अभय, आम्लेट आणि आठवणी ©®विवेक चंद्रकांत...
आज खूप खूप जूनी आठवण आली. तेव्हा जेव्हा मी डिग्री घेऊन व्यवसाय सूरू करण्यासाठी जमवाजमव करत होतो. तेव्हा वडिलांची जूनी जावा गाडी होती. ती त्यांनी मला वापरायला दिली होती. ( त्यांनी नुकतीच बजाज स्कूटर घेतली होती ) मी ती गाडी घेऊन शाईन मारत फिरायचो.
आम्ही तीन मित्र होते. मी, अभय आणि सूर्यकांत (त्याला आम्ही कांता म्हणायचो.) कांता graduate होऊन बेकार होता, त्याचे वडील pwd त होते. तर अभयचे वडील शिक्षक. आमच्यात सगळ्यात आधी अभयलाच नौकरी लागली. तो clerk म्हणून सरकारी ऑफिसला लागला. तो औरंगाबादला लागला. तो तसा धडपड्या. त्यावेळी शनिवार अर्धा दिवस सुटी असायची आणि रविवारी पूर्ण दिवस. पण अभय बॉस ला पटवून शुक्रवारी रात्रीच घरी यायचा आणि सोमवारी पहाटे जायचा. दोन दिवस तो आमच्या सोबत राहायचा.
ते दोन दिवस आम्ही खूप enjoy करायचो. गाडी माझ्या एकट्याकडे होती. त्या jawa वर आम्ही तिन्ही खूप फिरायचो.(त्याकाळी पोलीस ट्रिपलसीट वै. फारसे बघत नसत.)तेव्हा वय असेल.. 22-23. घरचे संस्कार कडक असल्याने मौजमजा म्हणजे भजे, चहा, icecream एवढेच.
अभयला नौकरी असल्याने त्याच्या खिशात पैसा खुळखुळत असे. मग आम्ही jawa घेऊन खूप फिरायचो. आजूबाजूला 5-10 किलोमीटर पर्यंत चक्कर टाकणे. कुठले मंदिर बघणे. टेकडीवरील देवस्थान पाहणे हे करायचो. एकदा 30 किलोमीटरवर जंगल होते तिथेही जाऊन आलो.
एकदा रविवारी अभय म्हणाला, चाल जरा मजा करू. त्याने गावापासून दूर 10 किलोमीटर वर एका आतल्या ठिकाणी नेले. तिथे हॉटेल होते.
" विवेक,चल आज बिअर घेऊ." आमच्या दोघांच्याही (मी आणि कांता )छातीत धडधडू लागले.आम्ही बिअरचे नावच ऐकले होते. थोडायचं वेळात बिअर आली. गोल्डन इगल. आम्ही धडधडत्या हृदयाने एक एक घोट घेतला.कडूच लागली ती.
" विवेक,चल आज बिअर घेऊ." आमच्या दोघांच्याही (मी आणि कांता )छातीत धडधडू लागले.आम्ही बिअरचे नावच ऐकले होते. थोडायचं वेळात बिअर आली. गोल्डन इगल. आम्ही धडधडत्या हृदयाने एक एक घोट घेतला.कडूच लागली ती.
"थांबा रे नुसती पिऊ नका. सोबत काहीतरी घ्या. अरे आम्लेट लाना."
आम्ही तिन्ही ब्राह्मण... नॉनव्हेज चे नावही घरात चालत नसे... आणि हा भाऊ आम्लेट सांगतोय? अर्थात आम्लेट येईपर्यंत बिअरचा हलका नशा चढला होता.त्यामुळे थ्रीलिंग वाटतं होते. आम्लेट फारच स्वादिष्ट वाटले. पैसे देणारा एकटा अभयच असल्याने 1 बिअर आणि 1 double आम्लेतमध्ये आम्ही तिघांचे वाटप केले.प्रत्येकाच्या वाटेला असे कितीसे येणार? पण ती नशा आणि आम्लेटची ती चव अजूनही आठवणीत आहे. पण हे कमी की काय अभयने सिगारेट मागवली. सिगारेटला मात्र मी आणि कांताने स्पष्ट नकार दिला. येतांना माझी jawa जमिनीपासून अर्धा फूट वरती चालत आहे असे वाटतं होते.
आम्ही तिन्ही ब्राह्मण... नॉनव्हेज चे नावही घरात चालत नसे... आणि हा भाऊ आम्लेट सांगतोय? अर्थात आम्लेट येईपर्यंत बिअरचा हलका नशा चढला होता.त्यामुळे थ्रीलिंग वाटतं होते. आम्लेट फारच स्वादिष्ट वाटले. पैसे देणारा एकटा अभयच असल्याने 1 बिअर आणि 1 double आम्लेतमध्ये आम्ही तिघांचे वाटप केले.प्रत्येकाच्या वाटेला असे कितीसे येणार? पण ती नशा आणि आम्लेटची ती चव अजूनही आठवणीत आहे. पण हे कमी की काय अभयने सिगारेट मागवली. सिगारेटला मात्र मी आणि कांताने स्पष्ट नकार दिला. येतांना माझी jawa जमिनीपासून अर्धा फूट वरती चालत आहे असे वाटतं होते.
