Login

आयुष्याच्या वळणावर - भाग - 4

aayushya


आयुष्याच्या वळणावर - भाग - 4


अशोक तीन वर्ष झाले घरी आला नव्हता, हल्ली त्याला का कोण जाणो पण रुपाली बद्दल आस्था वाटत असे त्यामुळे तो रुपालीशी बोलण्यासाठी फोन करत असे. पण आईला फोन दे असं तिला कधीही सांगत नसे. रूपालीला हि आपले वडील चांगले आहेत, माझी चौकशी करतात, तिथून कुरिअर ने छान छान वस्तू पाठवतात असे वाटत असे. रुपालीने कधी येणार आहात हे विचारलं कि तो तिकडून लवकरच येतो असं नेहमी बोलत असे.

एके दिवशी अंजली च्या वाढदिवसाच्या दिवशी जयंत ने तिला बाहेर जेवायला नेले. आणि तिथे पोचल्यावर बोलला अंजली आज मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत ... जयंत बोलू लागला.. माझा एका मुलीबरोबर साखरपुडा झाला होता, पण लग्नाला चार दिवस बाकी असताना ती दुसर्या कोणाबरोबर तरी पळून गेली, पत्रिका वाटून झाल्या होत्या, सगळी लग्नाची तयारी झाली होती. आणि मग हे अस झाल्यावर मी खूप खचून गेलो होतो. मला पुन्हा लग्न करायची भीती वाटू लागली. मी नंतर स्थळ बघणे च बंद केल...


त्यानंतर हळू हळू वय वाढत गेल , मग मुली मिळणे कठीण झाले मग मी म्हंटल लग्नच नको करूया....या कारणामुळे मी अजूनही अविवाहित आहे. आणि मग तू भेटल्यावर वाटलं अशी असावी आपली सहचारिणी....अशी सर्वाना सांभाळून घेणारी, दुसर्यांची मन जपणारी बायको मला हवी होती. अंजली मला तुझ्याबरोबर आयुष्य घालवावे असं वाटतंय, माझी जोडीदार होशील का... मी तुला लग्नासाठी विचारतोय......


जयंत च्या अशा बोलण्यावर अंजली अचंबित झाली... आणि बोलू लागली. अजून माझा अशोक बरोबर घटस्पोट झालेला नाही आहे आणि रुपाली ला आपले वडील परदेशी असतात हे माहिती आहे तिला काय वाटेल ... मला तुझी जोडीदार व्हायला आवडेल खरतर. पण मला रूपालीला विचारावे लागेल् .....अस काही मी केल तर तिला काय वाटेल .... जयंत बोलला रुपाली माझा वडील म्हणून स्वीकार करणार असेल आणि तुला हरकत नसेल तर आपण घटस्पोटाचा अर्ज करू मग. अंजली हसून हो बोलली.....


जयंत तिला गाडीने घरी सोडून गेला. अंजली रडू लागली, ती विचार करू लागली. काय करावे. माझं सुख, आनंद शोधावा कि रुपाली चे भविष्य, अशोक तर सगळ सोडून कसलाही विचार न करता सर्व सोडून गेला. आणि मी इथे एवढे वर्ष हळहळत बसली आहे... पण घरात तारुण्यात प्रवेश करणारी मुलगी आहे आणि मी ह्यावेळी हा असा निर्णय घेणे योग्य होईल का.



समाजाच्या दृष्टीने ती एक संसारी बाई होती , जीचा नवरा परदेशी असतो, त्याच दुसरं लग्न झाले आहे हे फक्त तीला आणि जयंतलाच माहिती होते. तिच्या माहेरी सारखी आई म्हणत असे तुझ्यासारखं सासर सर्वाना मिळो.... पैसा आणि संपत्ती हेच सर्व काही नसत हे तिच्या माहेरी ती कशी सांगणार होती...ती विचार करत राहिली आणि मनोमन म्हणाली रुपाली ला सांगायला हवे हि तुझ्या वडिलांनी तिकडे दुसरं लग्न केल आहे....आणि मग जयंत च्या प्रस्तावाबद्दल पण बोलेन......


रुपाली पण तिच्या वडिलांच्या स्वभावावर गेली होती. तिला अहंपणा खूप होता. हेकेखोर होती.....अंजली विचार करत बसली कि कधीतरी तीला हे कळायलाचं हवे. दुसर्या दिवशी अंजली रूपालीला बोलली अग आज मी तुझ्या कॉलेजच्याजवळ एका कामासाठी येणार आहे तर मी तुला कॉलेजला न्यायला पण येते मग मस्त दोघी बाहेर जेवून आरामात घरी येवू. रुपाली हो चालेल बोलली.......


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत रुपालीला हे सर्व सांगितल्यावर ती काय बोलते ते...)


लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
0

🎭 Series Post

View all