलीस तर, तूही नष्ट होशील.” राणे म्हणाला. तेव्हा सियाने थरथरत्या हाताने चौकटीकडे पाहिलं तर तिला धुरातून मायाचा चेहरा दिसत होता.
तू ती चौकट फोडलीस तर, तूही नष्ट होशील.” राणे म्हणाला. तेव्हा सियाने थरथरत्या हाताने चौकटीकडे पाहिलं तर तिला धुरातून मायाचा चेहरा दिसत होता.
“सिया… मला वाचव, तू माझं एकमेव आश्रयस्थान आहेस.” माया कळवळून म्हणाली.
“सिया, ती खोटं बोलतेय!” राणे मोठ्याने म्हणाला. त्याचवेळी खोलीतील लाईट चमकू लागले आणि विझले. एकाएकी सगळीकडे अंधार पसरला.
सिया मात्र खुप गोंधळली कोणावर विश्वास ठेवायचा हेच तिला कळेना. ती विचार करत होती. तोच मायाचा आवाज पुन्हा आला.
सिया मात्र खुप गोंधळली कोणावर विश्वास ठेवायचा हेच तिला कळेना. ती विचार करत होती. तोच मायाचा आवाज पुन्हा आला.
“जर तू मला मुक्त केलंस, तू सत्य बघशील.” माया म्हणाली.
“जर तू तसं केलंस, तुझं जीवन संपेल.” राणे म्हणाला. त्याक्षणी सियाने धाडस करून चौकट हातात घेतली.
तिने डोळे मिटले आणि जोरात ती जमिनीवर आदळली.
“जे काही व्हायचं ते होऊ दे!” असं ती मनाशीच म्हणाली.
तिने डोळे मिटले आणि जोरात ती जमिनीवर आदळली.
“जे काही व्हायचं ते होऊ दे!” असं ती मनाशीच म्हणाली.
चौकट फुटली आणि खोलीतून प्रचंड आवाज आला.
वाऱ्याचा झंझावात, आरशाचे तुकडे हवेत उडाले,
आणि त्या तुकड्यांमध्ये तिला मायाचा चेहरा, स्वतःचा चेहरा आणि एक अंधाऱ्या आकृतीचा मिलाफ दिसला.
वाऱ्याचा झंझावात, आरशाचे तुकडे हवेत उडाले,
आणि त्या तुकड्यांमध्ये तिला मायाचा चेहरा, स्वतःचा चेहरा आणि एक अंधाऱ्या आकृतीचा मिलाफ दिसला.
सगळं काळं पडलं. काही क्षण तिथे शांतता पसरली
सिया श्वास घेत होती, पण खोली बदलली होती.
भिंतींवर नवा आरसा, आणि त्यात उभी होती तीच स्वतः
पण आरशाबाहेरून बघणारी माया… हसत होती.
सिया श्वास घेत होती, पण खोली बदलली होती.
भिंतींवर नवा आरसा, आणि त्यात उभी होती तीच स्वतः
पण आरशाबाहेरून बघणारी माया… हसत होती.
“आता तू माझ्या जगात आहेस, सिया आणि मी तुझ्या जगात…" माया म्हणाली.
आता दोघींचं जग बदललं होतं. सिया आरशात अडकली होती, आणि माया जिवंत जगात आली होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा