मागच्या भागात आपण बघितले अशोक चे वागणे अतिशय विचित्र होते, आता पुढे.......
अशोक च्या मते बायको म्हणजे उपभोगाची वस्तू , रात्री अंजलीला जरा झोप लागली कि अशोक उशिरा दारू पिवून घरी येत असे, झोप लागतेच आहे तो पर्यंत दारूच्या नशेत तिच्यावर जबरदस्ती करे, तिला ते सगळ अगदी नकोसंच वाटे. पण कोणाला सांगणार, असा तीला प्रश्न पडे..... त्याची हक्काची गुलाम आहे अंजली असं तो तिला वागवत असे.
अंजली च्या माहेरची माणसं तिच्या परीस्थितिचं, वैभवाच कौतुक करत, “ तीच नशीब किती चांगल आहे , घरी सगळ वैभव आहे, “ अशी सगळी माहेरची मंडळी म्हणत असत. त्यांना सांगायचं तरी काय... मुलीचं ऐश्वर्य पाहून माहेरी सगळेच खुश होते, त्यांना हि परिस्थिती सांगून नाराज तरी कसं करायचं, त्यांना कशाला त्रास द्यायचा असं तीला वाटे.
कधीतरी अशोक ला उपरती होईल, तो चांगलं वागेल यावर तिचा विश्वास होता. ती त्याला खूप समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. पण अशोक तिच्यावरच सतत संतापे तिला नाही नाही ते बोलून अपमानित करत असे. तिला खूप कमी लेखत असे. त्याच्या दृष्टीने ती कमी शिकलेली आणि चार चौघात उठून दिसणारी नव्हती.....
असेच दिवस जात होते. लग्नाला दहा वर्ष होत आली होती. अशोक ने त्याला प्रमोशन मिळाले म्हणून घरी एक दिवस पार्टी ठेवली होती. अशोक ला प्रमोशन मिळाल्यामुळे त्याला आता अधून मधून परेदेशी जावे लागणार होते. अंजली ने मनात म्हंटले कि नशीब मला निदान तेवढी तरी ह्याच्या स्वभावापासून, ह्याच्या त्रासापासून सुटका मिळेल...
अशोक चे सगळे मित्र पार्टीसाठी घरी आले होते. त्यातलाच एक मित्र ( जयंत ) अगदी दिलखुलास स्वभावाचा होता. पार्टीच्या वेळी त्याची आणि अंजली ची ओळख झाली. तीच ते सतत गप्प गप्प राहणं, अशोक चं तिच्याबरोबर फटकून वागणं हे सगळं जयंत ने बरोबर जाणलं.... अशोक आताशा परेदेशी सतत जावू लागला होता. आणि तो कधी जातोय, कधी येतोय हे जयंत ला माहित असे.
जयंत अशोक गेल्यावर घरी येवू लागला. रुपाली बरोबर खेळू लागला. त्याचा तो खेळकर, मस्करी करणारा स्वभाव अंजली ला आवडू लागला. अंजली च्या मनातलं टोचणार दुख: त्याने बरोबर ओळ्खल होत. त्याच्यामुळे अंजली हसू अल्गली. त्याचा सहवास तिला आवडू लागला. त्याच ते विनोदी बोलणं तिला हसवत असे. अंजली ने एकदा त्याला सहज म्हंटल तुझा इरादा काय आहे रे .. मी अशी सहज तुझ्या जाळ्यात फसू शकत नाही हा...जयंत हसला....
जयंत म्हणाला..... तू का त्या अशोक पुढे अशी शरण जातेस, तुझं शिक्षण कमी आहे म्हणून, आणि तुझ्याकडे पैसे नाहीत किंवा ते तू कमवू शकत नाहीस असे तुला वाटते का. अशोक वर तुम्ही दोघी माय – लेकी डिपेंड आहात, तो घरातला एकमेव कमावता पुरुष आहे.. ...म्हणून ना.....लढ कि त्याच्याबरोबर बिनधास्त , का सतत अशी घाबरून राहतेस....
अंजली ला पटकन आठवलं, महिनाभरापूर्वी तिला खूप बऱ वाटत नव्हत. तिला प्रचंड विकनेस होता. एवढं कि तिला उठायला पण त्रास होत होता. आणि अशोक तिला त्याच अवस्थेत सोडून परेदेशी निघून गेला...या घटनेनंतर तिचा अशोक वरचा विश्वास अजूनच कमी झाला... संसार बिघडू नये म्हणून तिने ह्या दहा वर्षात खूप प्रयत्न केले होते. पण अशोक कायमच पैश्याच्या मागे धावत राहिला......तिला पुरतील किंवा त्या पेक्षा हि जास्त पैसे तो आता घरात तिच्याकडे देवून जावू लागला... अशोक च्या दृष्टीने प्रेम , आत्मीयता हे सगळचं पैश्यापुढे निरर्थक होत......
अंजली रडू लागली. त्यावर जयंत म्हणाला, मी एखादया स्त्रीला अशी रडताना बघू शकत नाही. जयंत सांगू लागला. मला तीन बहिणी आहेत त्यातल्या मोठ्या बहिणीला मी अस तुझ्यासारखं हतबल बघितलं आहे, तिचं नवर्याच्या विचित्र स्वभावामुळे आम्ही तिला लग्नानंतर पाच वर्षांनी घटस्पोट घ्यायला लावला. ती आता आमच्याकडे असते. माझ्या मते स्त्री पुरुषाच्या जीवनाचा आधार आहे, आणि तू आधीच त्या अशोक च्या जाळ्यात अडकलेली असताना मी तुला का फसवू...तू काहीच वेगळा विचार करू नकोसं माझ्याबद्दल.....मित्र म्हणून चं बघ नेहमी माझ्याकडे....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – अशोक आता सतत परदेशी जावू लागला होता. आणि त्यामुळे जयंत आणि अंजली ची मैत्री वाढत होती.......पण तिला आपला संसार मोडायची अजिबात इच्छा नव्हती......)
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा