ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 3)

Introduction of mira

समीर त्याच्या बॉसच्या केबिन बाहेर आला की समोरच त्याला मीरा दिसली.... तीला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.... कसेबसे त्याने ते पुसले आणि तिथून रजा घेतली.... 

मीरा समीरची सहकारी पत्रकार होती.... ती त्याच्या विश्वासू पत्रकारांमध्ये होती.... खरं पाहिलं तर मीरा ही समीरची कॉलेज पासूनची मैत्रीण होती.... दोघांनीही जर्नालिजम सोबतच केले होते.... 

मीरा म्हणजे दिसायला अगदीच सुंदर, लोभस डोळे, गहूवर्णीय, कुरळे केस सतत हसतमूख असणारी अशी होती....

मीरा समीरला पुरती ओळखत होती त्यामुळे तिने समीरला स्पेस देण्यासाठी ती त्याच्या मागे मागे गेली नाही... 

मीराचं खूप प्रेम होतं समीरवर पण तेही अव्यक्त होतं... समीरला या गोष्टीची पुसटशी देखील कल्पना नव्हती... 

मीरा समीरजवळ तीचे प्रेम व्यक्त करणारच होती की तीला समीरनेच सायलीबद्दल सांगितले....

 मीरा पुरती कोलमडून गेली... पण ती मनापासून प्रेम करायची समीरवर... तिने तीचे त्याच्यावर प्रेम आहे याची समीरला बिलकुल जाणीव होऊ दिली नाही ...... 

ऑफिसमध्ये देखील मीरा एकदम महत्वाची सहकारी म्हणून वागायची....

अगदीच छोटया छोटया गोष्टींकडे लक्ष द्यायची.... समीरचे खाणं पिणं वेळेवर होईल याचा प्रयत्न करायची.... त्याच्यासाठी स्वतः डब्बा बनवून आणायची... 

 समीरला देखील तिची खूप सवय झाली होती...

समीरला  प्रत्येक कामामध्ये मीराची मदत लागत असे... समीर तीला आपली बेस्ट फ्रेंड मानायचा.... 

छोटया छोटया गोष्टी तिच्यासोबत share करायचा....

फक्त सायली बद्दल मात्र जोपर्यंत तिच्या घरच्या लोकांचा होकार येत नाही म्हणून मीराला थोडं उशीरा सांगितले होते.... 

मीरा मात्र समीरवर कॉलेजमध्ये असल्यापासूनच प्रेम करायची पण तिने ते कधी व्यक्त केले नाही..... 


समीरला या दुःखातून आपणच लवकर बाहेर काढू असा मनाशी पक्का निर्णय घेऊन ती आपल्या रोजच्या कामाला लागली..... 

ऑफिस काम आटोपल्यावर मीराने समीरला फोन केला.... तिने त्याला कॉफी शॉप मध्ये भेटायला बोलावले... समीर घरीच होता.... 

सतत सायलीचा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता....

समीरची तशी कॉफीशॉप मध्ये जाण्याची खास इच्छा नव्हती पण तिच्याकडे थोडं मन मोकळं करता येईल या हेतूने समीर मीराला भेटायला गेला.... 

मीरा आणि समीर भेटले... मीराला भेटताच समीरच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले.... 

समीर :हे काय होऊन बसलं गं मीरा?? माझी सायली मला सोडून गेली... सुखी संसाराची किती स्वप्ने रंगवली होती आम्ही... त्या देवाला कसच काही वाटलं नाही?? 

मीरा :समीर तू आधी शांत हो... समोर असलेला टिशुपेपर समीरच्या हातात देऊन मीरा म्हणाली आधी ते तूझे डोळे पूस.... 
समीरने डोळे पुसले 

तितक्यात मीराने तिथल्या वेटरला दोन कॅपेटिनो ऑर्डर केले.... 

मीरा :हे बघ समीर, दैवाच्या मर्जीपुढे कुणाचे काही चालले आहे का?? 

समीर :दैवाची मर्जी ?? कसली देवाची मर्जी??  मारलंय कुणीतरी माझ्या सायलीला.... 

मीरा:म्हणजे ?? तीचा अपघाती मृत्यू नाही?? 

समीर :मला तरी तसंच वाटतं. 

मीरा :हे बघ समीर जे काही आहे.... मी तूझ्या सोबत आहे...पण सध्या तू जास्त विचार करू नकोस... कारण जेव्हा आपण परेशान असतो ना तेव्हा आपण चुकीचीच दिशा निवडतो.... 

समीर : हो गं मीरा... मला तर काही सुचतच नाहीये... डोकं अगदीच सुन्न झालंय.... 

मीरा :मला उद्या ऑफिसमध्ये काहीच काम नाहीये... तुझं देखील विशेष असं नाहीये आपण कुठे outing ला जायचं ई ... थोडा तू फ्रेश होशील... हे बघ समीर तू नाही म्हणू नकोस.... 

समीर :ठीक आहे येतो मी... पण तरी आपण साडेदहाला जाऊ... त्या आधी मला इथली काही कामं उरकायची आहेत.... ती उरकून मग निघू 

मीरा : ठीक आहे तू म्हणशील तसं... तू तूझं काम झालं की कॉल कर... मी तयार राहते...असं म्हणत दोघांनी नुकतीच वेटरने आणलेली आपली आपली कॅपेटिनो संपवली.... 

विषय बदलण्यासाठी मीरा म्हणाली किती छान आहे ना कॅपेटिन?? ... मी आणि प्राचीताई नेहमीच येतो इथे.... 

समीर :प्राचीताई??  अच्छा आता आठवलं तूझी मोठी बहीण ना?? ... आपली कॉलेज ऑफिसमध्ये भेट झाली होती.... कशी आहे ती?? काय करते सध्या?? लग्न वगैरे झालं का?? 

मीरा :माझी ती ताई कमी आई जास्त आहे... मी दहा वर्षांची असेल तेव्हाच आई कॅन्सरने गेली.... वडील तर आधीच अपघातात गेले होते.... त्यानंतर आपल्यापेक्षा लहान मुलांचे ट्युशन घेऊन तिने आमच्या दोघींचा उदरनिर्वाह चालवला होता.... मला तिने तिच्या छत्रछायेखाली अगदीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं.... 

समीर :ग्रेट यार... तू खूप नशीबवाण आहेस..... चला खूप उशीर होतोय... आता निघूया.... उद्या outing साठी भेटू... 

असं म्हणून समीर आणि मीरा तिथून बाहेर निघाले....

कॉफ़ीशॉपच्या बाहेर पडते ना पडते तोच मीराच्या बाजूने एकदम भरधाव जीप आली... .. 

तिच्या मागे उभे असलेल्या समीरने पटकन तीला ओढले,नी जवळ घेतले.. .... मीराला एकदम फिल्मीstyle घडल्याचा भास झाला.... 

मीरा एकदम लाजली.... तिला समीरचा स्पर्श आणि त्याची ओढण्याची पद्धत खूप छान वाटली.. ... 

इकडे समीरने  मात्र त्या ड्राइव्हरच्या नावाने चारपाच शिव्या हासडल्या... 
क्रमश :
©®डॉ.सुजाता कुटे

🎭 Series Post

View all