Login

एक चूक - भाग - 2

Aayushi

     

         त्या दिवशी अर्जुन कोल्हापूर ला गेला होता.. संध्याकाळ नंतर पुन्हा येणार होता. आयुषी ला फार उदास वाटत होत. तीच बुटीक चं कामं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आटपत आला होतं तिने मग मनातल्या मनात म्हंटल, आज पार्लर ला जावून येऊया, तसं ही बरेच दिवस झाले फेशियल केलेलं नाही आपण.. आणि मग ती बुटीक चं काम आवरून पार्लर ला गेली.

       पार्लर ला तशी गर्दी होती, म्हणून आयुषी मोबाईल वर बघत आपला नंबर येण्याची वाटत बघत तिथे बसून राहिली. तेवढ्यात कोणीतरी मागून म्हंटले..... आयुषी.... आयुषी...

        आपलं नाव ऐकल्यावर आयुषी ने मागे वळून बघितले.. बघते तर समोर तिच्या कॉलेज मधली एक मैत्रिण- रुपाली मागे उभी होती... आयुषी ला पटकन आठवले कि ती हल्लीच दोन महिन्यापूर्वी अर्जुन बरोबर महाबळेश्वर ला गेलेली असताना तीला ही रुपाली दिसली होती, पण आयुषी ने तीला बघितल्यावर - बघून न बघितल्यासारखे करून दुरून ची ती दिसताच रस्ता बदलला होता...

       रुपाली ने कशी आहेस, असे विचारले आयुषी ने पण मस्त आहे.. असे पटकन उत्तर दिले.. रुपाली सरळ मुद्द्यावर आली.. आणि म्हणाली... अर्जुन बरोबर तू महाबळेश्वर ला मला दिसली होतीस.. पण तू गडबडीत होतीस असं वाटल म्हणून मी तुला हाक मारली नाही... तू आपल्या कॉलेज मधल्या अर्जुन बरोबर कशी तिकडे होतीस .... तुझा नवरा तर राज आहे न कोणीतरी मी फबी वर तुझं प्रोफाइल बघितलं...आयुषी ला काय बोलावं कळतं नव्हत म्हणून ती म्हणाली अर्जुन माझा कॉलेज पासूनच बेस्ट फ्रेंड् आहे.

       रुपाली म्हणाली, हे बघ आयुषी मी सरळ विषयावर चं येते... आयुषी... अर्जुन चांगला माणूस नाही... तू त्यांच्यापासून दूर रहावस असं मला वाटतंय... तू ज्या तर्हेने महाबळेश्वर ला त्याच्या बरोबर वावरत  होतीस, त्यावरून तुमच्या दोघातले संबंध मैत्रीचे नाहीत, त्या पलीकडचे आहेत हे मी तेव्हाच ओळखलं होतं...

       आयुषी चोरी पकडली गेल्यासारखी खूप घाबरली.. तीला बोलायला चं जमेना... तरी ती स्वतः ला सावरत  म्हणाली... कि अर्जुन ला मी बरेच वर्ष ओळखते आहे.. तो असा कोणाला फसवणारा नाहीय.

      रुपाली ठामपणे म्हणाली... हे बघ आयुषी...तेव्हाच मला काही माहीत नाही.. मी आजच्या अर्जुन ला ओळखते... त्याचे अनेक विवाहित स्त्रियांशी संबंध आहेत...

       आयुषी म्हणाली... पण त्याला तर वाटेल तेवढ्या कुंवार मुली मिळू शकतात... तो विवाहित स्त्रियांना कां म्हणून नादी लावेल... मला हे काही केल्या पटत  नाही आहे मी त्याच्याशी सहा महिने बोलते आहे मला तो फसवतोय असं अज्जीबात वाटल नाही एकदाही...

        रुपाली बोलू लागली... अग तो अर्जुन फार हुशार आणि लबाड आहे... कुमारिका मुलगी लगेचच लग्नाची स्वप्न बघू लागते.. सोडून दिल्यावर धमकी देते. गोंधळ घालते.. त्यात त्याला त्याची पत  जाण्याचा धोका असतो.... पण विवाहित स्त्रियांना मौज मज्जा करून त्याने सोडून दिलं तर त्या रडतात आणि गप्प बसतात.. नवरा, मुलं, सासर ह्या सगळ्याचा विचार करून प्रकरण अधिक वाढवत नाहीत.. मग हा अर्जुन पुन्हा असले प्रकार करायला मोकळा....

        आणि अजून एक तुला सांगायचं राहिलं..... अर्जुन ने अनेक बायकांना फसवून आता वयाच्या पस्तीस व्या वर्षी लग्न करायचं ठरवलं आहे... त्याचा हल्लीच साखरपुडा ही झालाय असं मला पण एका मित्राकडून समजलं आहे... त्याने एका चांगल्या अधिकाऱ्याची मुलगी लग्नासाठी निवडली आहे... काय अर्जुन चा साखरपुडा ही झाला... आयुषी ओरडून बोलली...

      त्यांच्याच गावची कोल्हापूर ची मुलगी आहे.. आयुषी मनातल्या मनात बोलली तरीच हल्ली अर्जुन सारखा कोल्हापूर ला जायचा.. विचारलं कि बोलायचा आई - बाबा तिकडे असतात न ते बोलावतात सारखे...त्यानंतर आयुषी पार्लर मध्ये थांबलीच नाही.. ती तडक घरी निघाली... आणि घरी आल्यावर विचार करू लागली.. एक महिना हल्ली अर्जुन ही तीला बदलल्या सारखा वाटत होता.. त्याचं हल्ली च्या कोल्हापूर च्या सतत च्या फेऱ्या - ह्या सगळ्याचा तीला आता अंदाज आला...

       आयुषी स्वतः शी चं बोलू लागली.. त्या अर्जुन च्या हुद्द्यावर आणि त्याच्या त्या मोठ्या स्वप्न दाखवण्याच्या वृत्तीला मी बळी पडली.. या जाणीवेनेच तीला स्वतः चा राग आला आणि तिने अर्जुन ला रागारागात फोन लावला...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - आयुषी ने अर्जुन ला फोन लावल्यानंतर चं त्याचं ह्या सगळ्यावर काय उत्तर होतं ते....)

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

       

     

0

🎭 Series Post

View all