एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एक. स्थळ मुंबई उच्च न्यायालय.न्यायमूर्ती सुचेता जाधव स्थानापन्न झाल्या. त्यांनी एकवार कोर्टात नजर फिरवली आणि निकाल वाचायला सुरुवात केली.
समोर आलेले पुरावे आणि साक्षीदार यावरून हे कोर्ट असा निर्णय देत आहे की इंदुमती प्रधान मानसिक विकृत असून त्यांच्या नवऱ्याने केलेले आरोप सत्य असल्याने न्यायालय त्यांना मनोरुग्णालयात ठेवण्याचा आदेश देत आहे. तसेच त्यांची मुलगी वासंती हिला सांभाळायची तयारी इंदुमती यांच्या माहेरच्या लोकांनी दाखवली आहे आणि त्याला इंदुमती यांच्या नवऱ्याची देखील सहमती असल्याने वासंतीचा ताबा तिच्या आजी आजोबांकडे देण्यात येत आहे.
निकाल पूर्ण वाचून न्यायमूर्ती थांबल्या. निर्विकार चेहऱ्याने कोर्टात उभ्या असलेल्या इंदुमतीकडे बघून त्यांना गहिवरून आले. तरीही आपल्या पदाचे भान राखत त्या वेगाने तिथून बाहेर पडल्या.
इंदू कोर्टाच्या आवारातून स्वतः चालत गाडीकडे निघाली. दुरवर दोन चिमुकले डोळे तिच्याकडे बघत होते. ती एकदातरी आपल्याकडे बघेल ह्या आशेने. इंदुमती सरळ गाडीत जाऊन बसली आणि धाडकन दार बंद झाले.
"रुस्तम चल गाडी चालू कर."
आशाबाई भारदस्त आवाजात म्हणाली. त्याबरोबर वेगाने गाडी कोर्टाच्या आवारातून बाहेर पडली.
आशाबाई भारदस्त आवाजात म्हणाली. त्याबरोबर वेगाने गाडी कोर्टाच्या आवारातून बाहेर पडली.
सुचेता मॅडम आपल्या चेंबरमध्ये आल्या. दोन क्षण सुन्न होऊन त्यांनी डोळे मिटले. तितक्यात नयना आत आली.
"शेवटी शंभर पुन्हा एकदा आपण हतबल ठरलोच."
नयना चिडली.
" आपण कायद्याच्या चौकटीत बंदिस्त आहोत नयना."
सामान आवरत सुचेता मॅडम म्हणाल्या.
नयना चिडली.
" आपण कायद्याच्या चौकटीत बंदिस्त आहोत नयना."
सामान आवरत सुचेता मॅडम म्हणाल्या.
"सुचेता एक मध्यमवयीन संस्कार असलेल्या मुलीकडून हे सगळं घडू शकेल का?"
नयना अजूनही निराश होती.
नयना अजूनही निराश होती.
अखेरीस दोघींनी कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये चहा घेतला आणि घरी निघाल्या.
"आज नवीन पेशंट येणार हाय. चार जणी तयार रहा. उगा तमाशा नग."
पचकन भिंतीवर थुंकत राधा ओरडली.
पचकन भिंतीवर थुंकत राधा ओरडली.
" न्हायत काय. मागच्या टायमाला हिच्या हाताला चावली ती संगी."
दुसरी एक दात विचकत हसली.
दुसरी एक दात विचकत हसली.
तितक्यात गाडीचा आवाज आला आणि सगळ्या बाहेर धावत निघाल्या.
"आशे वड बाहेर तिला. उगा टाईम नग घालवू."
राधाबाई खेकसली.
राधाबाई खेकसली.
"राधे,जरा दमान."
एक जळजळीत नजर टाकून आशाबाई दरवाजा उघडायला गेली.
एक जळजळीत नजर टाकून आशाबाई दरवाजा उघडायला गेली.
चौघीजणी तयारच होत्या. इंदुमती अगदी शांतपणे स्वतःच खाली उतरली. तिने एकवार खोल श्वास घेतला आणि शांत पावले टाकत आत निघाली.
हे मनोरुग्णालय तिच्यासाठी स्वातंत्र्य होते. रोज त्या जनावराच्या तावडीत मरण्यापेक्षा इथलं जगणं नक्कीच चांगलं असणार. आत पावले टाकताना इंदूचे विचार मात्र थांबत नव्हते. बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहणारी भोळी भाबडी इंदुमती आज ह्या इस्पितळात निर्विकार चेहऱ्याने प्रवेश करत होती.
घरी येताच इंदुमतीच्या आई बाबांचा धीर सुटला.
"काय पाप केले होते माझ्या पोरीने म्हणून तिच्या नशिबी असले भोग आले?"
