Login

आयुष्याच्या वळणावर - भाग - 5 ( अंतिम भाग )

aayushya
आयुष्याच्या वळणावर - भाग – ५ ( अंतिम भाग )


ठरल्याप्रमाणे अंजली रुपाली ला भेटायला कॉलेज ला गेली आणि तिथून त्या दोघी जेवायला एका हॉटेल मध्ये गेल्या. अंजली बोलली – रुपाली मला तुला काहीतरी सांगायचे आहे त्यावर रुपाली बोलली आई मला पण तुला काहीतरी विचारायचे आहे. अंजली मनातून घाबरली आणि मनातल्या मनात म्हणाली हिला नक्कीच जयंतबद्दल विचारायचे असणार....


आई ... मला हेच बोलायचं होत, कि मला जयंत काकाचं आपल्या घरी येणे आवडत नाही, माझ्या मैत्रिणी पण काहीबाही बोलत होत्या तुमच्या दोघांबद्दल.....मी माझ्या बाबांच्या जागी दुसर्या कोणाचा विचारही करू शकत नाही....तू जयंत काकांना सांग........ मी आता मोठी झाली आहे आणि मला हे तुमच्या दोघांच नातं पटत नाही आहे. अंजली तिची वाक्य ऐकून सुन्न झाली... तिला काय बोलावे हेच सुचेना.....दोघी घरी आल्या. अंजली ने रात्रभर खूप विचार केला आणि ती शेवटी एका निर्णयापर्यंत पोचली होती.


दोन दिवसांनी जयंत अंजली चा निर्णय ऐकण्यासाठी तिला भेटायला आला. अंजली त्याला म्हणाली माझ्या एकुलत्या एक मुलीच्या सुखासाठी मी एक निर्णय घेतला आहे. मी रुपालीच्या बाजूने विचार करायचे ठरवले आहे... मी हे लग्न नाही करु शकत... जयंत तिचा निर्णय ऐकून खट्टू झाला आणि पटकन तिथून निघून गेला.


अंजली तो गेल्यावर खूप रडली. पण रूपालीच आपल्या जगण्याचा आधार आहे तिच्याबाबतीत ती खूप हळवी झाली. तिच्या चांगल्या भविष्यासाठी स्वतच्या सुखाचा विचार करणे तिने बंद केले. अंजलीला मातृत्व निभावणे जास्त महत्वाच वाटलं.... अंजलीशी जयंत ने पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही...


अंजलीला मनातून वाटत असे कि एक मित्र म्हणून जयंत ची गरजेला चांगली साथ लाभली होती.. अशोक गेल्यावर कोणाशी तरी खूप बोलावेसे वाटे आपलं मन मोकळं करावस वाटे तेव्हा जयंत हजर असे. खूप वेळा रडावेसे वाटले पण जयंत ने सावरले....पण हि साथ निभावणे कदाचित नियतीला मान्य नव्ह्ते....


अंजली ने रूपालीच आपलं जग आहे, तीच शिक्षण करणे तीच चांगल्या घरात लग्न लावून देणे हे आपले आद्य कर्तव्य समजले.. अंजलीने तिचा बेकरीचा व्यवसाय चालूच ठेवला.......रुपाली चांगली शिकली, .... इंजिनीअर झाली.... अंजलीने तिच्या पंचविस्व्या वाढदिवसाच्या दिवशी तिला अशोक चं सत्य सांगितलं, ती खूप रडली......


रुपाली एका मोठ्या कंपनी जॉब ला लागली होती. अशोक चं सत्य कळल्यापासून ती अंजली ची खूप काळजी घेत असे. तिला जराही दुखवत नसे. आता त्या दोघींचं नात खूप छान झालं होत. सुख- दुख, त्या आता एकमेकींशी शेअर करू लागल्या होत्या......आई – मुलीच नातं आता मैत्रिणीसारखं होवू लागल होत.


रुपालीने दोन वर्ष जॉब केल्यानंतर तिच्याच ऑफिस मधल्या एका मुलाबरोबर तिचं प्रेम असल्याच आईला सांगितले. अंजली ने सगळी चौकशी केल्यानंतर सगळचं छान आहे हे बघून हो म्हंटले....


लग्न ठरले, लग्नमंडप सजला, वर्हाडी मंडळी जमली. समारंभ अगदी छान झाला.. रुपाली सासरी जाताना आईला बिलगून सारखी रडत होती.....एकीकडे सगळं चांगलं झालेल्याचा आनंद होता तर दुसरीकडे तिच्या वियोगाच दुख: होत..... अंजली ने मनातल्या मनात म्हंटल मी त्यावेळी माझ्या सुखापेक्षा रुपालीच्या भविष्याला प्राधान्य दिल ते बरच झालं.....त्यामुळेचं तर मी आज हे मातृत्वसुख अनुभवू शकले....

समाप्त...........

लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
0

🎭 Series Post

View all