आवाज.... भाग - १०
मायाचा श्वास अनियमित झाला होता. ती आपल्या खोलीत बसून आरशाकडे पाहत होती. तिला सगळं काही सामान्य दिसत होतं... पण आरशाच्या तळाशी धुक्याचा एक पातळ थर हलत होता. मग अचानक, त्या धुक्यातून एक हात बाहेर आला… तो पांढरा, थंड आणि जिवंत दिसत होता. तो बघून माया किंचाळली. ती मागे सरकली, पण त्या हातानं आरशाची चौकट पकडली, आणि हळूहळू बाहेर ओढू लागला. तिला ती सिया दिसत होती. पण ती सिया वेगळी होती. तिच्या डोळ्यात निळं तेज होतं, आणि चेहऱ्यावर एक शांत, पण भयावह भाव होते. ते बघून माया थरथरली,
“सिया… तू परत आलीस?” मायाने घाबरून विचारलं.
“हो… पण सगळं तसंच नाही राहिलंय.” सिया शांत आवाजात म्हणाली.
तिने आरशाकडे पाहिलं आता तिथे दुसरं काहीतरी हलत होते, सावलीसारखं. ते म्हणजे लहान सिया, जी आरशात अडकली होती. ते बघून मायाने धीर एकवटून विचारलं,
“तू तिला मागे सोडलंस का?”
“नाही… ती माझ्या आत आहे आता.” सिया म्हणाली. त्या क्षणी खोलीत वारा जोरात वाहू लागला आणि आरशाच्या पलीकडे सावल्या नाचू लागल्या,
आणि आरशावर लिहिलं गेलं....
आणि आरशावर लिहिलं गेलं....
“एक आत्मा परतला, दुसरा जागा झाला.”
ते बघून मायाने भयभीत होऊन मागे पाहिलं,
“याचा अर्थ काय?” माया म्हणाली. तसं सिया खुर्चीवर बसली. तिचा आवाज आता अधिक गडद झाला होता.
“आरशाच्या जगात फक्त मीच नव्हते अडकलेली…
अजूनही बरेच आहेत. आणि आता त्यांना वाट मिळाली आहे.” सिया म्हणाली. ते ऐकून मायाच्या मनात धडकी भरली.
“आरशाच्या जगात फक्त मीच नव्हते अडकलेली…
अजूनही बरेच आहेत. आणि आता त्यांना वाट मिळाली आहे.” सिया म्हणाली. ते ऐकून मायाच्या मनात धडकी भरली.
“म्हणजे… ते सगळे इथे येणार?” माया म्हणाली. त्यावर सिया आरशाकडे पाहत म्हणाली,
“हो, जर आपण आरशाचा दरवाजा बंद केला नाही,
तर ते सगळे बाहेर पडतील.” सिया म्हणाली तेवढ्यात आरशातून एक भयानक आवाज आला
तर ते सगळे बाहेर पडतील.” सिया म्हणाली तेवढ्यात आरशातून एक भयानक आवाज आला
“तू आम्हाला धोका दिलास… सिया…” ते ऐकून सियाच्या डोळ्यात निळं तेज पेटलं. ती हात पुढे करून आरशाच्या दिशेने मंत्रासारखे काही शब्द म्हणू लागली.
आरशातून धुराचे हात बाहेर आले आणि तिच्या भोवती फिरू लागले. मायाने तिच्या खांद्याला धरलं,
आरशातून धुराचे हात बाहेर आले आणि तिच्या भोवती फिरू लागले. मायाने तिच्या खांद्याला धरलं,
“थांब! तू स्वतःलाच नष्ट करशील!” माया म्हणाली.
“जर मी नाही थांबवलं, तर आपण सगळे संपू.” सिया म्हणाली आणि तिने हाताने आरशावर आपला तळहात ठेवला. तेवढ्यात खोलीतील लाईट बंद झाले आणि विजेचा एक झटका बसला, आणि आरशातून प्रकाशाचा स्फोट झाला.
धूर थांबला तेव्हा सगळं शांत होतं. माया जमिनीवर पडलेली आणि सिया आरशासमोर उभी, पण आता तिच्या चेहऱ्यावर दोन सावल्या होत्या. एक अर्धा प्रकाशात, एक अंधारात. तिने स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं, आणि पुटपुटली “तो परत येईल…”
"कोण?" माया हळूच म्हणाली. त्यावर सियाचे ओठ हळूच हलले..... “राणे…” ती म्हणाली. तिच्या त्या शब्दासोबत आरशात पुन्हा हालचल झाली आणि भिंतीवर सावली उमटली ती सावली राणेची होती.
आता खरा भयाचा खेळ सुरू झाला आहे राणे जिवंतांच्या जगात परत येणार आहे…
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा