Login

अधीर मन बावरे... 5

एक वेगळी प्रेमकथा
अधीर मन बावरे... 5
दीर्घकथा लेखन स्पर्धा : डिसेंबर 2025- जानेवारी 2026


नीलिमाने त्या केबिन च्या बाहेर आल्यावर एक मोठा श्वास घेऊन छातीवर हात ठेवला आणि तिने स्वतः भोवती एक गिरकी घेतली, आणि परत त्या मोना मॅडम समोर जायचं या विचाराने तिने नाक मुरडलं आणि ती त्या फ्लोअर वर आली.

सगळा भुलभूलैया आहे, सारखं, ती लिफ्टमध्ये जा, या, तिथे त्या सनकी सायकोच्या केबिन बाहेर डेस्क आहे, तिथे बसायचं आहे बहुतेक मला, ठीक आहे, बरं आहे, लिफ्ट मध्ये ती स्वतःशी मनातच बडबड करत होती.

ती त्या डिपार्टमेंट कडे गेली. आधी प्यूनला विचारलं
मॅडम फ्री आहेत का? असल्या तर त्यांना सांग की सि ई ओ च्या पर्सनल असिस्टंट साठी मला जॉइनिंग लेटर हवं आहे. मी. मिस नीलिमा शिर्के, मला हवं आहे, जॉइनिंग लेटर,
तिने असं सांगताव त्या प्यूनने तिला आश्चर्याने बघितलं आणि तो लगेच त्या मॅडमच्या रूम मध्ये पळाला.

असं काय बघितलं त्यानं? एलीयन बघितल्यासारखं? जाऊ दे, मला काय मला अपॉइंटमेंट लेटर आणि जॉइनिंग लेटर मिळाल्याशी मतलब "
बडबड करत ती तिथे उभी होती.

तुम्हाला मॅडम आत बोलवत आहेत
त्या प्यूनने सांगितलं तसं ती थँक्स म्हणत आत गेली.
मे आय कम इन विचारलं आणि येस ऐकल्यावरच ती आत गेली.

त्या मॅडमने तिला आधी काही पेपर्स दिले.
नीट वाचून घ्या, आधीच वाचून साइन करा, नंतर मग तुम्हाला नाही म्हणता येणार नाही,
त्या मॅडम कठोर स्वरात बोलल्या.

ठीक आहे, म्हणत तिने ते पेपर्स घेतला
कामाचं वेळ : सकाळी नऊ ते अनिश्चित.
कामाचे स्वरूप : बॉस च्या ऑर्डर्स ऐकणं, त्याचं शेड्युल आदल्या दिवशी, घरी जाईपर्यंत त्याला मेल करणे, मिटिंग बद्दल माहिती देणे, संबंधित स्टाफला इन्फॉर्म करून फाईल्स घेऊन बॉस समोर देणे, पूर्ण जबाबदारी पर्सनल असिस्टंट म्हणून असणार.
विविध इव्हेंट्स मध्ये ऑफिस चे रिप्रेझेंट करणे,
ती एक एक वाचत होती.


घरी जायची वेळ अनिश्चित का
तिने विचारलं.

कारण कधी कधी मिटिंग संध्याकाळी, रात्री वगैरे असतात, त्याच्या फाईल्स इत्यादी रेडी करून द्याव्या लागतात, कधी अर्जंट इन ऑफिस मिटिंग असते त्यासाठी थांबावं लागत
त्या मॅडमने उत्तर दिलं

नीलिमाने विचार केला आणि लगेच साइन केल्या.

खरं तर असं काही कलॉज नव्हता.
पण मुद्दाम असं दिलं होत. तिने सध्या त्यावर साइन तर केली.

मॅडम, मला असं विचारायचं होत की, माझे इमिजेट बॉस कोण आहे? मला काही प्रॉब्लेम आला तर मी कोणाला विचारायचं? "
तिचा प्रश्न ऐकून मॅडम विचार करून बोलल्या,
तुम्ही सरांनाच विचारू शकता.

ओके थँक्स म्हणत तिने ते साइन केलेल्या पेपर्सचे फोटो तिच्या मोबाईल मध्ये काढून घेतलं मग ते पेपर्स त्या मॅडमकडं दिले.
तसं त्या चिडून बोलल्या
" अहो तुम्ही असे, डॉक्युमेंट्सचे फोटो नाही काढून घेऊ शकत, ते डिलीट करा
त्या असं बोलल्या की नीलिमा जरा ठाम स्वरात बोलली
" ठीक आहे, मग तुम्ही मला त्याची प्रिंट द्या, मी साइन केलेली, आफ्टर ऑल मझ्यकडे पण काही प्रूफ हवा ना, की मी कशावर साइन केल्या, सॉरी मी माझ्या मोबाईल मधून काही डिलीट नाही करणार,
असं म्हणून ती त्या काय बोलतात याची वाट बघायला लागली.

नाही तुम्हाला काही प्रिंट वगैरे मिळणार नाही, ते सगळं तुमच्या फाईल मध्ये राहील. तुम्हाला प्रिंट देऊ शकत नाही कारण
तसा नियम नाही,
पण तुम्ही असे ऑफिस चे डॉक्युमवट्स स्वतः कडे नाही ठेवू शकत
त्या मॅडम जरा ओरडल्या.

ठीक आहे, मग यावर माझ्या बॉसच्या साईन्स लागतील ना, अप्रूव्हल साठी
तिने परत विचारलं.

तसं त्या मॅडम चिडल्या, आत्ता पर्यंत त्याना असं कोणी थेट बोललं नव्हतं.
पण ही मुलगी

त्याच्याशी तुम्हाला काही घेणं नाही, उद्या पासून तुमचं ट्रेनिंग शार्प दहा वाजता सुरु होईल, त्यासाठी साडेनऊ वाजता हजर रहा,
आणि हो हे अजून काही पेपर्स यावर साइन करा.

तिने चेक केलं
कामाची वेळ : दहा ते सात
ती तिरकस हसली
त्याचे पण सगळे फोटो घेतले आणि ती ते पेपर पर तिने त्या मॅडम समोर केले.

येऊ शकता तुम्ही.
ती बाई वैतागून बोलली.
तसं ती हसतच तिथून बाहेर पडली.


नीलिमाने सांगून पण काही डिलीट केलं नाही, याचा त्या बाईला खरंच रागच आला होता.
पण आत्ता तरी ती काही करू शकत नव्हती.

सदर कथा मालिकेचे भाग नियमित प्रकाशित होणार असून वाचण्यासाठी पेजला फॉलो करा. सेटिंग मध्ये जाऊन फेव्हरेट ऑप्शन निवडा म्हणजे तुम्हाला भाग पोस्ट झाल्याचं समजेल.
0

🎭 Series Post

View all