अबोल प्रीत बहरली (भाग दोन)
अबोली ने खिडकीतून पाहिले, बाहेर तो रश्मि बरोबर हसुन बोलताना दिसला.
तो निघून गेला रश्मिनं आत येऊन हसत हसत 'अशी कशी पडली? प्रेमात तर नाही ना?' तिनं हळूच अबोलीच्या जवळ जात विचारले?
'काहीतरी काय, तो कुठे आणि मी कुठे ?'
'असं काही नाही.'
अबोलीची आई आत येऊन रश्मीला म्हणाली 'कोण आहे हा?'तुझी ओळख आहे?
'हा आदित्य साठे, आमच्या तरंग गाण्याच्या ग्रुप मध्ये येतो. खूप छान गातो आम्ही एक डूएट ही गायलं होतं एकदा .
बँकेत नोकरी आहे, घरी आई बाबा व एक बहीण.'

'अरे वा छान स्थळ आहे अजून लग्नाचा आहे?' काकू आनंदून म्हणाली.
'हो खूप मुली मागे आहेत त्याच्या'.
—----
पण कोणीतरी आहे वाटतं त्याची, असं वाटतं. तो कधी बोलला नाही, पण अंदाज आहे थोडासा.'

हे सर्व अबोलीच्या कानांवर येत होतं. मनाला कितीही समजावलं, तरी दुखावलं गेलं.
कशी असेल ती…...?
नक्कीच स्लिम ट्रिम ,उंच ,स्मार्ट …...
समोरच्या आरशात स्वतःला पाहायचं तिला धाडसच झालं नाही मग.
रात्री किती वेळ ती सारखी कूस बदलत होती.

दोन दिवस लागले पाय बरा व्हायला.
'अग आज वाॅक ला नाही गेली' आई ने विचारले सुद्धा.
पण आतून आता फिरायला जावेसेच वाटेना

काय सांगू आई ला, उगाचंच बागेत आदित्य भेटेल आणि मग या वेड्या मनाला सावरणं कठीण होईल.
'अबोली तुझा फोन केव्हाचा वाजतोय'.
'कोणाचा आहे आई?' अबोली पेंटिंग चे सामान आवरत होती, या दोन दिवसात तिने एक सुंदर लॅडस्कॅप चितारल होत.
'माझी भाजी करपते तूच पहा' म्हणून आई तिला फोन देऊन गेली.
'हॅलो, कोण?

तिकडून 'मित्राला किती वाट पाहायला लावणार आहे? पाय बरा आहे ना?'
'अणि हो….बागेतली फुले ही वाट पाहत कोमेजून गेली.'

'इश्य्य, काहीतरीच काय,' अबोली लाजून लाल झाली.
'बघ तुझं ते लाजण वगैरे नंतर, 'उद्या तू येत आहेस…. ,अस मधेच व्यायाम स्किप करणं बरोबर नाही. मी वाट पाहीन 'म्हणत आदित्य नी फोन कट केला.'
अबोली च हृदय आनंदाने जोरा- जोरात धडधडत होतं. कधी सकाळ होते नी ती
आदित्यला भेटते, असे तिला झाले.
मनातल्या मनात ती गुणगुणायला लागली"युंही कोई मिल गया,सरे राह चलते चलते'"
आता मनाच्या कॅनवास वर प्रेमाचे रंग पसरू लागले .सगळीकडे नुसती गुलाबी रंगाची उधळण होत होती. भेटी वाढत होत्या आता मनाला आवरण अशक्य वाटत होते.
आई जवळ बोलावे कां? पण इतक्यात नको, असे ठरवून अबोली तिच्या पेंटिंग क्लास ला गेली .
दोन दिवस खपून तिने एक सुंदर पोर्ट्रेट काढलें होते .पण त्यात तिला काही तरी मिसिंग आहे हे जाणवतं होते. पण काय ते कळत नव्हते.
ती पेंटिंग घेऊन रश्मि कडे आली.तिथे आदित्य बसलेला होता.
'अरे वा किती सुंदर युवती काढली आहे ग' रश्मि चित्र पाहून म्हणाली.
'हो….. पण यात एक कमतरता आहे' आदित्य म्हणाला.
'हो ना मला सर पण म्हणाले होते तूच ओळख पण काय ते मला उमजत नाही.'

'द्या ब्रश .'
अबोली ने ब्रश व कलर पैलेट देताच आदित्य ने त्या सुंदरी च्या काळ्याभोर केसांमध्ये लाल रंगानी शेंदूर भरला व अबोली कडे सहेतुकपणे पहात हसला. आता चित्रं खरोखरच उठावदार दिसत होते.
अबोली च्या गालांवर लज्जेची लालिमा पसरली.ती पेंटिंग घेऊन खोलीत पळाली.
गोल गोल गिरकी घेत गुणगुणायला लागली. 'तू माझा…. तुझी मी झाले'

.बाहेर हाॅल मधे रश्मि आणि आदित्य युगल गीताची तयारी करत होते. त्या गाण्याचा स्वरां मधे अबोली आपला स्वर मिसळायचा प्रयत्न करू लागली.
रात्री जेवताना रश्मि ने सांगितले की तिला गाण्याची तालीम करायला कला विथिका मध्ये जावे लागेल तेव्हा यायला उशीर होईल. आदित्य असेलच.आता रोजच रश्मि उशिरा घरी येत असे. तिला सोडायला आदित्य येत असे. घरात आल्यावर ही रश्मि गाणे गुणगुणत असे तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच नूर दिसे. अबोली खिडकीतून त्याला पहात बसे.
दोन दिवसांनी तरंग ऑडिटोरियम मधे कार्यक्रम होता. दोघेही ते युगल गीत तिथे गाणार होते.
अबोली,आई व काकू तिच गाणं ऐकायला गेल्या.
आदित्य आणि रश्मि दोघांची जोडी खूप छान दिसत होती. गाणे तर खूप छानच झाले. दोघेही गातांना एकमेकांकडे ते प्रेमाने पहात होते आणि गात होते.
"गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना.
थांब ना…...
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे.

थांब ना…..
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना.
थांब ना…….
तोल माझा सावरू दे, थांब ना.
थांब ना…….
तोल माझा सावरू दे, थांब ना.
थांब ना….. ,
थांब ना."
गाणे खूप च गाजलेलं होतं, दोघांनी छान गायले..मागे बसलेल्या बायका आपसात बोलत होत्या,"जोडी छान आहे नाही……"
ते सर्व ऐकून, पाहून अबोलीला खूप नर्वस वाटू लागलं.
घरी जाताना आई म्हणाली पण -- 'दोघांची जोडी खूप छान दिसते, विचारावे कां आपण ह्यांच्या घरच्यांना?' काकू म्हणाली.
'हो, खरंच की ! रश्मि आवडेलच त्यांना.'
घरी आल्यावर आईने रश्मी ला विचारले 'आदित्य कसा वाटतो तुला ?'
'छान आहे, मला ठाऊक आहे त्याची आवड काय आहे..'
ज्याने त्याने, त्याचा अर्थ, आपापल्यापरी ने काढला.
दुसऱ्या दिवशी आदित्य घरी आला तो आईस्क्रीम घेऊनच, गाण्याच सक्सेस सेलिब्रेशन म्हणून. रश्मि घे तुझ्या आवडीचा चॉकलेट आईस्क्रीम आणलाय.
आई, काकू ला ही त्याने आग्रहाने खायला लावले.
अबोली ला इच्छा तर होत होती. पण इतके दिवस जे निग्रहाने टाळले तेच समोर हजर!
'नाही नको मला.' ती म्हणाली .
'अग हे स्पेशल तुझ्या साठी शुगर फ्री आणले आहे' आदित्य तिच्या हातात कप देत म्हणाला.
किती काळजी घेतो, मनातून अबोली सुखावली.

एक दिवस काकू घरी आली ,ती खूप आनंदातच ! घरी आल्यावर आईला म्हणाली 'वहिनी मी भेटून आले साठ्यांच्या घरी त्यांना बायोडाटा देऊन आले आहे. छान लोक आहेत '
------
आदित्य आला तो आपल्या आई-बाबांना घेऊनच. रश्मी तयार होती. 'अबोली तू तयार हो ना.'चल आज मी तुला तय्यार करते
'मी कशाला ग तयार व्हायचे उगाच? तो तर तुला पाहयला येत आहे. तू बाकी छान दिसते आहेस '
वेडा बाई, प्रेम ही करते पण,-- राहू दे होऊ दे गम्मत थोडीशी
' रश्मि मनात पुटपुटली.
हाॅल मधे आदित्य आणि रश्मि मन मोकळेपणाने बोलत होते. अबोली ने हळूच एकदा आदित्य कडे पाहिलं पण त्याचं लक्ष भिंतीवरच्या नव्या लावलेल्या पोर्ट्रेट कडे होते.काकू आणि आई दोघीही खूप उत्साहात होत्या.चहा फराळ झाला.
'काय आदित्य, तुझ्या कडून होकार आहे ना ' आदित्यच्या बाबांनी विचारले.
'अर्थातच…...पण तिला विचारलं कां?'
'अहो इतका चांगला सोबती मिळण भाग्याची गोष्ट आहे.' काकू म्हणाली.
'मग काय म्हणताय, दोन्ही कडून होकार समजावा,' असे म्हणत आदित्यच्या आई म्हणाली. तोंड गोड करते मी माझ्या सुनेचं.

'तुम्हाला आवडली आहे न?'
'हो तर! छानच, आदि ची आवड तिच आमची सुद्धा'
पेढ्याचा बॉक्स उघडून, हातात पेढा घेऊन त्या अबोली समोर उभ्या झाल्या. अबोली रश्मीकडे पाहू लागली.
'अगं, आ कर' रश्मिने तिला हलवलं.
'तुला मागणी घातली आहे आदि ने.तुलाही आवडतो ना? रश्मि ने तिला चिमटा काढत विचारले.
अबोलीने आदित्य कडे पाहिले त्याने हसून होकारार्थी मान हलवली. अबोलीने बावरून आईकडे पाहिले 'अग, घे पेढा त्या तुला मागणी घालतात आहे .
तुलाही आवडतो आम्हालाही ठाऊक आहे.'

सगळ्या प्रसंगाने लाजून लाल झालेल्या अबोलीला पेढा अधिकच गोड लागला.
-------------------------------समाप्त
लेखन ...सौ.प्रतिभा परांजपे
-------------------------------समाप्त
लेखन ...सौ.प्रतिभा परांजपे