ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 8)

Cctv futej of sayli

समीरने रागानेच  ठीक आहे म्हणत फोन खाली ठेवला खरा पण समीरचं सिक्स सेन्स काहीतरी वेगळंच सांगत होतं.

 समीरला का कुणास ठाऊक शरदवर विश्वास बसला नाही 

.. ज्या पद्धतीने शरदने सायलीचे नाव घेतले होते.... तो सायलीला बऱ्यापैकी ओळखत असावा असेच समीरला वाटून गेले होते....

आता त्याच्या शोधाच्या लिस्ट मध्ये शरद देखील ऍड झाला... 

खरं तर समीरचे  डोके अगदीच सुन्न झाले होते.... त्याला असं वाटायला लागलं होतं की मी सरळ मार्गाने चाललो होतोना... मध्येच या शरदने हुलकावणी दिली.... विनाकारण माझा वेळ गेला... जाऊदे आता काही विचार करून फायदा नाही आपण आपलं पुढचं काम करू.... असा विचार करत समीर अल्टोकडे जाऊ लागला.... 

शरद : समीर मला अंदाज आलाय की तूला माझा आणि इनामदार साहेबांचा खूप राग आला आहे..... पण विश्वास ठेव माझ्याकडून मी तूला त्रास नाही होऊ देणार.... 

समीरने पून्हा शरदकडे रागानेच बघितलं.....आणि म्हणाला "शरद " मला वाटतं तू माझ्याकडे शिकायला आला आहेस?? 

 मी तूझा सिनियर आहे??  हो ना 

शरद : हो 

समीर :मग ही अरे तुरे ची भाषा मला चालणार नाही... तूझी  भाषा आदरयुक्त असावी.... समीर जरा खडूसपणाने बोलला.... 

शरद (मनामध्ये ): ठीक आहे समीर आज तूम्ही माझ्यावर रागावले आहात म्हणून पण मी असं वागेल की तूमचं मन जिंकून घेईल.... 

अरे हे काय आपन मनात देखील समीरला आहो जाहो करत आहे.... गुड गोइंग शरद असं मनातच म्हणत समीरने हलकेच स्मित केलं....

तितक्यात समीरचा फोन वाजला.... समीरने फोन उचलला... मीराचा फोन होता.... 

मीरा : अरे समीर कुठे आहेस तू??  आपल्या news कव्हर नंतर तूझे दर्शन नाही की फोन नाही.... बॉसही आठवण काढत होते, "तूझी".. म्हणत होते की ऑफिसला रोज  एकदा तरी हजेरी लावत जा...... 

समीर :अगं मीरा बॉसला सांगशील, "मी खरंच खूप busy होतो आणि ऑफिसला आलो की माझं जे महत्वाचे काम आहे त्याकडे दुर्लक्ष होते"... दुसरेच काम करावे लागते.... मला आता माझ्या निश्चयापासून ढळायचे नाहीये.... 

आशा आहे तू समजून घेशील आणि बॉसला देखील समजावून सांगशील?? 

मीरा : हो बाबा हो, मी सांगेन "बॉस "ला.... पण माझी काही मदत लागली तर नक्की सांग.... 

समीर : हो नक्की... चल ठेवतो फोन... मला बँकेत जायचं आहे... समीरने फोन ठेवला... 

शरद : मीराचा फोन होता ना?? ही मीरा म्हणजे मीरा देसाई ना... 
समीर : एकदम आश्चर्याने,  हो ! तूला कसं माहीती.... 

शरद : news रिपोर्टरला कोण नाही ओळखणार?? शरदने स्मित केलं... 

समीर : चल चल ठीक आहे.... मला खूप काम आहेत... मला निघायचे आहे... 

शरद : मला येऊ द्याल का प्लीज?? 

समीर : ठीक आहे चल पण एका अटीवर 

शरद : मला तुमच्या सगळ्या अटी मान्य.... 

समीर : बँकेत एकदम शांत बसायचं तू तिथे काहीही विचारणार नाहीस..... अगदी मला सुद्धा... तूला काही बोलायचे असेल तर ते बँकेतून बाहेर पडल्यावर बोलायचे आहे...

शरद: ओके सर... 

समीर त्याची अल्टो तर मोटार सायकल स्वार त्याची बाईक घेऊन दोघेही बँकेकडे निघाले...... 

बँकेत गेल्यावर समीरने मॅनेजरची भेट घेतली.... सी सी टी व्ही  कॅमेऱ्याच्या फुटेजसाठी  परवानगी अर्ज केला

 अर्थातच यासाठी समीरला आधी पोलीस स्टेशन मधून परवानगी घ्यावी लागली.....

 इन्स्पेक्टर इनामदारांनी ती परवानगी, "लागलीच एस.पी. ऑफिस कडून मिळवली"...या साठी समीरने शरदला कामाला लावले होते.... 

मॅनेजरने सी सी टी व्ही फुटेज काढताच...सायलीने ए टी एम मधून जेव्हा जेव्हा पैसे काढले तेव्हा तेव्हा च्या फुटेज बघायला लागला.... 

फुटेज मध्ये समीरला सायली दिसली... समीरच्या डोळ्यातून तिला बघताच घळाघळा अश्रू वाहायला लागले.... त्यान पटकन बाजूला असलेल्या शरदचा हात पकडला... नी जोरात दाबला.....

 पण लागलीच कंट्रोल समीर कंट्रोल असं मनात म्हणत तो नीट सी सी टी व्ही फुटेज बघू लागला..... 

शरदने देखील "आश्वासक "समीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघेही फुटेज बघायला लागले...... 

समीरला सी सी टी व्ही फुटेज बघताना एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक वेळेस सायलीसोबत कुणीतरी होते....फुटेज मध्ये फक्त सावली दिसत होती.... 
ती देखील तितकीशी क्लिअर नव्हती....

पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की शेवटच्या दिवशी देखील वेगळे ए टी एम असूनही ती सावली दिसतच आहे....  

समीरने त्या फुटेजची कॉपी रीतसर मागून घेतली..... 

शरद : ह्या सावलीतील व्यक्ती ओळखीची असल्यासारखी वाटत आहे.... 

समीर: बोललास ना?? ... समीर ने शरद कडे रागाने बघितलं 

शरद नाइलाजाने शांत झाला...... 

किती हुशार आहे ती व्यक्ती स्वतःला सी सी टी व्ही फुटेज मध्ये येऊ दिलं नाही... म्हणजे प्लॅन करूनच...... पण आपण आजूबाजूच्या दुकानात विचारपूस करायला हवी... काहीतरी नक्कीच सापडेल.....असा विचार करत समीर घरी गेला.....

 शरदला मात्र तो काहीच बोलला नाही... 


शरद देखील सी सी टी व्ही फुटेज मधल्या सावलीचा विचार करत त्याच्या घरी गेला....

शरदला असं वाटायला लागलं की समीरच्या आधीच आपण ऍक्सीडेन्ट मिस्ट्री सोडवतो की काय??  कारण आपल्याला ज्या व्यक्तीवर संशय आहे तीच जर निघाली तर?? 

नको रे देवा ती नको..... असं म्हणत शरद देखील बेडवर आडवा झाला.... 
          ©® डॉ. सुजाता कुटे 

🎭 Series Post

View all