इंदूची आई नातीला छातीशी धरून रडत होती. तर सात वर्षांची लहानगी वासंती बावरून गेली होती. आपले बाबा आता आपल्याला आणि आईला मारणार नाहीत याचा आनंद तिला झाला होता. पण आपल्या आईला कुठे नेले हे मात्र समजत नव्हते.
गेले चार महिने ती तिच्या आजी आजोबांकडेच होती.
"आजी मला परत नको नेऊ तिकडे. मला मारून टाकतील ते."
वासंती असे म्हणताच तिची आजी तिचे डोळे पुसत म्हणाली,"आजपासून आम्हीच तुझे आई आणि वडील."
एक वेगळाच निर्धार त्यांच्या डोळ्यात दिसत होता.
एक वेगळाच निर्धार त्यांच्या डोळ्यात दिसत होता.
"ये चल लवकर."
राधाने इंदुमतीला मागून ढकलले.
इंदुमती चालत रिकाम्या खोलीजवळ थांबली. पेशंट नंबर दोनशे पाच. आजपासून तिची ओळख बदलली होती. इंदुमती सरळ खोलीत जाऊन एका कोपऱ्यात बसली. रात्र व्हायला आली आणि इंदुमती उठली.
खोलीच्या खिडकीजवळ जाऊन ती बाहेर इशारे करू लागली.
"अय चिकणे, चलता क्या बहोत मजा देगी."
आशाबाई तिच्याकडे बघतच राहिल्या.
आशाबाई तिच्याकडे बघतच राहिल्या.
अचानक तिच्या डोळ्यात भीती दाटून आली.
" नका हो,मला त्रास होतो हे सगळं नाही आवडत मला."
जोरात ओरडत इंदुमती आपले डोके भिंतीवर आपटू लागली.
जोरात ओरडत इंदुमती आपले डोके भिंतीवर आपटू लागली.
डॉक्टर धावतच पोहोचले. तिला झोपेचे इंजेक्शन देऊन डॉक्टर बाहेर पडले.
"आशा,थोडे लक्ष ठेव तिच्याकडे."
आशाबाई होकारार्थी मान हलवून तिथेच थांबल्या.
"आशा,थोडे लक्ष ठेव तिच्याकडे."
आशाबाई होकारार्थी मान हलवून तिथेच थांबल्या.
"सुचेता, इतकी अस्वस्थ कधीच नसतेस तू? काय झाले?"
घरी आल्यावर सासूबाईंनी विचारले.
"आज इंदुमती खटल्याचा निकाल दिला."
सुचेता म्हणाली.
सुचेता म्हणाली.
"तुला खरं सांगू कायदा काहीही म्हणत असेल पण एक बाई म्हणून मला यात काहीतर विसंगती वाटते. एक मध्यमवयीन विवाहित स्त्री असे उघड वागेल का? तेही पदरात एक मुलगी असताना?"
गेले काही महिने सुचेता ह्या खटल्याने अस्वस्थ होती.
"तेच मला समजत नाहीय आई. एक चांगला कमावणारा नवरा, सोन्यासारखी मुलगी आणि छान संसार असताना ती अशी का वागत असेल? ती कोणालाही काहीच सांगत नाही. साक्षीदार म्हणून शेजारी दिसले ते सांगतात. कायद्याच्या दृष्टीने ती नक्कीच दोषी आहे. तरीही माझे मन अस्वस्थ आहे."
सुचेता आज बऱ्याच दिवसांनी मनातील अस्वस्थ विचार बोलून दाखवत होती.
एक खळबळजनक खटला संपला होता. पब्लिक हॅव वेरी शॉर्ट मेमरी.
ह्या न्यायाने लवकरच हा खटला विस्मृतीत जमा झाला. पण काळ कोणालाही क्षमा करत नाही.
काय असेल भविष्यात काळाच्या उदरात दडलेले हाच विचार करत सुचेता मॅडम झोपायला गेल्या.
साल दोन हजार पंचवीस. पत्रकार रागिणी काळे गाजलेल्या काही खटल्यावर नजर टाकत असताना तिची नजर एका ठिकाणी स्थिरावली.
एका विवाहित स्त्रीला मनोरुग्ण ठरवून झालेली शिक्षा. वरवर बघता ह्यात काहीच वावगे नसले तरी संपूर्ण बातमी वाचत असताना हा खटला वेगळा असल्याची जाणीव रागिणीला झाली.
आपल्या काळाच्या पडद्याआड सिरीज साठी ह्यावर काम करायचे ठरवून रागिणी बाहेर पडली.
इंदुमती आता कुठे असेल?
रागिणी सत्य शोधू शकेल का?
इंदूच्या मुलीचे काय झाले असेल?
रागिणी सत्य शोधू शकेल का?
इंदूच्या मुलीचे काय झाले असेल?
वाचत रहा
भासती सत्य आभास जे
भासती सत्य आभास जे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा