ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 7)

About unknown motar cycle biker

समीर त्याच्या अल्टोमध्ये बसला.... त्याच्या घराकडे निघाला खरा पण कुठलीतरी कडी सुटत आहे असंच त्याला वाटायला लागलं..... 

समीर (स्वगत ) :अरे हो !आपल्या लक्षात कसं आलं नाही... अजित?? अजितचा आपण विचारच केला नाही...

अजितला सायली मिळणार नाही म्हणून तर त्याने सायलीला मारले नसावे ना?? पण त्याने कदाचीत आपल्यालाही त्रास दिला असता?? काहीच कळत नाही बुवा ... 
एकदा अजितची माहिती काढू,भेट घेऊन बघू.... काय म्हणतोय ते?? आणि तो पाठलाग करणारा आता त्याला युक्तीनेच गाठावे लागेल.....
विचार करत करत समीर घरी पोहोचला.... 

घरी पोहोचताच त्याला सायलीच्या ए.टी.एम.  चे डिटेल्स कळाले त्यातील नऊ वेळा...प्रत्येक वेळी दहा हजार एकाच ए.टी.एम... वरून काढले होते

एकदा दहा हजार शेवटच्या दिवशी सायलीचा अपघात झाला तिथून अगदीच पाचशे मिटर अंतरावर होते तिथून काढले गेले होते.... 

समीरला आपल्याला काहीतरी लिंक लागत आहे याचा अंदाजा आला.... 

म्हणजे सायलीला अगदीच प्लॅनिंगने मारलं असावं....

कोणाला फायदा होईल बरं सायलीला मारून... असा विचार करत करत थकूनच समीरला झोप लागली..... 

सकाळ झाली की समीरने त्याचा दिनक्रम ठरवला...

 आज त्या अजितची माहिती काढतो.... एकदा त्याची भेट घेतो.... बघुयात काय म्हणतोय ते?? ..... 

ह्या दोन्हीही ए टी एम ला भेट द्यावी लागेल.... आजूबाजूला कुठे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत का बघू आणि ते असतील तर आपल्याला हेही बघता येईल की पैसे काढताना सायली एकटीच होती की अजून कुणी सोबत होतं..... 

सगळा विचार करूनच समीर बेडवरुन उठला.... 

तयार होऊन अल्टो काढून पून्हा ए टी एम च्या दिशेने निघाला....

 आज जर पाठलाग करणारा माणूस दिसला तर त्याला पकडायचं.... 

फारच हूशार माणूस आहे हेल्मेट मुळे ओळखू पण येत नाही.... पण आज त्याला कसंही करून पकडायचंच.... असा विचार करत करत समीर एटीएम जवळ गेला.... 

समीर ए टी एम  च्या आसपास कुठे कॅमेरे आहेत का याचा अंदाजा घेऊ लागला....

ए टी एम केबिन मध्ये समीरने नजर फिरवली... 

ए टी एम मशीनच्या वरती सी सी टी व्ही कॅमेरा होता.... समीर तो पाहून खूप खूष झाला.... 

आता आपल्याला काहीतरी क्लू मिळेल या आशेने समीर बँकेत जाण्यासाठी निघाला.... 

समीरची गाडी हायवे वर येते न येते तोच पाठलाग करणारा मोटरसायकल स्वार समीरला कारमिरर मध्ये दिसला...

 आता समीरने नेहमीपेक्षा उलटे केले.... 

कारची स्पीड खूप वाढवली.... 

मोटरसायकल स्वार गाफिल होता त्याने देखील स्वतःची स्पीड वाढवली....

 आला ना गोत्यात समीर असं म्हणत मनोमन हसला.... समीरने अजून स्पीड वाढवली आणि एकदम बाजूच्या गल्लीत घुसला.... 

मोटरसायकलस्वारने देखील त्याची स्पीड वाढवली पण समीर एकदम नजरेआड झाल्याने गोंधळून गेला.....

 मोटारसायकलस्वाराची स्पीड एकदम कमी झाली आणि हिच संधी साधून समीरने स्वतः ची अल्टो एकदम त्या मोटार सायकल स्वाराला अडवली व झटकन बाहेर पडून त्या मोटार सायकल स्वाराला काही समजण्याच्या आतच समीरने त्याची कॉलर पकडली..... 

समीर : अरे तूला दोन तीन दिवसापासून पहात आहे मी.... का पाठलाग करत आहेस माझा..... 

मोटरसायकल स्वार : सर मला मारू नका.... सगळं सांगतो मी.... तूम्ही सायलीच्या अपघाताविषयी माहीती काढत आहेत ना....

समीर: चमकून, काय?? तूला हे सगळं कसं माहित?? कोण तू?? तू तर नाही मारलीस ना सायलीला??  आता मात्र समीर चांगलाच संतापला..... 

मोटरसायकल स्वार : सर असं चिडू नका.... मी नाही मारली हो सायलीला....माझं नाव शरद... मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे.... 

सायलीसोबत घातपात झाला आहे याचा संशय इन्स्पेक्टर इनामदारांना आलाय.... माझी ही पहिलीच केस असल्यामुळे मला त्यांनी फक्त तूमचा पाठलाग करून प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास सांगितली.... तूम्हाला न कळू देता.... 

समीर : हा काय फालतूपणा आहे.... म्हणजे उगाचच माझा पाठलाग करायचा... अच्छा नंतर क्रेडिट तूम्ही लाटायचं.... वाह काय डोकं चालवलय तुमच्या इनामदार साहेबांनी.... असं म्हणत समीरने इन्स्पेक्टर इनामदारला रागानेच फोन लावला.... 

इनामदार :फोनवर... बोला पत्रकार साहेब.. काय म्हणताय?? 

समीर : हा शरद कोण?? 

इनामदार : शरद??  

अच्छा तो नवीन डिटेक्टव्ह होय.... त्याची पहिली केस होती.... आमच्या पोलीस स्टेशन मध्ये तो काहीतरी शिकायला मिळेल या हेतूने आला होता... मग मीच म्हणालो की पत्रकार समीरचा पाठलाग कर आणि त्याच्या प्रत्येक हालचालीची माहीती ठेव.... आपोआपच सगळं शिकशील..... पण तूला डिस्टर्ब न करता.....

क्रमश :

©® डॉ.सुजाता कुटे

🎭 Series Post

View all