ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 12.... अंतिम )

Prachi's confession

प्राचीला इन्स्पेक्टर इनामदारांनी फोन डिटेल्स चा पुरावा आणि चाचे लोकांची कबुली असल्याची छोटी व्हिडीओ क्लिप दाखवली.... 

त्यामुळे प्राचीने कुठलाही विरोध केला नाही..... 

प्राची शांतपणे पोलिसांसोबत गेली....

तिने वाद घातला नाही....

कदाचीत कधी ना कधी आपण केलेला गुन्हा उघडकीस येईल असंच तीला वाटत होतं.... 

इनामदार प्राचीला पोलीस स्टेशनला घेऊन आले.....इनामदार येण्याच्या आधीच मीरा, शरद आणि समीर तिथे पोहोचलेले होते... 

प्राचीने मीराला पाहीले... तिला पाहताच प्राचीचे अश्रू अनावर झाले... मीराचा चेहऱ्यावरचा हावभाव प्राचीने टिपण्याचा प्रयत्न केला.... 

मीरा रागात प्राचीकडे बघत होती... तरी देखील हे खोटंच निघावं.... वाईट स्वप्न निघावं,  असच तीला मनोमन वाटत होतं.... 
मीरा समीर आणि शरद तिघांच्याही नजरेत प्रश्नार्थक चीन्ह होते.... 

इन्स्पेक्टर इनामदार यांनी साक्ष नोंदवायला सुरुवात केली... 

प्राची :मी हे जे काही केलंय ते मी माझ्या बहिणीसाठी केलंय.... मीरा कडे पाहून प्राची बोलली.... 

इनामदार : बहिणीसाठी?? मॅडम तूम्ही एक मर्डर केला आहेत... कळतं का तूम्हाला?? .. 

हे ऐकताच प्राची रडू लागली.... 

मीरा मात्र पुरती गोंधळली.... आणि प्राचीला म्हणाली... प्राचीताई तू हे काय बोलत आहेस?? 

प्राची : इनामदार सर, माझं माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे...ती दहा वर्षांची होती तेव्हा माझी आई कॅन्सरने गेली आणि वडीलतर आधीच अपघातात गेले होते....

 तेव्हापासून मी तीचा सांभाळ केला.... 

मी देखील जबाबदारी च्या ओझ्याखाली दबून गेले होते....

 मीराला कुणाचेच प्रेम मिळाले नाही...ना आईवडिलांचे, ना माझे नी आता?? 

 जवळजवळ महिना दीड महिन्यापूर्वी मीरा आजारी पडली खूप ताप आला तीला.....

 तापेत समीरचं नाव बरळत होती.... 

मग मीराला थोडंसं बरं वाटल्यावर मला कळालं की तिचं समीरवर अगदी कॉलेज मध्ये असल्यापासूनचं प्रेम आहे.... 
 नेमकेच तिला सायलीबद्दल समजले होते... 

तूम्ही सांगा इनामदार साहेब, माझ्या बहिणीला प्रेम मिळावं हे वाटणं चुकीचं आहे का? 

समीर ( चिडून ): अरे पण सायलीला मारून का?ही कोणती पद्धत आहे.... प्रेम कधी ओरबाडून नसते मिळत.... 

प्राची : मला माफ कर समीर, पण त्या क्षणाला मला तेच योग्य वाटत होतं.... 

मीरा :पण ताई, अगं मी अश्या प्रकारे समीर मिळवेल असं का वाटलं तूला?? .... त्या पेक्षा आजन्म एकटी राहणे पसंद केले असते... 

प्राची : पण मला ते मान्य नव्हते मीरा... मी तूला मनातून तुटलेलं पाहिलंय... का? तूला तूझ्या आयुष्यात कुणाचेच प्रेम मिळायला नको का??  तूझं बरळणे मला असह्य झाले आणि त्याच वेळेस मी ठरवले की काहीही असो तूला तूझे प्रेम मिळवून देणार?? 

समीर : तू स्त्री आहेस म्हणून, नाहीतर इथल्या इथे खूप मारलं असतं... तू सांगना प्राचीताई या सगळ्या मध्ये सायलीचा काय दोष होता??आणि कसं घडवून आणलंस हे सगळं?? 

प्राची :मी फॅशन डिझाईन करते तशीच सायली देखील एका नामांकित कंपनीमध्ये फॅशन डिझाईनिंग चे काम करत होती.... 

सायलीची आणि माझी प्रत्येक फॅशन डिझाईनिंग च्या स्पर्धांना भेट होत असे.... तितकीच आमची ओळख होती... ज्यावेळेस मला समीर आणि सायलीचे समजले तेव्हाच लक्षात आलं की ती हिच सायली आहे... 

योगायोग असा झाला की त्याच वेळेस एक स्पर्धा झाली.... त्यात सायली जिंकली पण सायलीला माझे सगळेच डिझाईन खूप आवडले.....


 मग मी इथेच संधी साधली.... तिला रोज दिवसभर दहा दिवसांचे ट्रेनिंग देण्याचे ठरले....त्या ट्रैनिंगची फीस मी तीला रोजची दहा हजार रुपये सांगितली.... ज्या दिवशी क्लास होईल त्या दिवशी संध्याकाळी त्या त्या  दिवसाची फीस देण्याचे ठरले.... 

खरं तर मी खूप जणांना फ्री मध्ये ट्रेनिंग दिली आहे पण मला सायलीसाठी ड्रग्ज खरेदी करायचे  होते त्यासाठी मी घेतले होते.... दिवसभर ट्रेनिंग मध्ये मी सायलीला शीतपेय देत होते आणि त्यात मिसळून हे ड्रग्ज देत होते .....

असच मी दहा दिवस चालवलं.... सायलीला थोडं ड्रग्ज चं addiction झालं होतं ती अधून मधून बेचैन व्हायला लागली होती... 

मला जे हवं तेच व्हायला लागलं होतं...
 सायलीच्या  अपघाताच्या दिवशी मी सायलीची अगदीच नॉमिनल ट्रेनिंग घेतली... 

सायली घरी गेली पण ती ड्रग्ज साठी बेचैन झाली....  त्याच वेळेस मी सायलीला फोन केला.... जो कॉल लिस्ट मध्ये आला आहे तोच....
 सायलीला  मुद्दाम कार घेऊन येण्यासाठी सांगितलं... मग मला बोलता बोलता सायली म्हणाली की हो मी ड्राइव्हरला घेऊन येते.... 

मी फोन ठेवला नी तडक सायलीच्या घरी गेले....

 तीची गाडी मी ड्राइव्ह केली आणि मुद्दाम दरी असणाऱ्या रस्त्याने आणली.... 

आधी सायलीने ए. टी एम मधून पैसे काढले.....

 तिथल्या कॅफे मध्ये बसून ट्रेनिंगचा भाग समजावून सायलीला ड्रग्जयुक्त  शीतपेय दिलं.... 

सायलीला नशा चढला आणि मी संधी साधली... मी तिला कारमध्ये बसवलं आणि गाडी मुद्दाम तिरकी ठेवली...

. तीने गाडी चालू करून गियर बदलला की गाडी सरळ सरळ दरीत कोसळली..... 

समीर तर ते ऐकून एकदम प्राचीच्या अंगावर धावून गेला,इनामदारने समीरला सावरलं.... 

 मीरा आणि शरद मटकन खाली बसले 

इनामदार :पण त्या समुद्री चाचेची आणि तूमची ओळख?? 

प्राची :आमचा एक सहकारी आहे.... तो या समुद्री चाचेशी नेहमी व्यवहार करत असे... ..परदेशी जाताना हे लोक कपड्यांची तस्करी करत... आणि आपल्याकडे येताना ड्रग्जची.... 
 म्हणजेच आमच्या बॉसला न कळत त्यांचा काही माल (कपडे ) त्यांची तस्करी करतो.... त्यात तो हिशोबासाठी माझी मदत घेत असे ... म्हणजे माझा बॉस म्हणून मला त्या सहकाऱ्याचे ऐकावे लागत असे.... 
मग कधी कधी हिशोब समजावण्यासाठी मला त्यांना भेटावं लागे.... 
त्यातील एक जण आपल्या शहरातच राहतो.... त्याच्याकडून मी हे खरेदी केलं होतं...... 

मीरा : ताई, काय बोलू मी??  माझ्या प्रेमासाठी तू का गून्हा केलास... अगं आपण सोबत किती सुखी होतो.... आता दुःखी केलंस ना.... 

समीर तर ते ऐकून धाय मोकलून रडायला लागला... "सायली कसं जगू आता "

प्राची : समीर मला माहीती आहे मी खूप मोठं पाप केलं आहे.... खूप मोठी गुन्हेगार आहे तूझी पण याची शिक्षा मीराला देऊ नकोस..... मीराला पदरात घे... तीचा सांभाळ कर.... 

"समीर काही बोलणार इतक्यात मीरा बोलली, "... 

मीरा : प्राचीताई!तूला वाटलंच कसं की मी आता समीरशी लग्न करेल??  ते देखील तूला असं गुन्हेगार पाहून...

 वाईट मार्गाने  मला समीर कधीच मिळवायचा नव्हता.....

 आता मला माहीती आहे..... या कायद्याच्या शिक्षेने तूला काहीच फरक पडणार नाही..... म्हणून मी ठरवलं आहे की,  मी आजन्म अविवाहित राहील...... हीच या गुन्ह्याची तूला आणि मला शिक्षा.. .... 

समीरला आता सायलीच्या शेवटच्या दहा दिवसात विक्षिप्त वागण्याचे कारण समजले... आपण जर तेव्हा पत्रकारिता थोडी कमी केली असती, तर कदाचीत सायलीला वाचवले असते, असे वाटून समीर अश्रू पुसत तिथून निघून गेला.... 

समाप्त 
©®डॉ सुजाता कुटे 

🎭 Series Post

View all