लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
अंजली गरीब घरातली एक मुलगी, वडिलांचा अत्यंत कमी पगार, आई सतत दम्याने आजारी, लहान चार बहिणी, अंजली सर्वात मोठी मुलगी, आई आजारी त्यामुळे कमी वयातच अंजलीवर बहिणींची काळजी घ्यायची जबाबदारी आली होती. एकोणीसाव्या वर्षीच वडिलांनी तीच लग्न ठरवलं, तिला पुढे खूप शिकायचं होत, पण तीच ऐकणार कोणीच नव्हत. सासरी आली. घरकामात शिक्षण बाजूलाच राहील.
अंजली दिसायला खूप सुंदर होती. त्यामुळे हुंडा नं घेणार सासर मिळालं, मुलीचं चांगल झाल. पोरीने नशीब काढलं असं सगळे घरचे म्हणाले. पण म्हणतात ना ज्याच्या साथीने पुढे जायचं ठरवून ती ह्या घरात आली होती तो तिचा नवरा ( अशोक ) अतिशय तापट आणि रागीट होता. घरातले सगळे त्याला घाबरत असत. त्यात आता अंजलीचा हि समावेश झाला.
सतत चिडत राहणे, कायम तिरसटासारखे बोलणे, त्यात सतत पैश्याच्या मागे धावणे, ह्या त्याच्या सवयी होत्या. लग्न झाल्यानंतरचे सुरवातीच्या दिवसांत अंजली ला सतत वाटे, ह्याने माझ्याबरोबर गप्पा माराव्यात, दोघांनी एकमेकाला समजून घ्यावे, पण अशोक ला त्याचं काहीच नसे. त्याच्या दृष्टीने त्याची बायको म्हणजे हक्काची एक गुलाम होती. जी त्याने हाक मारली कि पुढच्या मिनिटाला त्याच्या समोर हजर राहील.
अंजली ला आता स्वताच्या भावना दाबून ठेवण्याची सवय लागली. नवर्याच्या मनासारखं कितीहि केल तरी तो कायम मी कोणीतरी खूप मोठा आहे ह्याच अवीरभावात असे. ह्या वेळी तो खुश तर पुढच्या पाचव्या मिनटाला तो संतापे. त्याचं वागणं अचंबित करणार असे. असेच दिवस जात होते. अंजली त्याला खूप घाबरून राहत असे. माहेरी जास्त जायचं नाही अशी त्याची ताकीद होती त्यामुळे ती गप्प गप्प असे. आणि तिथे जावून तरी ती कोणाला आपलं दुखणं सांगणार होती, आई आजारी, बहिणी लहान होत्या. ती अशीच कुढत दिवस काढू लागली.
लग्नानंतर दोन वर्षांनी बाळाची चाहूल लागली. ती खूप खुश झाली. पण अशोक मुलगाचं होईल असचं सतत म्हणे. अंजली मनात म्हणे मुलगी झाली तर काय होईल काय माहित, अंजलीला डिलिव्हरीला माहेरी पाठवणार नाही तिथे कोणी करणार नाही हे अशोक ने आधीच सांगून ठेवलं होत. त्यामुळे अंजली गरोदरपणात सासरीचं राहिली. पण सासू चांगली होती. अंजलीची काळजी घेत होती.
नऊ महिने झाल्यावर अंजली ने मुलीला जन्म दिला. मुलीला पाहण्यासाठी अशोक हॉस्पिटल ला आला. मुलगी खूप सुंदर होती. अंजली ने त्याच्याकडे बघितलं आणि तिचा सगळा आनंद हरवला. मुलगीच झाली तुला, तुझ्या माहेरी जशी मुलींची रांग आहे तशी आता इथे लावू नकोस म्हणजे झाल. असं अशोक बोलला. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं..
आधीच आईने गरिबाघरच्या मुलीशी माझं लग्न लावून दिल, आता त्यात तू मुलीलाच जन्म देवून अजून त्रास देते आहेस.,. असं अशोक बोलला. हे ऐकताच अंजली म्हणाली अहो त्यात माझा काय दोष, अशोक तिच्या ह्या वाक्याने चिडला. एकतर मुलीला जन्म दिलास आणि वर उलटून बोलतेस अस रागारागाने बोलत तो हॉस्पिटल मधून निघून गेला. नंतर त्या चार दिवसात तो एकदाही हॉस्पिटल ला आला नाहि, सासुच असे सतत हॉस्पिटलमध्ये तिच्याबरोबर..
बाळ झाल्यानंतर सतत अशोक चं हे तिरसट वागणं , पदोपदी तिचा अपमान , सतत अवहेलना झेलत दिवसेंदिवस तीच सौंदर्य ढासळत चाललं होत. ती दुःख झेलत निर्जीवपणे जीवन जगू लागली. घरची गृहिणी म्हणून सर्व कर्तव्य व्यवस्तीत पार पाडत होती. कालांतराने दोन्ही दिरांची लग्न झाली.....
सासरे वारल्यावर सासूही खचली. कमी बोलू लागली. आजारी पडू लागली. अशोक च्या ह्या विचित्र स्वभावामुळे दिरांनी ते घर सोडून स्वतची वेगळी घर बसवली. दोन नंबर चा दीर सासूलाही त्याच्याकडे राहायला घेवून गेला. आता घरी अंजली, अशोक आणि त्यांची मुलगी ( रुपाली ) असे तिघेच घरी उरले. अशोक अजूनच फोफावला, घरी ओरडणार कोणीच मोठं नाही बघून जास्तीत जास्त बाहेर मित्रांबरोबर राहू लागला.
घरचे सर्वच निघून गेल्यावर अशोक अजूनच कामात बिझी राहू लागला. त्याची पैसे कमावण्याची लालसा अजूनच वाढली. कितीतरी वेळा रात्री तो घरीही येत नसे, त्याच्या रागामुळे त्याला काही विचारण्याची सोय नव्हती.. घरी आपली पत्नी आणि मुलगी आहे याचा विचारचं तो करत नसे. अंजली खूप दुखी असे, पण हळूहळू ती परिस्थितीशी जुळवून घ्यायला लागली. तिने आपलं विश्व मुलीपुरतच मर्यादित ठेवलं होत.
पहिल्या मुलीच्या जन्मानंतर सात वर्ष झाली तरी अंजली पुन्हा गरोदर राहीना हे बघून अशोक अजूनच तिच्यापासून दूर दूर राहू लागला, तीला दारू पिवून रोज त्रास देवू लागला.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ह्या अशा नात्याचे भविष्यात काय होते.......)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा