Login

अधीर मन बावरे... 1

एका मुलीच्या प्रेमाची कथा
अधीर मन...


नुकतीच ती कॉलेज संपवून नोकरीच्या शोधात होती. म्हणजे तशी गरज नव्हती तिला नोकरीची. पण जस्ट स्वतःला सिद्ध करायचं, आर्थिक स्वतंत्र वगैरे व्हायचं.
ती नीलिमा. नीलिमा संजय शिर्के.
वडील साधे शाळा शिक्षक. आई ती लहान असताना देवाघरी गेलेली. मग तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं. आणि
नवीन आई आली.
आधी तर ती अगदी लहान होती. आई लाड वगैरे करायची. पण नंतर तिच्या भावाचा निलेशचा जन्म झाला. आणि आपोआप आई बरोबर च बाबांचं पण प्रेम कमीच झालं. अर्थात तिला काही कोणी त्रास नाही दिला, किंवा खूप काम वगैरे नाही करून घेतलं पण जे तिला प्रेम हवं होतं ते काही मिळालं नव्हतं. ती नेहमी स्वप्न रंजनात रहायची. आपल्याला आई बाबांनी नाही प्रेम दिलं म्हणून काय झालं, आपण लग्न करू किंवा आपल्यावर कोणी प्रेम तर करेलच. असं तिला वाटत तर होतं
कारण ती तशी रूढ अर्थाने दिसायला तर सुंदर होती. गोरी होती, केस छान सिल्की लांब असे होते, मोठे टपोरे डोळे, चाफेकळी नाक, नाजूक जिवणी, गोबरे गाल, अगदी सडपातळ नव्हती की अगदी जाड पण नव्हती.
आत्ता पण ती सकाळी तिची तयारी करून खाली आली.
निलेश कॉलेजला जायला निघाला होता.
निलिमा, किती उशीर केलास गं उठायला, आत्ता आलीस, निलेशला डबा द्यायचा होता, तुला माहिती आहे, माझी कम्बर दुखते, गुढगे, पाठ उभं राहू देत नाही,
नेहमी प्रमाणे, सुमित्राने राग आळवला.
तसं तिच्या बाबांनी, संजयने पण बघितलं, नाराजीने

सॉरी आई, बाबा, निलेश, मी रात्री टीव्ही बघत होते मग उशीर झाला उठायला, निलेश थांब मी आत्ता तुला देते टोमॅटो ची चटणी आणि पोळ्या बनवून
ती पटकन किचन मध्ये गेली. आत्ताशी आठ वाजले होते. पण असं बोलत होते, सगळे की बारा वाजून गेलेत.
तिने एकीकडे स्वतःसाठी चहा ठेवून कणिक मळली. भाजी चिरून फोडणीला टाकली, भरभर पोळ्या लाटल्या. आणि तिने त्याचा डबा भरून दिला.

" अगं जरा पोहे कर बरं, भूक लागली बाई, थांब रे, निलू, तू पण जा पोहे खाऊन, "
सुमित्रा बोलली तसं नीलिमाला आश्चर्य वाटलं. आत्ता तर त्याला उशीर होत होता. पण ती काही नाही बोलता पोहे बनवले. पटकन भांडी घासून टाकली आणि धुणं धुवून वाळत पण टाकलं. तिला काही पोहे आवडतं नव्हते त्यामुळे तिने खाल्ले नाही.
सगळं होईपर्यंत नऊ वाजले.
ओह माय गॉड, मला दहा वाजता इंटरव्यू आहे, आता कशी पोचणार मी,
म्हणत बडबड करत ती पळतच तिच्या खोलीत आली.
फोन उचलून बघते तर जयाचे खूप सारे मिस्ड कॉल्स,
आता हिला नंतर कॉल करते वेळ नाही
म्हणत तिने पटकन आवरलं, केस नीट वेनी घातली सगळं कागदपत्र नीट फोल्डर मध्ये घेतले आणि देवाला नमस्कार करून पळतच बाहेर गेली.
तिला तिच्या बाबांनी बारावी झाली की स्कुटर घेऊन दिली होती.
ती काढायच्या आधी तिने जयश्रीला फोन केला
आले गं मी
एवढंच बोलून ती वेगाने गाडी चालवत निघाली.

सदर दीर्घ कथा मालिकेचे भाग नियमित प्रकाशित होणार असून ते वाचण्यासाठी पेजला फॉलो करा.
सेटिंग मध्ये जाऊन फेव्हरेट ऑप्शन निवडा म्हणजे कथेचे भाग पोस्ट झाले की वाचायला मिळतील.
0

🎭 Series Post

View all