मग दर रविवारचा हा कार्यक्रमच झाला. चारपाच रविवार पूर्ण करतांना प्रत्येकी 1 बिअर आणि प्रत्येकी 1सिंगल आम्लेट अशी आमची प्रगती झाली.अर्थात अभयवर पूर्ण भार पडू नये म्हणून आम्हीही थोडेफार पैसे आणू लागलो.मात्र हे फार दिवस चालले नाही.एकदा सिगारेट पेटवतांना अचानक हवेची झुळूक आली आणि ठिणगी थेट अभयच्या डोळ्यात उडाली.डोळा सुजला... पाणी गळायला लागले. आमचे तर धाबेच दणाणले, त्याकाळी कुठले eye specialist वैगरे? एका ओळखीच्या डॉक्टरांना दाखवले. त्यांनी औषध टाकून डोळा पट्टी लावून बंदच करून टाकला. दोन दिवस पट्टी ठेवायला सांगितली.आता अभयच्या घरी काय सांगणार? तरीही आम्ही त्याच्या घरी 'मंदिरात गेलो होतो आणि अगरबत्ती लावतांना हे झालं'असे सांगितले. त्याच्या घरच्यांचा कितपत विश्वास बसला का ते समजले नाही पण ते आम्हांला काही बोलले नाही.(त्याच्या आईला मात्र खूप काळजी वाटली होती )पुढच्या रविवारी त्याच्याकडे जायची हिम्मत च झाली नाही. त्यातच त्याच्या लग्नासाठी त्याच्याकडे दर रविवारी कुणी ना कुणी मुली दाखवायला घेऊन येऊ लागले.
इकडे कांताच्या वडिलांची बदली झाली आणि आठच दिवसात तोही निघून गेला.आणि आमचे बिअर आम्लेट प्रकरण कायमचे संपले.
.कांता नंतर कुठे गेला त्याचा पत्ताच लागला नाही. ( तेव्हा मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअँप नव्हते.) अभय लग्नानंतर औरंगाबादला होता , तोपर्यंत तो किमान अधूनमधून पत्र पाठवायचा.नंतर तो बंगलोरला शिफ्ट झाला आणि त्याचा संपर्क तुटलाच.
मीही माझ्या व्यवसायात .व संसारात व्यस्त झालो.. पण एकदा अनपेक्षित पणे माझ्या मोबाईल वर अभयचा फोन आला.
मीही माझ्या व्यवसायात .व संसारात व्यस्त झालो.. पण एकदा अनपेक्षित पणे माझ्या मोबाईल वर अभयचा फोन आला.
", हॅलो, विवेक का?" मला एकेरी हाक मारणारे खूप कमी राहिले होते.
"कोण?"
"अरे मी अभय बोलतोय.. कसा आहेस? आताच तुझा नंबर मिळाला आणि लगेचच तुला फोन केला.."
"मी मजेत बाबा."
आम्हांला दोघांनाही काय बोलू नी किती बोलू असे झाले. खूप गप्पा, घरची माहिती सांगितल्यावर तो म्हणाला
"आता ये बंगलोरला, मस्त मोठा फ्लॅट आहे, कार आहे., चार दिवस सगळे बंगलोर फिरवतो तुला. सगळी प्रेक्षणीय स्थळें दाखवतो, खाउपिऊ घालतो मस्त साऊथ इंडियन पदार्थ..ड्रिंक घेतो ना?"
"नाही रे बाबा. तुझ्याबरोबर कितीतरी वर्षांपूर्वी बिअर घेतलेली तेवढीच."
"अरे या वेळेस एकदम बढिया मागवू.. आता नक्की ये. यार. खूप दिवसात जुन्या मित्रांसोबत गप्पा मारल्या नाही. कांताचा काही पत्ता?"
" नाही माहित रे. पण तूच ये आता गावी. Jawa राहिली नाही पण मी आहे, घरही तेच आहे. "
" बघू.गावी आता कोणीच राहिले नाही रे. तू नक्की ये. मी वाट बघतो."
खूप आनंद झाला होता. त्याचं दिवशी संध्याकाळी मी opd काढत होतो. पुन्हा अभयचा फोन. सकाळीच तर बोलून झाले.. आता काय?
"बोल अभय."
"डॉ. विवेक वैद्य?" अपरिचित आवाज आला
"बोला "
" मी अभयचा लहान भाऊ बोलतोय. अभय दुपारी हार्ट अटॅकने गेला. उद्या सकाळी 10 वाजता अंतिम क्रिया होईल. "
वज्रघात कसा असतो हे मला त्यावेळी कळाले. गोष्ट खरी नसावी असे वाटले. छाती भरून आली. डोळ्यातून पाणी वाहू लागले.पण opd त होते. जेमतेम भावनावर नियंत्रण ठेवत पेशंट काढले. घरी आल्या आल्या बाथरूम मध्ये शिरलो आणि अश्रूना वाट करून दिली.अचानक जाणवले की आता वय होत चालले आहे. वरतून बोलावणे कधीही येऊ शकते.आपण आयुष्याला खूप गृहीत धरतो का?
रात्री शांतपणे विचार करत बसलो. कांताला शोधणे एवढे काही अवघड नाही आजच्या काळात.आमच्या कॉलनीत नुकतेच pwd मधून (आताची B&C) उच्च पदावरून रिटायर झालेले एक गृहस्थ राहायला आले आहेत. त्यांना भेटतो. कांताच्या वडिलांचा पत्ता मिळेल. कांताचा ठावठिकाणा कळेल.
आता jawa नाही. ते हॉटेलही नसावे बहुतेक. तरीही एखाद्या हॉटेलच्या कुठल्यातरी निवांत कोपऱ्यात बसू. दोन गोल्डन इगल आणि दोन आम्लेट घेऊ...........आणि एकमेकांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडू.......
©®डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
©®डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा