आयुष्याच्या वळणावर - भाग - ३
अंजली आणि जयंत आता वारंवार भेटू लागले. जयंत बरोबर बोलल्यावर अंजलीला आता बऱ वाटत असे. अंजलीला मनातून खूप वाटत असे कि हे जी मी जयंत बरोबर शॉपिंग ला जातेय त्या ठिकाणी अशोक हवा होता, मला हे सर्व सुख: त्याच्याकडून हवे होते. अशोक ला ती हे सर्व सांगायला जरी गेली तरी त्याच वेगळच असे, त्याच्या मते एवढं मोठं घर आहे , सगळ्या सुखसोयी आहेत अजून काय हवे असते एका स्त्रीला ... हे त्याच उत्तर असे..
अंजली म्हणे मला ह्या सगळ्यापेक्षा तुमचा सहवास , आणि प्रेम हवे आहे, हे असं बोललं कि अशोक संतापून बोले – मी तुझ्याजवळ बसून राहून माझं काम कोण करेल, मला नोकरी आहे माझी... अंजली असं काही बोलली कि अशोक हा वाद अगदी तू कशी लायकीची नाहीस चार – चौघात नेण्यासाठी इथपासून तुला मुलगीच झाली इथपर्यंत अगदी वाद वाढवे.
त्तीला शेवटी वाटे वैवाहिक सुख: कदाचित माझ्या पत्रिकेत नसेल हि, पण मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करून हि हा माणूस जुळवून घेवू इच्छित च नाही आहे. तिने एकदा त्याला बोलून बघितलं कि मी माझं मन रमवण्यासाठी एखादा व्यवसाय करू का.....हे मात्र अशोक ला पटले, कारण नफा घरात येणार होता ना...
अंजलीने वर्षभरात केक, पाव- ब्रेंड, बिस्किट्स असे सगळे बेकरी प्रॉडक्ट कसे बनवतात त्याचे प्रशिक्षण घेतले ती त्यात अगदी माहीर झाली आणि मग तिने एक दुकान भाड्याने घेवून त्यात तिचा हा नवीन बिझनेस चालू केला. आता ह्यातून बर्यापैकी पैसे येवू लागले होते , म्हणून मग अंजली पैसे साठवू लागली.
ह्या व्यवसायाला दोन वर्ष झाल्यावर अंजली ने अशोक ला म्हंटले कि मी एक निर्णय घेतला आहे. मी माझ्या कमाईतला चाळीस टक्के हिस्सा एका अनाथ मुलांच्या संस्थेसाठी दर महिन्याला द्यायचा असे ठरवले आहे. अशोक चिडला कशाला काही गरज नाही आहे अस बोलू लागला. अंजली बरोबर त्याच खूप मोठं भांडण झालं. अंजली तिच्या मुद्द्यावर ठाम राहिली. त्यांनतर अशोक अजूनच तिच्याशी बोलेनासा झाला..
मध्ये एक महिना गेला आणि अशोक एक दिवस म्हणाला, मी कायमच परेदेशी शिफ्ट व्हायचं ठरवलं आहे, माझा सगळा बिजनेस तिकडेच तर आहे, त्याच्याकडे बघत अंजली म्हणाली अहो असा अचानक कसा निर्णय घेतलात तुम्ही .....माझं आणि रुपाली च काय.... अशोक बोलला मी तुम्हाला दोघींना तिकडे नेवू शकत नाही , तुम्ही इथेच राहा, मी पैसे पाठवेन तिकडून .... आणि काही अगदीच इमेर्जेन्सी आली तर जयंत आहे मदतीला ...मी सहा महिन्याआड एखादी फेरी मारेन.... अंजली हो बर... एवढंच बोलू शकली.
अशोक गेल्यावर अंजली ला थोडे दिवस कसतरीच वाटलं. पण त्याची कडक शिस्त, त्याचा रागीट स्वभाव, त्याचे ते कायमच टोचेल असं बोलणे, वागणे ह्याच्यातून ती आता कायमची मोकळी झाली होती. पण तरीही तिला राहून राहून मनात वाटे कि अशोक असा अचानक तिकडे शिफ्ट कसा काय झाला... त्याने ह्यावेळी तिकडे गेल्यावर दोन तीन महिने झाले फोनच केला नाही... अंजलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...
असेच दिवस जात होते. अशोक गेलेल्याला वर्ष होत आलं होत तो वर्षभरात इकडे फिरकलाच नव्हता...एक दिवस जयंत सकाळीच घरी आला अंजली कडे बघून बोलला मी आज एक बातमी सांगायला आलो आहे. अशोक ने तिकडे त्याच्या कलीग बरोबर लग्न करायचं ठरवलं आहे..
अंजलीच्या डोळ्यात अश्रू आले ती बोलली तेव्हाच तो वर्षभरात इकडे अजिबात आला नाही. तिने नकळत जयंत च्या खांद्यावर डोक ठेवलं आणि ती रडू लागली. जयंत बोलू लागला, स्त्री ला कायमच प्रेम हवे असते. अशोक ला हे कधी कळालेच नाही. आता तू त्या अनाथआश्रमात पाहिजे ती मदत कर तुला पहिजे तेव्हा तू तिथे जात जा आणि माझी काही मदत हवी असेल तर तास सांग.... अंजली आनंदित झाली. अंजली आता अनाथ मुलांसाठी काम करू लागली. त्यांच्या एनजीओ ला सामील झाली. असाच काळ जात होता.
अंजलीच्या डोळ्यात अश्रू आले ती बोलली तेव्हाच तो वर्षभरात इकडे अजिबात आला नाही. तिने नकळत जयंत च्या खांद्यावर डोक ठेवलं आणि ती रडू लागली. जयंत बोलू लागला, स्त्री ला कायमच प्रेम हवे असते. अशोक ला हे कधी कळालेच नाही. आता तू त्या अनाथआश्रमात पाहिजे ती मदत कर तुला पहिजे तेव्हा तू तिथे जात जा आणि माझी काही मदत हवी असेल तर तास सांग.... अंजली आनंदित झाली. अंजली आता अनाथ मुलांसाठी काम करू लागली. त्यांच्या एनजीओ ला सामील झाली. असाच काळ जात होता.
अंजली ची मुलगी ( रुपाली ) आता वयात आली होती , तिला विसावे वर्ष लागले होते. एके दिवशी जयंत घरी आला होता, त्याला बघताच रुपाली ने रागाचा कटाक्ष टाकला. जयंत जास्त करून रुपाली शाळेत असलीकि अंजली बरोबर गप्पा मारायला येत असे. जयंत बद्दल आजतागायत माय – लेकींच काहीच बोलणं झाले नव्ह्ते..
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – जयंत ने लग्नाबद्दल अंजली ला विचारल्यावर रुपालीची त्यावर प्रतिक्रिया काय असेल.....)
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा